Login

अर्धांगिनी - भाग - 6

Bayko

अर्धांगिनी - भाग- 6


दीर्घकथा लेखन स्पर्धा


    दुपारी जेवताना आसिफ आत आला, आणि त्याने मला विचारले, आयशाला काय विचारत होतीस, कां आणलेय तुला इथे..


तुझ्याशी कोण काय बोलतं ते मला ऐकू येण्यासाठी, मी ह्या खोलीत मायक्रोफोन बसवलेत त्यामुळे कोण काय बोलतं ते सगळं मला कळतं, कॅमेरा नाही आहे इथे.


मी तुला इथे तुझ्या मनाविरुद्ध डांबून ठेवलं आहे पण त्याचा अर्थ असा नव्हे की मी तुझा गैरफायदा घेईन.

मी तुला हे सांगतोय कारण तुला कळायला हव की माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे, आणि तू जर स्वतःच्या ताकदीचा वापर केलास तर.. मात्र मी तुला सोडणार नाही...


आणि आणखीन एक -इथून पळून जाण्याचा वेडेपणा पण कधीच करू नकोस, अजून फसशील ह्यात...

मी ओरडून म्हणाले-  तू माझं काय करायचं ठरवलं आहेस?


आसिफ बोलू लागला -मी फक्त तुला इथे डांबून ठेवलं आहे. तुला मारलं सुद्धा नाही आहे मी अजून आणि तुला परत जाऊ देणं कधीच शक्य नाही... मी खूप प्रेम करतो ग तुझ्यावर...

मी चिडून बोलले- नीच माणसा, जा निघ इथून...आसिफ निघून गेला आणि मी रडतंचं विचार करत होते..

दादा, बाबांनी नक्की पोलिसात तक्रार केली असणार, मी कुठे आहे ते कधी आणि कसं कळणार त्यांना, घरच्यांना नको रे त्रास देऊ देवा. काय चालू आहे हे माझ्या आयुष्यात.


साधं आयुष्य जगणारी माणसं आहेत आई - बाबा, माझ्या हरवण्यामुळे खचली असतील ती दोघं पण, कायं होतय हे माझ्यासोबत?


     काही लोक चुकीचं पण बोलत असतील - असंही म्हणतं असतील ना तुमची मुलगी कोणाबरोबर तरी पळून पण गेली असेल...का माझ्याचंसोबत असं का व्हावं? लोक माझ्या बाबतीत तर्क- वितर्क लावत असतील ना...


     मी रडून आणि विचार करून हैराण झाले होते.. आणि एकाएकी माझ्या मनात विचार आला ह्या आसिफ आणि आयशाला मुलं नाही आहे बहुतेक... कां काय प्रॉब्लेम असेल कां, आणि त्या कारणासाठीच तर ह्या आसिफने मला विकत घेतले नसेल ना...


    तो इथे मला तीन महिने होऊनही कसलीही जबरदस्ती करत नाही आहे, म्हणजे त्याला गोडी- गुलाबीने सगळं झालेलं हवं आहे...   मी घाबरून देवाला स्मरून गणपती स्तोत्र म्हणू लागले.


     स्तोत्र संपवून मी डोळे उघडले, आसिफ हसर्‍या चेहर्‍याने बेडवर बसला होता.


     तू छान म्हणतं होतीस म्हणून ऐकत बसलो, तुझा सहवास हवाय मला,आणि तो पण प्रेमाने, असं बोलून तो हसून निघून गेला.


मला आश्चर्य वाटत होतं हा आसिफ असा काय ह्याला कळतंच नाही आहे,  तो कितीही चांगला वागला तरी मला आनंद होणार नाही आहे.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- शर्वरी जसा विचार करतेय, तसंचं काही कारण असेल कां )

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all