Login

फसवणूक भाग -2

फसवणूक
मागील भागात आपण नमिता ला भेटलो.. तेव्हा तिचा नवरा तिची फसवणूक करून सुद्धा तिला च दोष देतो हे समजलं.. आता पाहूया पुढे....,


आता तिची आई देखील तिला घालून पडून बोलायची ..

"बाई च्या जातीला मूल हवंच....  नाहीतर बाई चा जन्म व्यर्थ आहे ..तुला तुझा नवरा बायको म्हणून तुला ठेवणार नाही ..आणि आमची सुद्धा तुला सांभाळण्याची परिस्थिती नाही .."



ते ऐकून नमिता ला खूप वाईट वाटलं आणि आता मूल हवंच म्हणून तीला देखील त्याचा ध्यास लागला होता ..कि आपल्याला ही काहीही झालं तरी मूल हे हवंच ...मी सुद्धा त्याच्यासाठी जगू शकेन ..म्हणून तिने देवाला नवस घेणे सुद्धा सुरु केले होते ..


पण तरीही तिला काही दिवस राहत नव्हते ...नमिता ला कळतच नव्हतं ..काय चुकतंय ते ..ती आपल्या परीने प्रयत्न करायची ..अमित शी जुळवून घायचा ती खूप प्रयत्न करायची पण तो साथ देत नसे ..एकदा तिने त्याला सांगितलं ...,

"मला बाळ हवं आहे ..."

तस तो खूप भडकला तिच्यावर ..

"ज्या नवरा बायको मध्ये प्रेम असत त्यांना मुलं होत .माझं  तुझ्यावर प्रेमम नाही ..त्यामुळे तुला मुलं होणार नाही हे तुझ्या डोक्यात बसवं आणि ह्या पुढे हा विषय काढायचा नाही ..."

असं तिच्या अंगावर ओरडून तो निघून गेला ....आणि ह्यावर तिला काय रिऍक्ट करावे तेच समजत नव्हतं ...

दिवस जस जसे पुढे सरकत होते ..तिला बाळाची अजूनच ओढ  लागत चालली होती.  कुणाकडून गोड बातमी आली कि ती अस्वस्थ होऊन एकटीच रडत बसे ...अशात तिने माहेरी जाणे देखील सोडले होते.....


तिच्या एका मैत्रिणीला जी तिची शेजारीण होती. ती स्वतःच दुःख तिच्या समोर मांडायची तिला तिची हि अवस्था समजत होती ..म्हणून तिच्या मदतीने तीने एका स्त्रीतज्ज्ञ कडे तिच्या सगळ्या टेस्ट करवून घेतल्या ..तेव्हा तिचे सगळे रिपोर्ट्स अगदीच नॉर्मल आले होते ...त्यावर डॉक्टर च म्हणणे होते ..

"तुम्ही प्रयत्न करा .तुम्हाला नक्कीच बाळ होईल ..."


ते ऐकून ती खुश झाली तिने डॉक्टर कडून ओव्यूलेशन पिरियड देखील समजवून घेतला होता ..त्यामुळे आता अमित च्या रागा कडे लक्ष न देता ती मनापासून त्याला समर्पित होत होती ....

आणि अश्यातच दोन महिने होऊन गेले ..तरी देखील तिला महिन्याची पाळी आली नव्हती ..त्यामुळे तिला एक प्रकारचा आनंद,भीती आणि हुरहूर दाटून आली होती ....




"आता आपल्याला कुणीतरी आई बोलेल , ज्यात मी माझं सुख शोधेन , त्याच्या सोबत खेळेन....सासू बाई चांगलं बोलतील , माहेरी सुद्धा मान मिळेल आणि कदाचित अमित त्याच्या मायाला विसरून मला आपलेसे करतील ..."


अश्या विचारात ती दिवस घालवू लागली होती ...
पण लवकरच तिचे हे स्वप्नाचे बंगले कोसळणार होते हे तिला ठाऊक च नव्हते ...

एक दिवशी अचानक पाणी घेऊन घरी आली तशी ती दारातच चक्कर येऊन कोसळली ..तस तिच्या पाळी वर लक्ष ठेवून असणारी तिची सासू पुढे झाली ...आणि ...,

"मी आजी होणार ..ह्या घरात सुद्धा पालणा हलणार .... माझी सून पोटूशी आहे......"


असं म्हणून तिला खोलीत बसवून  शेजारी  पाजारी सांगायला निघून गेली ...आणि नेमके हे अमित ने ऐकलं ...आणि नकळत तिला मारत असताना त्याच्या तोंडून सत्य बाहेर पडले ..आता ह्या सत्याचा सामना करायची ताकत नमिता मध्ये आहे कि नाही हे तर पुढचं येणारा कालच ठरवणार होता...


तिला तश्या अवस्थेत पाहून तिची सासू सुद्धा घाबरली होती ..तावातावाणे ती अमित च्या दिशेने गेली आणि त्याला तिने जाब विचारला....,


"अमित अरे ती जर पोटुशी असेल तर तुझंच बाळ जाईल ना ..मूर्ख कुठचा .."


"हे म्हातारे ...नको ती स्वप्ने पाहू नकोस ..तू कधीच आजी होऊ शकत नाही ...मी बापच बनू शकत नाही ..हिने कुठे शेण खाल्लं आहे ते बघ आधी ...?"

दारूच्या नशेत तो बोलून गेला....हे ऐकून नमिताच्या सासूच्या पायाखालची जमीन हलली...


"अमित काय बोलतोस कळतंय का तुला ?"

"हो चांगलंच कळतंय ..काही वर्षांपूर्वी मी टेस्ट करून घेतल्या होत्या ..ज्यात स्पष्ट होत कि मी बाप बानू शकत नाही ..मग हि गरोदर राहीलच कशी ..विचार आता तुझ्या लाडक्या सुनेला कुठे शेण खाऊन आली आहे .ते
... आणि कुणाचं पाप तिच्या पोटात वाढत आहे......."

हे ऐकून ती मटकन खाली बसली...व डोक्याला हात लावून विचारात पडली....


" पण अमित ती पोटूशी नसेल तर.....? "

तस दचकून त्याने त्याच्या आई कडे पाहिलं....


"पण तूच म्हणालीस ना..."


"अरे मी फक्त अंदाज बांधला.. पण तू... एवढं मोठं सत्य लपवलंस कस...."


"मग काय करू... माझ्या नामर्द पणा चा दाखला देत गावभर फिरू....."

आणखी एक पेग लागावत तो म्हणाला....

तेवढ्यात डोकं पकडून नमिता बाहेर आली... आणि आपल्या सासू जवळ कशी तरी जाऊन ....


" सासूबाई... ह्यांनी फसवलं मला... मी वांझ नाही आहे... "

ती रडत म्हणाली....

"हे बघ तो दारू च्या नशेत काहीही बोलतोय... तू नको विश्वास ठेऊस आणि कुणाला बोलू नकोस.... चल आपण डॉक्टर कडे जाऊ..... "

तिची सासू तिला समजावत हाताला धरून नेत म्हणाली..

" नाही... सासूबाई... एक धक्का मी पचवला आहे दुसरा नाही.. मी सगळ्यांना सांगेन... मी नाही अमित नामर्द.....


तिचं बोलणे पूर्ण व्हायच्या आतच एक जोरात लाथ तिच्या कमरेत बसली.... आणि ती दरवाजा वर आपटून तिच्या डोक्याला लागलं आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.....


" साली.... मला नामर्द बोलते.... "


आणि त्याने परत तिला दोन लाथा मारल्या.. पण ती निपचित पडली होती.. ते पाहून तिची सासू पुढे आली...


" अमित थांब... ती मरेल.... "

त्याला थांबवत ती म्हणाली...


"मरू दे.... त्याच लायकीची आहे ती...."

तो मागे सरकून बोलला...

"अरे पण तू जेल मध्ये जाशील त्याच काय....??"

असं म्हणून तिची सासू नमिता जवळ जाऊन तिला उठवू लागली...पण तो घाव एवढा होता कि नमिता चा त्यात जीव गेला... ती निपचित पडली होती....


"अरे देवा...! हे काय झालं....?"

काय झालं??"


अरे हिचा श्वास चालू नाही... बहुतेक...

तिने परत डोक्याला हात लावला...

ते ऐकून एका झटक्यात त्याची सगळी नशा उतरली आणि नमिता जवळ जाऊन त्याने हाताची नस बघितली... आणि तसाच घाबरून मागे सरकला.....


आई मला वाचव.. मला नाही जेल मध्ये जायचं....


असं म्हणून तिचा हात पकडून तो रडू लागला....थोडा वेळ दोघ ही शांत होते...तस काहीतरी सुचून त्याची आई म्हणाली....


"आपण हिला पेटवून टाकू... आणि बाळ होत नाही म्हणून पेटवून घेतलं असं लोकांना सांगू.... जा रॉकेल आण..... "


तस तो निर्लज्ज पणे उठला आणि बाहेर ठेवलेला रॉकेल चा कॅन घेऊन आला...तस दोघांनी तिला उचलून पडवीत नेलं.... आजूबाजूला पाहून त्या दोघांनी तिच्यावर तो कॅन खाली केला.... आणि एक काडी टाकली.. तस आगीने पेट घेतला... आणि हे दोघे बाहेर येऊन ओरडू लागले....


"वाचवा.... वाचवा.... कुणी तरी वाचवा.... माझ्या सुनेने बाळ होत नाही म्हणून स्वतःला जाळून घेतलं..... "


लोक जमली... पण तोपर्यंत सगळं जळून गेलं होत... आणि अमित ला सहानुभूती मिळत होती.... नमिता सोबत त्याच ते सत्य पण जळून गेलं....


खरं काय ते कधीच कुणाला समजलं नाही... बिचारी नमिता सुख काय तिच्या वाट्याला आलेच नाही... आणि ज्याने गुन्हा केला तो उजळ माथ्याने दुसऱ्या लग्नासाठी तयार झाला.....

तेव्हा आपल्या लेकीला लग्न झालं कि माहेरचे दरवाजे बंद असं कधीच बोलू नका.. तिला सांगा हे सुद्धा तुझ्या हक्काचं घर आहे.. तुझ्यावर अत्याचार झाला तर बिन्दास्त निघून ये... तुझा बाप तुला पोसायला समर्थ आहे.....


समाप्त

🎭 Series Post

View all