अर्धांगिनी - भाग-4
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शर्वरी दुबईला एका घरात होती, तिला जाग आल्यावर तिचं डोकं खूप दुखतं होतं..
एक माणूस आसिफ आत येऊन बोलला,
"आता ऐक. तू गेले अठरा तास बेशुद्ध होतीस. आणि"मी काय बोलतो आहे, ते शांतपणे ऐक."
समिरला मी वीस लाख दिलेत, तुला माझ्याकडे विकून माझ्याकडून वीस लाख रुपये घेऊन तो परत गेलाय पुण्याला. तुला विकलय त्याने मला." एवढं बोलून तो निघून गेला.
मला काय मिळणार होतं प्रतिकार करून. माझी इथून सुटका होणार नव्हती, आसिफच्या आवाजावरून, बोलण्यावरून तेवढं कळलं होतं मला.
समिरने माझ्या घरच्यांचा कसा विचार केला नाही? आई - बाबा मला शोधतं असतील, रडतं असतील आणि अशा विचारांच्यामध्ये मी कधी पुन्हा झोपी गेले मला कळलंच नाही.
त्या ग्लानीतून मी जागी झाले, पाहिले तर एक मुस्लिम मुलगी माझ्या बाजूलाच बसली होती. तो आसिफ आजूबाजूला कुठेच नव्हता. मला थोडे बरे वाटले.
मला जाग आलेली पाहून त्या मुलीने मला म्हंटल, जा अंघोळ करून घे, इकडे आत बाथरूम आहे असं म्हणून ती माझ्याकडे पाठ करून उभी राहिली. त्या गरम पाण्यासोबत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
माझ्या आयुष्यभराच्या तुरुंगवासाला आता सुरुवात झाली होती. मला जाणवले होते की माझी आता इथून सुटका होणे अशक्य. मी हुंदके देऊन रडू लागले.
माझ्या रडण्याचा आवाज ऐकून ती मुलगी पुन्हा मागे वळली, आणि तीने मला जवळ घेतले, मला बाहेर नेले., तीने कपाटातून मला कपडे काढून दिले. आणि मी कपडे बदलेपर्यंत ती एका साईटला उभी राहिली.
मी सतत रडत होती ते बघून ती शांत होती, आणि तीने माझे हात हातात घेतले आणि माझ्याकडे बघून म्हणाली धीर धर...सगळं नीट होईल.
थोडा वेळ असाच गेला. दार उघडून आसिफ आत आला, तसे ती मुलगी आयशा उठून निघून गेली.
आसिफ माझ्यासमोर खुर्ची घेऊन बसला. "शर्वरी मला कल्पना आहे तुला खूप धक्का बसला आहे पण तू आता कायम इथेच राहणार, आता तुझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही.
तुला तुझ्या आवडीप्रमाणे जेवण मिळेल, पण याच खोलीत. तुला इथून बाहेर पडता येणार नाही.
ह्या खोलीत काय होतं ह्यावर माझं लक्ष आहे. तू पळून जायचा प्रयत्न केल्यास तर तुला मी काही इजा करणार नाही. पण तुझा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही..
तो बोलत होता, मी मान खाली घालून ऐकत होते.
आसिफ बाहेर गेला तशी ती मुलगी आयशा आत आली. मला तशी काहीच खायची इच्छा नव्हती. पण आयशाने जबरदस्ती खा खा करायला सुरुवात केली.
तीने जेवण आणलं होतं, डाळ- भात, चपाती- भाजी असं, मी ते जेवण अर्धेसुद्धा संपवले नसेल आणि मला पुन्हा रडायला यायला लागलं.
काय करायचं आता, कशी सुटका होणार इथून, स्वतःला हे दोन प्रश्न विचारत मी नुसतीच बसून राहिले, इथे अडकले म्हणजे मरेपर्यंत तुरुंगवास? त्यापेक्षा मेलेलं काय वाईट. पण आत्महत्या करायलाही काही संधी ठेवली नव्हती ह्या आसिफने..
काय विचित्र तुरुंग आहे हा, त्या रूममध्ये पंखा होता, आणि एक टीव्ही होता, जरा रिलॅक्स व्हावं म्हणून मी टीव्ही लावला..
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- शर्वरीकडून आसिफला काय हवं होतं, आणि त्याने तिला कशासाठी इथे अडकवलं होतं)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
(सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही")
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा