अर्धांगिनी - भाग - 23
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मुलं जाऊन सहा महिने झाले होते, गेल्या महिन्यापासून आसिफ काहीच झाले नाही अशा अविरभावात असे, मी मनात म्हणत असे अरे नीच माणसा असा कसा रे तू, आणि ती आयशा पण पुन्हा पहिल्यासारखी वागायला लागली, मी इथे अडकून दोन वर्ष पूर्ण झाली होती.
मी एवढे दिवस ह्या एकाच रूममध्ये अडकून होते, गरोदरपणात तेवढे पाच महिने ते नऊ महिने ह्या लोकांनी मला घरात सगळीकडे फिरायची परवानगी दिली होती, मुलं गेल्यावर मात्र मला पुन्हा बंदी केलं, नशिबाला कोसून आणि रडून माझ्या डोळ्यातलं पाणी पण सुकतं आलं होतं, चेहरा अगदी कोमेजून गेला होता.
एके दिवशी कां कोण जाणो पण आयशाने मला हात मिळवून म्हंटल ही घे तुला कॅडबरी, मी तीला म्हंटल कां गं आज अचानक कॅडबरी, तर ती म्हणाली अगं आज तुझा बर्थडे आहे नां, आसिफने तूझ्या पेपर्सवर बघितलं.
मी मनात म्हंटल, इथे येऊन दोन वर्ष झाले, कॅलेंडर पहिलं आहे कुठे मी, वाढदिवस पण विसरले मी दोन वर्ष, आई - बाबा, दादा वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आठवणीने रडतं असतील नां, माझा कंठ अगदी दाटून आला आणि मी जोरात रडायला लागले.
आयशाने मला जवळ घेऊन थोपटलं आणि म्हणाली, शर्वरी प्लिज अजून एकचं चान्स घेऊ आणि मग तुला सोडू आम्ही, मग तू मोकळी होशील, देवाने आम्हाला सुखं, भरपूर संपत्ती, बंगला, गाडी सगळं दिलं पण मुलाचं दान तो आमच्या पदरात दयायला विसरला बघ.
मी कमनशिबी बाई आहे, माझ्यात प्रॉब्लेम आहे मी कधीच आई होऊ शकत नाही, आणि आसिफचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्याला मला आई होण्याचं सुखं घेताना पाहायचं आहे, माझ्या अंगावर मुलं खेळवताना त्याला मला बघायची इच्छा आहे आणि आसिफला दत्तक मुलं- म्हणजे दुसऱ्या कोणाच्या रक्ताचं मुलं नको आहे, तो स्वतःच मुलं हवं असा हट्ट धरून बसला आहे, आणि त्याच्या हट्टापुढे माझं काहीच चालत नाही आह ेआणि आयशा रडू लागली.
मी म्हंटल पण मग तुम्ही सरोगेसी करायची नां असंही सरोगेट मदर कोणीही मिळालीच असती नां, माझा कां बळी दिलात तुम्ही...
त्यावर आयशा म्हणाली आसिफला सुसंस्कृत घरातली, कधीही वाईट मार्गांला नं गेलेली मुलगी हवी होती आणि ती मुलगी गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून त्याला त्याच्या नजरेसमोर पाहिजे होती.. म्हणून तुझी निवड केली.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - आयशा शर्वरीला अजून काय सांगते ते)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुखं
देवरुखं
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा