Login

अर्धांगिनी - भाग -11

Bayko

अर्धांगिनी - भाग -11


काही क्षणांनी तो काहीही न बोलता त्या खोलीतून निघून गेला, मी त्या खोलीत पण तिथेच विचार करत बसून राहिले.


थोड्या वेळाने म्हणजे एक तासाने आसिफ पुन्हा आतं आला आणि मला तीन पुस्तकं हातात देत म्हणाला, तुला पुस्तकं वाचायला आवडतात नां... म्हणून हे तुझ्यासाठी गिफ्ट...


"आहे ना गिफ्ट खूप छान, खास माझ्याकडून तुला आवडणारी मोटीवेशनल बुक्स... मी ती पुस्तके हातात घेऊन हसत थँक्स म्हंटल.." त्याने पटकन मला जवळ घेऊन माझं चुंबन घेतलं, आणि तो हसत हसत बाहेर गेला.


जे चाललं आहे, आणि हा आसिफ जे वागतोय त्याबद्दल काही विचार करायचा नाही, जे होतय ते होऊ द्यायचं आहे ते स्वीकारायचं असं मी स्वतःला सांगत होते.


थोड्या वेळाने आयशा जेवण घेऊन आली आणि तिने टेबलवर जेवण ठेवले आणि तीच्या पाठोपाठ आसिफ आत आला तो आल्यावर आयशा पटकन लगबगीने बाहेर गेली, आत आल्यावर त्याने हसत म्हंटल, आज तुम्हा महाराष्ट्रीयन लोकांच्या आवडीचा मेनू आहे....


मी कांय असं विचारल्यावर तो म्हणाला..

उकडीचे मोदक...खास तुझ्यासाठी ऑर्डर केलेत...


"त्याने माझ्यासमोर ती मोदकांची डीश धरली. आणि हसून तो माझ्याशी गप्पा मारत जेवू लागला...


आसिफ उत्साहाने त्याच्या बिजनेसबद्द्दल त्याच्या यशाबद्दल सांगू लागला.अगदी खूप प्रेमाने तो मला मध्येच एखादा घासही भरवतं होता, हा आसिफ मोदक खाऊन आपला आनंद सेलिब्रेट करत होता आणि त्याच क्षणी मी विचारात गढले होते.


एवढ्या मोठ्या बिजनेसमनला काय कमतरता असेल आणि कसली, पण कोणत्याही निष्कर्षाला मी कशी पोहोचणार होते? मला आसिफ बद्दल काहीच माहित नव्हतं. 


तो स्वतःच्याच आनंदात मला काही काही सांगत होता. आणि माझं लक्षच नव्हतं तो काय बोलत होता त्याकडे. मी हाच विचार करत होते हा असा कसा?मी त्याचं वागणं बघून थक्क होते.


काय करावं सुचेना, त्याच्या स्वाधीन होणं मला मान्य करावंच लागणार होतं, कुठल्या धर्मसंकटात मी अडकले होते, कां देवा माझी एवढी परीक्षा बघतो आहेस असं मी देवाला मनात बोलू लागले.


मला वेळ हवा होता, शारिरिक जवळीक साधण्यासाठी मी कशी स्वतःला तयार करणार होते.

तो मध्येच म्हणाला... शर्वरी अरे केव्हाचा मीच बोलतो आहे. तु गप्प कां..मी नाही बोल नां मी ऐकतेय असं बोलून गप्प बसले.....थोड्या वेळाने आसिफ निघून गेला पण माझ्या मनात त्याच्याबद्दल अचानक चांगले विचार येऊ लागले..


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- शर्वरी कशी आसिफच्या गोड बोलण्याला फसते.)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all