डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ मनाची भाग दोन
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ मनाची भाग दोन
मागील भागात आपण पाहिलं कि, विराजसच्या चुकीमुळे त्याचे वडील त्याला घरातून बाहेर काढतात, आता पाहूया पुढे...,
सकाळचं घर अगदी शांत होतं. जणू कुणीतरी या घराचा आत्माच काढून घेतला असावा.
सकाळचं घर अगदी शांत होतं. जणू कुणीतरी या घराचा आत्माच काढून घेतला असावा.
विराजस आपल्या रूममध्ये नाराजीत आपली बॅग भरत होता. जीवनात पहिल्यांदाच खरंच काहीतरी आपल्याला करायचं आहे, असं त्याला जाणवत होतं… पण त्याला अजूनही सगळं स्वप्नासारखंच वाटत होतं. त्याचे वडील रात्री मस्करी करत होते असच त्याला वाटत होत. पण जेव्हा त्यांचा नोकर क्रेडिट atm कार्ड घेण्यासाठी आला, तेव्हा मात्र त्याचा भ्रम तुटला. पुढे काय करायचे ह्या विचारात असतानाच त्याच्या रूमचे दार हळूच उघडलं.
त्याने पाहिलं तर त्याची आई अनुराधा भोसले पाटील रडक्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होत्या. एकदम क्लिअर दिसत होत कि त्यांना रात्रभर झोप लागली नव्हती… आणि आताही त्याना फक्त काळजी होती.
अनुराधा एकदम प्रेमळ होत्या. आपल्या संपूर्ण कुटुंबावर त्यांचा खूपच जीव होता. विराजस तर त्यांच्या काळजाचा टुकडा होता.त्या शांत, प्रेमळ आणि अत्यंत संयमी स्त्री होत्या. त्यांना आपल्या मुलाचं प्रत्येक छोटंसं दुःख, भीती, समजायची. वाद, भांडण, तणाव ह्यापासून त्या दूर राहायच्या. म्हणूनच त्यांच्या माया आणि सहनशीलतेमुळेच हे घर टिकलेलं होत. त्याला असं दूर जाताना पाहून त्यांना खूप त्रास होत होता. पण जयंतरावांनी त्यांना त्याच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतल्याचा पटवून दिल होत. तस ही पती हेच परमेश्वर. ही म्हण त्यांच्या बाबतीत एकदम परफेक्ट होती. आजपर्यंत त्यांनी आपल्या नवऱ्याचा एक ही शब्द आजपर्यंत त्यांनी डावलेला नव्हता. अनुराधाला प्रॉपर्टी, हिस्से, पैसे… याची फारशी चिंता कधीच नव्हती.
त्यांच्यासाठी तर फक्त “घर पूर्ण हवं… आपली माणसे नाहीत तर प्रॉपर्टीला किंमत काय?” कधीही पैशांचा मोह नव्हता. त्यांना फक्त एवढंच हवं होत कि विराजस जबाबदार व्हावा, योग्य मार्ग निवडावा आणि घर एकत्र राहावं.प्रॉपर्टीवरून कधीही घर तुटू नये.
जयंत भोसले पाटील हे शांत, गंभीर आणि अत्यंत शिस्तप्रिय व्यक्ती होते. त्यांचं बोलणं कमी, पण शब्द पक्के असायचे. निर्णय घेण्यात ते कठोर दिसतात, पण त्या कठोरतेच्या मागे त्यांच्या कुटुंबाचं भलं असतं.
बाहेरच्या लोकांसाठी ते जणू “कडक” पाटीलच
पण जवळून पाहिलं की ते अत्यंत संवेदनशील बाप दिसून यायचा. तर भावनांपेक्षा कर्तव्य,जबाबदारी श्रेष्ठ हे त्यांचं तत्त्व ते आजपर्यंत जपून होते. आपल्या दोन्ही मुलावर ते खूप प्रेम करतात. पण विराजसची उधळपट्टी, त्याची त्यात वाया जाणारी ऊर्जा, बेफिकिरी… हे बघून ते आतून तुटतात, कारण घराची, जमिनीची, व्यवसायाची किंमत ते फक्त प्रॉपर्टी म्हणून पाहत नव्हते तर त्यांच्यासाठी ते सगळं त्यांच्या पूर्वजांचा वारसा, त्यांचे कष्ट आणि कुटुंबाची प्रतिष्ठा होती. त्यांच्या मते ही प्रॉपर्टी उडवण्यासाठी नसून त्यात वाढ करून संभाळण्यासाठी पुढच्या पिढीकडे द्यायची. पण ज्याच्यात लायकी, मेहनत करण्याची तयारी आणि जबाबदारी घ्यायची धमक आहे,
त्यालाच प्रॉपर्टीत हिस्सेदारी मिळायला हवी. हे मनापासून त्यांचं मत होत पण विराजसने जर चुकीच्या मार्गावर पाय टाकला असेल तर प्रॉपर्टीतला त्याचा हक्कही धोक्यात येऊ शकतो हे सांगताना त्यांनी अजिबात संकोच ठेवला नाही. ते कधीच प्रॉपर्टीच्या मागे पळाले नाहीत.
पण कोणी त्यांचा वारसा वाया घालवेल ही गोष्ट ते सहन देखील होत नव्हती. ते वडील म्हणून पूर्ण गोष्टी विराजसला सांगू शकत होते पण त्यांनी ते सगळं समजावण्यासाठी अनुराधालाच पाठवले. त्यांना सुद्धा हा निर्णय ऐकून धक्कादायक बसला होता, पण आपला नवरा चुकीचा नाही ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
म्हणून त्या तिथे आल्या पण काहीच न बोलता फक्त दरवाजाला टेकून उभ राहून विराजसच्या हालचाली टिपून त्याला नजरेत साठवत होत्या. कारण आता त्यांची काडजी भेट होईल हे तर कुणालाच ठाऊक नव्हतं.
अचानक विराजसने तिच्याकडे पाहिलं,
पहिल्यांदाच तिला इतकी तुटलेली पाहत होता.
पहिल्यांदाच तिला इतकी तुटलेली पाहत होता.
“मॉम … प्लीज, डॅडला कॉन्व्हिन्स कर ना.... मी कधीच असा कुठे राहिलो नाही?? कसा राहीन मी तुमच्याशिवाय..... तू तरी राहू शकतेस का माझ्या शिवाय??"
तो तिला मिठी मारून बोलला....
त्याची आई त्याला थांबवू शकेल का??
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा