डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग वीस
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग वीस
मागील भागात आपण पाहिलं कि, वीर जयला दुसरा जीभ शोधायला सांगतो... पण मुद्दाम त्याला डिवचून तो तिथेच त्याला जॉब करायला सांगतो...... आता पाहूया पुढे,
अलार्मच्या आवाजाने वीरला जाग आली. सकाळी लवकर उठायची सवय नसल्यामुळे तो कंटाळून उठला आणि भराभर आवरून त्याने स्वादिष्टम मध्ये प्रवेश केला.
किचनमध्ये सकाळची तयारी सुरू होती. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते.
किचनमध्ये सकाळची तयारी सुरू होती. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते.
मीराला भेटून तो आपली कामे समजून घेतो, आणि कामाला सुरुवात करतोय...तो prep station वर उभा राहून काम करत असतानाच अवनी मागून येते. तिची नजर थेट चॉपिंग बोर्डवर जाते.
तस अवनी कडक आवाजात त्याला बोलते,
“हे काय cuts आहेत?”
काम करता करता वीर थांबून नजर वर करून अवनीला बघतो तस त्याच्या डोक्यावर आठ्या येतात.
“मॅम, मी try करतोय... काल पेक्षा थोडा improve झालोय.”
ते ऐकून अवनी आपल्या भुवया उंचावते.
“मिस्टर Try इथे चालत नाही...इथे consistency हवी.. आणि तुझी इम्प्रोव्हमेन्ट झाली आहे कि नाही हे तुझं तूच ठरवणार... व्वा.....”
बोलतच ती knife उचलते, दोन सेकंदात छान असे काप करून दाखवते.
“हे बघ....हे standard आहे.”
ते ऐकून वीर थोडा चिडतो.
“मॅम,सगळ्यांना पहिल्याच आठवड्यात असं जमेलच असं नाही.”
अवनी सरळ त्याच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यात राग उतरला होता. आजपर्यँत तिला उलट कोण बोललं नव्हतं.. त्यात हा न आवडणारा मुलगा बोलला ते पाहून तिचं नाक अजूनच लाल होत...
“जमत नसेल तर excuse देऊ नकोस....Practice कर... आणि तरीही जमलं नाही तर गेट आऊट... दरवाजे उघडे आहेत तुझ्यासाठी...”
ती रागात बोलते, ते ऐकून वीरसुद्धा तिला उत्तर देतो,
“मी excuse देत नाहीये....मी प्रयत्न करतोय.... मेहनत ”
मेहनत समोर दिसायला हवी.
काम परफेक्ट असावं.”
काम परफेक्ट असावं.”
वाढ बोलून ती थोडी पुढे येते.
“आणि मेहनत करायची एवढीच हौस आहे ना?”
क्षणभर थांबून ती ठामपणे म्हणते...
“.. उम्म्म.....तर मग आज पूर्ण फ्लोअर तूच साफ करायच..... ते ही आताच्या आता.”
“.. उम्म्म.....तर मग आज पूर्ण फ्लोअर तूच साफ करायच..... ते ही आताच्या आता.”
वीरचे हात नकळत मुठीत आवळले जातात.
ह्यावर तो काही बोलणारच तेवढ्यात ती हात दाखवून ...
ह्यावर तो काही बोलणारच तेवढ्यात ती हात दाखवून ...
" इट्स माय ऑर्डर..... No excuse.... "
ती थेट त्याच्याकडे पाहते.
“गो... "
अस म्हणून ती पाय आपटत तिथून निघून जाते....
किचनमध्ये क्षणभर शांतता पसरते.
किचनमध्ये क्षणभर शांतता पसरते.
वीर जागेवरच उभा राहतो.....राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता......तो मनातच पुटपुटतो,
“मला अस का वाटतंय कि ही मुद्दाम target करत आहे.....”
एवढं बोलून तो एक खोल श्वास घेतो,आणि कामाकडे वळतो आपला राग गिळून.... पर्याय पण नव्हता म्हण त्याच्याकडे....
इकडे, थोड्या अंतरावर उभी राहून अवनी मागे वळून एक नजर टाकते. तेव्हा तिला वैताकलेला वीर तिच्या नजरेत दिसतो, त्याला तस पाहून
तिच्या ओठांवर हलकंसं हसू येऊन ती खुश होते...
“तू इथे किती दिवस टिकतोस….तेच पाहते मी.... नाही तुझं जिंदगी हराम केली तर नाव नाही लावणार..... अवनी ”
ती मनातच म्हणते.
आणि दोघांमध्ये न बोललेला संघर्ष अजूनच वाढत जातो.....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
