Login

नाते बहीण भावाचे

बहिण भावाचे अनोखे बंधन
अनोखे बंधन है
युगायुगाच्या प्रेमाचे
अनंत काय चालते
नाते बहीण भावाचे...

रुसवा भगव्याचे हे खेळ
दोघेही मिळूनी खेळतात
विविध विषय काढून
एकमेकांना सतत खेळतात...

रक्षाबंधनाचा हा सण
दोघांनाही खूप भावतो
बापानंतर भाऊ आपला
पाठीशी खंबीर उभा राहतो...

लग्न करूनही बहीण
जेव्हा जाते तिच्या सासरी
कावरा बावरा होतो भाऊ
सुनी वाटते सारी ओसरी...

तुझा आशिर्वाद देवा
कायम असाच असू दे
माझ्या प्रेमळ भावाला
दीर्घ आयुष्य लाभू दे...