Login

अर्धांगिनी - भाग -9

Bayko

अर्धांगिनी - भाग- 9

मी वेड्यासारखं कां वागतेय, असं मी स्वतः ला आरशात पाहून विचारत राहत असे, मी अशीच पडून होते, केलं ते योग्य होतं ना? मलाच माझी कीव येत होती, मी अशी कशी वागू शकले ह्याचीच चीड येत होती, पण दुसरा ऑप्शनचं दिसत नाही आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम उलट झाला आणि मी आता इथे कायमची अडकले तर असं पण वाटू लागलं..

जोरजोरात रडायला येत होतं, म्हणून मी उठले आणि बाथरूम मध्ये गेले, पाण्याचा नळ सुरू केला आणि मनसोक्त रडून घेतलं मी, खूप वेळ रडून झाल्यावर जरा तरी मोकळं वाटलं.


"एकदा आता ठरवलं आहे ते निभावून न्यायचं असं मी स्वतः ला समजावत राहिली, पुढे काय हे भविष्यावर ठेवूया असं मनोमन ठरवून मी प्रयत्न करायचाचं पण प्रयत्नाला यश नाही आलं तर रडत नाही बसायचं."असं मी फायनल केलं आणि माझे डोळे पुन्हा पाण्याने भरले, डोळे पुसले आणि मी पुस्तकं वाचत बसले.



पाच दिवसांनी आसिफ म्हणाला, तुझ्या घरच्यांची खुशाली कळली आहे, सगळेच व्यवस्थित आहेत, तुला शोधणं पण आता त्यांनी बंद केलं आहे, मी खुशीत विचारलं तुला कसं समजलं..

तर आसिफ ओरडून बोलला- "तुला काय करायच आहे मला कसं कळलं. खूप जास्त प्रश्न विचारू नकोसं..

मी गप्प बसले, तो अचानक माझ्या अतिजवळ आला आणि म्हणाला, कळलं ना आता घरचे सगळेच चांगले आहेत ते आता गप्पपणे मला साथ द्यायची, आणि असं बोलतंचं त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला, मला तो स्पर्श अगदी नकोसा झाला, मी त्याच्यापासून लांब जाण्यासाठी प्रयत्न करू लागले.

"आसिफ ओरडून बोलू लागला - शर्वरी,मी अजूनपर्यंत तुझ्यावर जबरदस्ती केलेली नाही आहे, पण तू जर मला साथ दिली नाहीस तर मग ... मला नाईलाजाने जबरदस्ती ही करता येते हे मी तुला दाखवून देईन." त्यामुळे मी तुला अजून दोन दिवस देतोय, त्यापेक्षा जास्त मी थांबणार नाही...

मी ओरडून बोलले पण हे सगळं कां करतो आहेस तू, काय हवयं तुला माझ्याकडून...माझं जरा ऐकून तरी घे ना...

मी अजून थांबू शकत नाही, तुला मला खुश करावंच लागेल, आणि नाही ऐकलंस तर मी तुला मारायला देखील कमी करणार नाही, आणि नुसतं मारणार नाही तुला, तुझी हालत खराब करून टाकेन मी... समजलं तुला, माझ्या चांगुलपणाचा अंत बघू नकोस, नाहीतर मला जबरदस्ती करावी लागेल...मी तुझं काय करू शकतो ह्याची तुला कल्पना देखील नाही आहे, त्यामुळे गुपचूप ऐकायचं माझं...


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- शर्वरीची वाताहत)

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख


( सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"