बहर प्रीतीचा भाग -५

कर्तव्य आणि श्रद्धा भाव जोपसणाऱ्या दोन जीवांची बहरू पाहणारी प्रेम कहाणी.
भाग -५

धावपळ करत कशीतरी ती शेवटी इंटरव्यू साठी पोहचते, पण तिला खूप टेन्शन आलेलं असतं. ती सारखे पाय हलवत असते, हात चोळत असते आणि स्वतः चा नंबर येण्याची वाट बघत असते.

शेवटी तिचा नंबर येतो आणि आत जाते. समोर वृषभ चे बाबा बसलेले असतात. ते तिची माहिती वगैरे विचारतात आणि दुसऱ्या फेरीसाठी तिला थांबायला सांगतात.

परत तिला हाक मारतात आणि तिथला पिऊन तिला दुसऱ्या केबिन मध्ये घेऊन जातो.

ती आत जाते, पिऊन तिला खुर्चीवर बसायला सांगतात पण तिथं कुणीच नसतं तेव्हा सर येतील थोडावेळात तुम्ही बसा असं सांगून तो सुद्धा निघून जातो.

थोडया वेळाने कुणी आत आल्याचं तिच्या लक्षात येतं. म्हणून ती उठून उभी होते तर आत येणारी व्यक्ती वृषभ च असतो.

"तु???चक्क इथं??"वृषभ थोडासा आनंदात आणि थोडा आश्चर्यात तिला विचारतो.

"हो अरे, त्या दिवशी नाही का तुला भेटायला आले होते तेव्हा इथं एक जागा असल्याच समजलं म्हणून मग म्हंटल प्रयत्न करावे आणि म्हणून आज मी इथं." सावी उत्तर देते.

"अच्छा खूपच गतिशील निघालीस यार तु.वाह्ह हे आवडलं आपल्याला, बरं दाखवा तुमचा बायोडाटा." वृषभ बोलू लागतो.

"हो सर "असं म्हणत ती कागद समोर धरते.

"वाह्ह छान चांगल्या गुणांनी पास केलंय बी. एस. सी. अरे वाह्ह संगणक पण शिकल्या आहात.पण पोस्ट ग्रॅज्युएट का नाही केलंत?" तो विचारू लागतो.

"काही परिवारीक कारणांमुळे नाही जमलं, पण ईच्छा आहे शिक्षण सुरु ठेवायची " सावी उत्तर देते.

"ठीक आहे पण समजा का इथली नौकरी सुरु करायची असेल तर पुढचं शिक्षण कसं सुरु कराल?"वृषभ तिला शक्य तितके गोंधळणारे प्रश्न विचारून तिला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो.

आणि मग तिचं त त प प सुरु होतं, म्हणून तोच हसतो आणि बोलू लागतो,"अरे इतकं गोंधळून जाऊ नकोस, बाबांनी आधीच तुला इथल्या नौकरी साठी पसंत केलं आहे हो फक्त ती तु आहेस हे मला ठाऊक नव्हतं, मला फक्त एकदा बघायला सांगितलं आणि तु दिसलीस म्हणून मी जरा आपलं खेचायचं ठरवलं इतकंच.."

"म्हणजे हे प्रश्न विचारत राहणं तुला जरा खेचणं वाटतं का? ठीक आहे जाऊदे आता मी बोलणार च नाही."आणि ती उठून निघू लागते.

"अरे वाह्ह हे बरं आहे पार्टी कोण देणार नौकरी ची?"वृषभ तिला विचारतो.

"ए म्हणजे माझी नौकरी पक्की का?अरे खरंच सांगतोय नं?" सावी आनंदाने उड्या मारायच्या बाकी राहते.

"हो बाई, थोडावेळ थांब रुजू होण्यासाठी चं पत्र आताच मिळेल "तो सांगतो.

"स्वामी.. स्वामी खूप खूप धन्यवाद "सावी स्वामींचे आभार मानते.

"हे चांगलं आहे म्हणजे करते धरते आम्ही आणि श्रेय महाराजांना, वाह्ह रे दोस्ती " तो लगेच बोलू लागतो.

"देईल अरे तुला ही पार्टी पण आता मला आधी घरी जाऊन आईला सांगू दे "सावी उत्तरते.

बस बदलवत,धावपळ करत ती घरी येते समोर आई उभी असते तर धावत जाऊन ती आईला बिलगते आणि पेढ्यांचा पुडा आईच्या हातात ठेवत तिला ही आनंदाची बातमी देते.

"वाह्ह माझं शहाणं बाळ गं, खूप खूप अभिनंदन सोन्या.अशीच प्रगती कर आणि या नविन कामात झोकून दे स्वतःला " असं म्हणत त्या सावी चे लाड करतात.

ती हात पाय धुवून देवाला नमस्कार करून लगेच आईला मदत करायला स्वयंपाक घरात जाते.

काम करता करता दोघीही बोलू लागतात.

"काय गं कुठे लागली आहे ही नविन नौकरी? आणि कधी दिलास इंटरव्यू वगैरे?"आई तिला विचारते.

आणि मग मृनू च्या फीस साठी जमवलेले पैसे ते ही नौकरी कशी लागली इथपर्यंत सगळं सविस्तर सावी आईला सांगते बोलता बोलता बऱ्यापैकी त्यांच्यात आता मैत्री कशी झालीये हे ही बोलते.

काम आटोपून जेव्हा ती स्वतःच्या खोलीत येते आणि पलंगावर येऊन पडते तेव्हा तिचं च तिला लक्षात येतं की कुठेतरी ती वृषभ कडे ओढल्या जातेय आणि नेमका तितक्यात तिला त्याच्याच फोन येतो.

"काय मॅडम जेवल्या की आनंदाने च पोट भरलंय तुमचं?", समोरून वृषभ विचारू लागतो.

तिला ही ठाऊक नसतं पण ती जरा लाजऱ्या स्वरातच बोलू लागते,"झालं जेवण आताच, नुकतीच येऊन पडलीये पलंगावर "

"बरं ऐक नं उद्या मला एक काम आहे तिकडेच आणि म्हणून मी सकाळी मठात येतोय तर तुझी हरकत नसेल तर तु सोबत येऊ शकतेस ऑफिस ला "वृषभ सुचवतो.

"बरं हरकत नाही, ऐक नं तुला घरी यायला जमेल का मग सकाळी चहासाठी, नाही झालं असं की आताच आईला मी सगळं सविस्तर सांगितलं त्यामुळे तुझी आणि तिची एकदा भेट झाली असती तर बरं झालं असतं " सावी विचारते.

"काहीच हरकत नाही, भेटू मग उद्या.चल बाय आता ठेवतो ".

"हो चालेल ये मग उद्या, बाय."

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सगळी काम आटोपून सावी तयार असते आणि वृषभ येणार हे आईला सांगूनही ठेवते.

दारावरची बेल वाजल्यावर दार उघडताच त्याला बघून हिच्या डोळ्यात वेगळीच चमक येते.

"नमस्कार काकू मी वृषभ सरपोतदार "तो स्वतःची ओळख सांगतो.

इतका मोठा माणूस तरीही इतके चांगले संस्कार बघून आईला फार कौतुक वाटतं, बोलणं आणि चहा आटोपून दोघे ही निघतात आणि आधी मठात जायचं ठरवतात.

फुलं घेऊन दोघेही पादुकांवर अर्पण करतात आणि नमस्कार करतात, नेहमीचे गुरुजी नेमके आज नसतात त्यामुळं ते ह्या दोघांना नविन जोडपं च समजतात आणि दोघांना ही प्रसाद देत बोलून जातात,"दोघेही सुखाने सोबत रहा ".

ते ऐकून सावी जरा बावरते आणि वृषभ गोंधळतो आणि तो उत्तर देणार तेवढ्यात त्याला फोन येतो म्हणून त्या दोघांना ही निघावं लागतं.

पायऱ्या उतरताना एकदम सावी अडखळते आणि ती पडणार तोच वृषभ तिचा तोल सांभाळतो आणि तिला पकडतो.

दोघांची जी नजरानजर होते त्यात वेगळीच चमक असते. दोघेही बावरतात,गोंधळतात. तिला सावरताना तिच्या कमरे भोवती वेढलेली त्याची पकड तो अलगद सैल करतो आणि सावी ही सावरते.

"बरी आहेस ना तु?", वृषभ तिला विचारतो.

ओढणी सावरत ती फक्त "हो " इतकंच उत्तर देते.

दोघेही शांत होतात, पण ऑफिस ला पोहचेपरेंत दोघेही एकमेकांशी बोलत नाही. दोघांनाही एक अनपेक्षित चाहूल त्यांच्या मनाने दिलेली असते.

ऑफिस आल्यावर उतरताना सावी मागच्या सीट वरची तिची बॅग घ्यायला जाते आणि परत एकदा या दोघांची डोकी एकमेकांवर धडकतात.

"काय यार तु जरा थांबायचं ना, आधी मी उचलली असती माझी बॅग आणि नंतर तु तुझी तर काय बिघडलं असतं", वृषभ सावी ला बोलू लागतो आणि ती दोघे ही हसू लागतात.

अशीच असते का बहणारी प्रीती, अनोळखी ते मैत्री अन मैत्री ते प्रेमाची चाहूल...... दोघांच्याही मनात ह्या नविन जाणीवेबद्दल एकच विचार येतो आणि एकमेकांना न दर्शवता ती दोघे या नविन नात्याच्या गोड चाहुली साठी स्वामींचे मनोमन आभार च मानतात. कारण अनपेक्षित पणे का होईना सकाळी गुरुजींनी दिलेला आशीर्वाद ही त्यांचीच ईच्छा हे त्या दोघांनाही मनापासून वाटतं आणि म्हणून च ह्या नव्या सुरवातीसाठी दोघंही आडमार्गाने का होईना पण नजरेतून तरी एकमेकांना होकार च देतात.


अंतिम
©®भाग्यश्री हर्षवर्धन.

🎭 Series Post

View all