अर्धांगिनी - भाग - 8
असिफने मी एवढ्या लवकरच हा बोलेन ह्याची कल्पना ही केली नसेल, तो खूप खुश होऊन रूमच्या बाहेर पडला, मी तिथेच बेडवर बसून विचार करत राहिले.
मी कांय करायचं आणि कसं वागायचं ह्याचा विचार करू लागले, मी आसिफशी जास्तीत जास्त बोलण्याचा विचार करू लागले, मी विचार केला की मी त्याच्याशी जवळीक साधेन, पण माझं मन कचरत होतं, पण कांय करणार तरी कांय होते मी, त्याला शरण जाण्याशिवाय सध्यातरी मला दुसरा कुठलाचं पर्याय दिसत नव्हता.
मी दुसऱ्या दिवशी सकाळी आसिफ मला भेटायला आला तेव्हा त्याला म्हंटल, तु रोज रात्री जेवताना माझ्याबरोबर गप्पा मारायला येशील, आयशा जेवण घेऊन येते, पण गप्प असते, एकटीच्याने जेवण जातं नाही मला, प्लीज ये ना." असं बोलून मी थोडेशी त्याच्याजवळ सरकले, आणि मी रात्री जेवताना तुझी वाट पाहेन असंही त्याला म्हंटले.
तो माझ्या वाक्यावर अचंबित होऊन माझ्याकडे पाहत राहिला आणि पुढच्या मिनिटाला तो निघाला. दाराकडे जाऊन मागे वळून त्याने मला म्हंटल, नक्की येतो मी आज जेवताना तुला सोबत दयायला.
आसिफ त्या रात्री स्वतः जेवण घेऊन रूममध्ये आला, मी त्याला इकडं तिकडंच्या गप्पा मारून बोलतं केलं, आणि विचारलं आयशा तुझी बायको असताना तु मला असं तुमच्या घरी कां आणून ठेवलं आहेस, एवढी कोणती अडचण आली आहे की तुला तूझ्या संसारात कोणा दुसरीला आणावंसं वाटलं, आणि तेही स्वतःच्याचं घरात...
आयशावर तुझा एवढा राग कां...चांगली आहे ती खूप.
शांत पण आहे ती..बिचारी एक शब्दही बोलतं नाही... घरी दिवसभर काम करत राहते कोणाशीच फोनवर जास्त वेळ पण बोलतं राहत नाही ती...
शांत पण आहे ती..बिचारी एक शब्दही बोलतं नाही... घरी दिवसभर काम करत राहते कोणाशीच फोनवर जास्त वेळ पण बोलतं राहत नाही ती...
आसिफ म्हणाला-" तुला कोणी सांगितलं ती मला आवडतं नाही म्हणून कोण म्हणतं माझा राग आहे तिच्यावर? ती माझी अर्धांगिनी आहे आणि संसार पण सुखाचा करते आहे, माझ्या आई- वडिलांना, बहिणींना पाकिस्तानला फोन करून नेहमी त्यांची चौकशी पण करते..गुणी आहे ती...
पण मग कांयं कमी आहे तिच्यात, तू तीच्या भावनांशी कां खेळतो आहेस मग....असं मी विचारलं तेव्हा आसिफ गप्प झाला आणि थोड्या वेळाने बोलला..
"आता जेव आणि झोप तु.... खूप विचार करू नकोसं."
"आता जेव आणि झोप तु.... खूप विचार करू नकोसं."
आसिफ निघून गेला आणि मी विचारात पडले, कांय चाललं आहे ह्या माणसाच्या मनात. कांय प्लॅन आहे ह्याचा. ह्याचं त्याच्या बायकोवर प्रेम आहे पण म्हणतोय..
दिवस असेच जात होते. आता मी आणि आसिफ रात्रीचं जेवण एकत्र घेत होतो. नंतर नंतर तर एकत्र पत्ते पण खेळायला लागलो होतो. मी समजत होते तेवढा हा आसिफ नक्कीच वाईट नव्हता, अगदी एखाद्या मैत्रिणीशी सहज आपण बोलतो तशाच हा माझ्याबरोबर गप्पा मारायचा, पण त्याच्या मनातलं मला कळतं नव्हतं, तो मला इथे कां घेऊन आला आहे हे अजून स्पष्ट होतं नव्हतं.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- शर्वरीच्या आयुष्याची ह्या सगळ्यात कशी वाताहत होते ते )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
( सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही")
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा