Login

अर्धांगिनी - भाग -25

Bayko
अर्धांगिनी - भाग -25


दीर्घकथा लेखनस्पर्धा


     मला तिसावं वर्ष लागलं होतं, बाळं जाऊन आता नऊ महिने झाले होते, आताशा पुन्हा आसिफ आणि आयशा माझ्याशी खूप चांगले वागत होते आणि दहाव्या महिन्यात आसिफने मला भुलवून पुन्हा बाळासाठी प्रयत्न केला आणि असं तो सतत सहा महिने माझ्यावर जबरदस्ती करत राहिला. मी रोज रडतं असे, पण माझं ऐकणार तिथे कोणीच नव्हतं.


     आठ महिन्यांनी मी पुन्हा गरोदर राहिले, ह्यावेळी ते दोघेही माझी अतीच काळजी घेऊ लागले, मला अगदी फुलासारखी जपत होते, मला नजरेआड करत नव्हते.


आयशा सतत माझ्याबरोबर असे, मला मनापासून हे सगळं नको होतं, खूप जड जातं होतं हे सगळं, पण मला इथून सोडवणार कोणीच नव्हतं.


   पण पाचवा महिना लागला आणि मला एके दिवशी अचानक ब्लीडींग चालू झालं, मी घाबरून आयशाला आत बोलवलं, मला पटकन हॉस्पिटलला नेण्यात आलं, सोनोग्राफीमध्ये गोंधळ दिसू लागला, बाळं ऑफ झालं होतं.


     आसिफ आणि आयशा.... डॉक्टर आम्ही तिची नीट काळजी घेत होतो असं कसं झालं असं बोलून अक्षरशः रडू लागले, आयशाला तर ते ऐकूनचं चक्कर येऊ लागली, ती स्वतः ला सावरू शकत नव्हती.


   मी मनातल्या मनात म्हणाले, माझ्या आयुष्याचा खेळ केलात नां आता देवचं तुम्हाला शिक्षा देतोय, मला ऍडमिट करण्यात आलं.


आयशा त्या डॉक्टरला बोलू लागली प्लिज असं नाही होणार पुन्हा एकदा स्कॅन करा, पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली तोच निर्णय पुन्हा डॉक्टरांनी दिला,बाळ गेलं आहे...हे शब्द डॉक्टरांच्या तोंडून ऐकल्यावर मला मनापासून खूप आनंद झाला.


    ह्यावेळी कां कोण जाणो पण मी सतत देवाचा धावा करत होते, आणि देवाला सांगत होते देवा मला मदत कर इथून सुटण्यासाठी, मला इथे अडकून पाचवं वर्ष झालं होत.


   माझं अबोर्शन करण्यात आलं, ह्यावेळी मुलगी होती, मला कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे मला अजून दोन दिवस ऍडमिट करण्यात आलं.


आणि ह्यावेळी देवाने माझं ऐकलं होतं, एकेदिवशी मला एका नर्सला दुसरी नर्स अरुणा असं म्हणताना ऐकू आलं मी मनात म्हंटल....अरुणा मराठी नावं... मी मनोमन खूप खुश झाले, कोणीतरी मराठी आहेे याचं मला खूप समाधान वाटलं.


मी दुस्र्याचं दिवशी आयशा आणि आसिफ जवळ नसताना अरुणाला हाक मारली, आणि मी मराठीत अरुणा जरा इकडे ये नां असं बोलल्यावर ती पण खुश होऊन पटकन माझ्याशी बोलायला माझ्या बेडजवळ आली.


(कथेचा मध्यंतर झाला आहे, पुढे येणाऱ्या पंचवीस भागात आपण बघणार आहोत शर्वरी उशिरा कां होईना पण अरुणाच्या मदतीने इथून कशी सुटते ते.)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
0

🎭 Series Post

View all