फर्स्ट फ्लोअर.
भाग-दोन.
@ज्योती सिनफळ.
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता इन्स्पेक्टर कुलकर्णी विशाखा भावेच्या केस संदर्भात चौकशीसाठी पहिल्यांदा संजीवनी हॉस्पिटलमध्ये गेले. सागर आत्ताही हॉस्पिटलमध्येच होता.
इन्स्पेक्टर सागर भावेला म्हणाले,
“सॉरी मि. सागर, आत्ता तुमची बोलण्याची मनस्थिती नसेल. मी समजु शकतो, पण आपल्याला विशाखावर कोणी अतिप्रसंग केला ह्याचा लवकरात लवकर शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.”
त्यावर सागर,
“इन्स्पेक्टर साहेब, विचारा तुम्हाला काय विचारायचेय ते मी तयार आहे. फक्त लवकरात लवकर माझ्या मुलीची ज्यांनी ही अवस्था केली त्यांना पकडून शिक्षा करा एवढीच विनंती आहे.”
इन्स्पेक्टर कुलकर्णी,
“तुम्ही विशाखा आणि तुमच्या म्हणजेच तुम्ही आणि तुमच्या पत्नीच्या रोजच्या रुटिनबद्दल सांगा. अगदी तपशीलवार आठवून सांगा.”
सागरने दोन मिनिट विचार करून इन्स्पेक्टर कुलकर्णींना म्हणाला,
“मी, माझी बायको आणि विशाखा असे आमचे तिघांचेच कुंटुब आहे. मी आणि आरती दोघेही बॅंकेत नोकरी करतो. मी आणि आरती सकाळी दहा वाजता बॅकेत जातो. घरी येईपर्यंत आम्हाला साडेसात आठ वाजतात.”
“बरं, मग विशाखाचे काय रूटीन असते? शाळा, क्लासेस किंवा इतर काही ठिकाणे जिथे ती रोज जाते ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?”
“सर विशाखाला नुकतंच पंधरावं वर्ष लागलं. ती सेन्ट झेवियर्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नववीत शिकत आहे. सकाळी आठ ते दोनपर्यंत तिची शाळा असते. ती साडेसातच्या आसपास स्वतःच्या सायकलने घरून शाळेत जायला निघते, अडीच/ तीनपर्यंत ती घरी येते.”
“आम्ही तिघांनी गूगल ट्रॅकींग ॲप सेटींग करून घेतले आहे ज्यामुळे ती कुठे जातेय? काय करते? हे आम्हाला ऑफीसमध्ये बसुनही कळते. तिच्या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा तिच्या आईला जास्त माहीत आहेत. त्यामुळे बाकी गोष्टी तुम्ही आरतीलाच विचारले तर बरे होईल.”
“मिसेस आरती, ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी विशाखा कधी घरी आली? तुमचं तिच्याशी शेवटचं बोलणं कधी झालं? काही सांगू शकाल का?
आरती थोडं आठवून सांगायचा प्रयत्न करू लागली.
“त्यादिवशी पण नेहमीप्रमाणे ती शाळेतून तीन वाजता घरी आली. तेव्हा तिचा मेसेज आला होता आम्हाला, हे बघा.” (आरती मोबाईल मध्ये आलेला मेसेज इ. कुलकर्णींना दाखवते.)
“नंतर थोडी विश्रांती घेऊन चार वाजता ती तिच्या विज्ञान/ गणिताच्या क्लासेसला गेली. तिकडून साडेसहापर्यंत घरी आली तेव्हाच मी तिला फोनही केला होता सहजच. पण बॅटरी उतरली म्हणत तिचा फोन डिस्कनेक्ट झाला. नॉर्मली घरी येऊन ड्रेस बदलून ती लगेच स्विमिंग क्लासला जाते आणि साधारण साडेसात/आठपर्यंत घरी येते.”
“मी आणि सागर काल एकत्रच घरी आलो साडेसातच्या आसपास. मी किल्लीने दार उघडायला पर्समधून किल्ली काढली तर दार किलकिले उघडेच होते.”
“घरात हॉलमध्ये टिव्हीवर कार्टून चॅनल चालू होते.”
“मी दार ढकलले आणि विशाखाला आवाज देत घरात शिरले.”
“सागर अजून शूजच काढत असतील की मी मोठ्यांदा किंचाळले. माझी पोर पलंगावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली होती.”
आरतीला पुढे बोलवेना. तिचा कंठ दाटून आला होता. घशातून शब्द फुटत नव्हते. तो प्रसंग ती पुन्हा जगत होती त्यामुळे त्या वेदना तिला सहन होत नव्हत्या.
सागरने तिला पाणी प्यायला देऊन सावरत बाकावर बसवले.
मग सागरने पुढे सांगायला सुरुवात केली,
“मी पळतच आत गेलो आणि समोरचे दृश्य बघून मला धक्काच बसला. विशाखा पलंगावर निपचित पडली होती. तिच्या कपड्यावर व पलंगाच्या चादरीवर रक्ताचे डाग दिसत होते आणि ती विस्कटलेली होती. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आम्ही दोघेजण पुढे जाऊन विशाखाला हलवले, तिला विशाखा, विशाखा अशा जोरजोरात हाक मारु लागलो. ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. पण तिचा श्वास चालू होता.”
“मी लगेच आमच्या फॅमिली डॉक्टर जोशी ह्यांना फोन लावला.”
जोशी डॉक्टर घरी आल्यावर त्यांनी विशाखाला तपासले आणि ते म्हणाले,
“हिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे. मी संजीवनी हॉस्पिटलमधून ॲब्युलन्स मागवतो व तिथल्या डॉक्टरांशी पण बोलतो.”
मग आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो.
इन्स्पेक्टर कुलकर्णींनी सागरला विचारले,
“तुम्हाला कोणावर संशय आहे का? म्हणजे तुमचे कोणाशी वादविवाद? कोणी विशाखाला त्रास देत होतं का? किंवा तिचे काही प्रेमप्रकरण.”
प्रेमप्रकरण शब्द ऐकताच आरती इन्स्पेक्टर कुलकर्णींवर चिडली,
“सर काही काय बोलत आहात? आम्ही चांगले सुशिक्षित लोक आहोत. आमची मुलगी काही प्रेमप्रकरण करणाऱ्यातली नाही.”
त्यावर इन्स्पेक्टर कुलकर्णी शांत स्वरात आरतीला म्हणाले,
“सॉरी मॅडम हा एक चौकशीचा भाग आहे. गुन्हेगाराला शोधायचे असेल तर आम्हाला सर्व गोष्टींचा विचार करायला लागतो. आणि आजकाल मुले घरापेक्षा बाहेरच जास्त वेळ असतात. मग बाहेर ते काय करतात? कोणत्या संगतीत असतात? हे पालकांना कुठे ठाऊक असते? तुम्ही इतक्या ठामपणे कसे सांगू शकता की असं काही नसेलच? सो डोन्ट ओव्हर रीॲक्ट!”
त्यांचा मुद्दा बरोबरच होता हे लक्षात येऊन आरती जरा वरमली.
“सॉरी साहेब, मी उगीच तुमच्यावर ओरडले. माझ्या मुलीचे प्रेमकरण नव्हते पण तिला आमच्या सोसायटीच्या बाहेर टपरीवरची काही मुले दोन महिन्यांपूर्वी त्रास देत होती. मी आणि सागरने त्यांना समज दिली होती. त्यामुळे आता ती मुले विशाखाला त्रास देत नव्हती.“
“टपरीवरच्या मुलांची नावे किंवा ती कुठे राहतात हे सांगू शकाल का मिसेस आरती?”
“नाही, ते नाही माहित सर.”
आरती उत्तरली.
“ठीक आहे. बरीच महत्त्वाची माहिती दिलीत तुम्ही. आम्ही प्रयत्न करतो लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडण्याचा.”
आता इन्स्पेक्टर कुलकर्णी आयसीयुमध्ये जाऊन तिथल्या डॉक्टर गोरेंना विशाखाच्या तब्येतीविषयी विचारले तेव्हा डॉक्टर गोरे म्हणाले,
“अजुन ती शुद्धीवर आलेली नाही पण तब्येत स्थिर आहे.”
तिथून इन्स्पेक्टर कुलकर्णी तडक भावेंच्या सोसायटी जवळील टपरीवर पोहोचले. सगळे लोक पोलिस बघून थोडेसे घाबरले.
इन्सपेक्टर कुलकर्णींनी टपरीच्या मालकाला त्याचे नाव विचारले,
“साहेब, किरण नाव आहे माझं.”
पुढे त्यांनी किरणला विचारले,
“समोरच्या मनोहर सोसायटीतील भावे कुंटबाला ओळखतोस का?”
“हो ओळखतो की साहेब, खुप सज्जन व साधे कुटुंब. काल खुप वाईट झाले त्यांच्या पोरीसोबत.”
इन्स्पेक्टर कुलकर्णीनी पुन्हा विचारले,
“तुझ्या इथे काही मुले यायची जी त्यांच्या मुलीला त्रास द्यायची, तू ओळखतोस का त्या मुलांना?”
“तुला त्यांचं नाव, गाव, कुठे राहतात काही माहित आहे का?”
त्यावर घाबरुन किरण,
“साहेब मी ओळखतो त्या पोरांना. रोज सिगरेट घ्यायला येतात; पण त्या पोरांची नावे नाही माहित आणि कुठे राहतात हे पण नाही माहित?”
त्यावर इन्स्पेक्टरने किरणला विचारले,
“त्यांची इथे येण्याची काही ठराविक वेळ आहे का?”
त्यावर किरण,
“तशी काही ठराविक वेळ नाही पण बऱ्याचदा दूपारी वगेरे येतात.”
“आता एक लक्षात ठेव, ते पुन्हा आले की त्यांची नावे आणि साधारण कुठे राहतात वगैरे माहिती काढून घ्यायचा प्रयत्न कर म्हणजे आम्हाला थोडी मदत होईल.”
“हो साहेब, नक्की प्रयत्न करेन.”
किरणला धन्यवाद देत इन्स्पेक्टर मनोहर सोसायटीत आले. तिथे गेल्यावर सोसायटीच्या गार्डकडे गुन्हा ज्या दिवशी घडला त्या पुर्ण दिवसाचे सीसीटिव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली.
इकडे सोसायटीच्या सर्व रहिवाशांची पण चौकशी सुरू झाली. आता फक्त फर्स्ट फ्लोअरवरच्या बिऱ्हाडांचीच चौकशी बाकी होती. पण खूप उशीर झाला होता आणि लंच टाईम उलटून गेला होता म्हणून इ. कुलकर्णी काम उद्यावर ढकलत पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जायला निघाले.
—-------------------------------------------------------------क्रमशः
फर्स्ट फ्लोअर
भाग दुसरा
@ ज्योती सिनफळ
टपरीवरच्या मुलांचा ह्यात काही हात असेल का?
नक्की काय घडलेय विशाखा बाबत?
ह्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा