अर्धांगिनी - भाग -16
दीर्घकथा लेखन स्पर्धा
आसिफने मला गाणी ऐकण्यासाठी टेपरेकॉर्डर आणून दिला, देवाची गाणी ऐक, आनंदी राहा गं, बेबी नीट वाढलं पाहिजे, त्याला सांभाळणं तूझ्या हातात आहे असं तो काहिबाही बोलत राही. त्याच्या ह्या रोजच्या वाक्यांनी मी बोर होतं होती, पण त्याचं ऐकण्यावाचून दुसरा पर्याय तरी कुठे होता, ती आयशा पण अशीच नुसती मला जपत राहत असे.
पाचव्या महिन्यात आसिफ मला एके दिवशी म्हणाला, आपण तुझी उदया सोनोग्राफी करायला जाऊया, आणि मग येताना मी तुला फिरायला नेतो हा, मस्त मॉल, रेस्टॉरंट असं सगळीकडे जाऊया आपण, पण तु पूर्णपणे स्वतःला झाकून घ्यायचं आहेस, मी बरं म्हणाले आणि तो निघून गेला.
मी विचार करत बसले, कांय आहेत ही नवरा- बायको... स्वतःच्या खुशीसाठी ह्यांनी माझा बळी दिला. मुलं असणं म्हणजेच स्वर्सव असं मानणारी आहेत ही दोघं...
माझ्या पोटातलं बाळ मला नकोसं होतं, त्यामुळे मी माझी काळजी घेत नसे, बिन्दास्त चालत असे, मग आयशा ओरडत असे अगं अशावेळी बाईने हळूच चालावं...पाय टाकताना जपून टाकत जा, स्वतःला संभाळून चाल...
पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीसाठी ह्यावेळी आसिफ आणि मी असे दोघेच गेलो, आयशा ह्यावेळी आली नव्हती, तीला ताप आल्यामुळे अंगात कणकण होती, त्यामुळे ती घरी राहिली.
सोनोग्राफीमध्ये सगळं नीट आहे कळल्यावर आसिफ गाडीत येऊन या अल्ला, सब खैरीयत है, असं म्हणून देवाला पाया पडू लागला. त्यादिवशी तो मला एका मोठ्या मॉलला घेऊन गेला, मला गरोदरपणात घालण्यासाठी त्याने आठ, दहा लूज ड्रेस घेतले, मला नेलपेंट, लिपस्टिक अशा खूप वस्तू पण तो घेत राहिला, मी गप्पच होते, तो मला सतत बरी आहेस नां असं विचारत होता, मी हो म्हणून गप्प बसे.
असं मनात आलं की इथून पळावं आणि जीव द्यावा कुठेतरी जाऊन, पण आसिफ माझा हात घट्ट पकडूनच होता, त्याला फसवून कशी पळणार होते मी, खरेदी झाल्यावर आसिफ मला एका मोठया रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेला, तो माझ्याशी मी त्याची बायको असल्यासारखंचं वागत होता.
जेवून झाल्यावर तो मला एका सोनराच्या दुकानात घेवून गेला आणि मला एक जाडसर सोन्याची चैन त्याने घेतली आणि ती देताना मला म्हणाला, एवढी मोठी ख़ुशी मला दिल्याबद्दल तुला हे गिफ्ट...
मी मनात म्हणत होते, कसली ख़ुशी नी कसलं कांय हे बाळं जगूच नये असं मला आतून खुप वाटतंय, पण नशिबाने हे बाळं वाढतंय, ह्याच्या जन्माने तरी मी सुटेन ही एकाचं आशा माझ्या मनात होती..
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - बाळं जन्माला आल्यावर काय होतं ते )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा