Login

अर्धांगिनी -भाग -27

बायको
अर्धांगिनी - भाग -27


मला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं, आयशा आणि आसिफ खूपच चिंतीत होते, आता माझं काय हा प्रश्न त्यांना पुन्हा पडला असणार, आम्ही घरी आलो तेव्हा रात्र झाली होती, मदतनीस बाई अजूनही घरी कामाला होत्या, त्यांनी मला रूममध्ये जेवण आणून दिलं, मी जेवले आणि झोपायचा प्रयत्न करू लागले, अरुणा मदत करेल असं ह्यावेळी मनापासून वाटतं होतं.



सकाळपर्यंत मला कोणीच भेटायला आले नाहीत. मदतनीस बाईच मला नाश्ता, जेवण आत आणून देत होत्या, मी रूममध्येचं असे, आयशा - आसिफ मला बघायला चार दिवस आलेच नाहीत, मी मनात म्हणत असे अरे नीच लोकांनो जरा माणुसकी म्हणून तरी माझ्या त्यबेतीबद्दल चौकशी करा रे, माझं अबोर्शन झालं, मी थोडी कां होईना पण वीक झाले आहे, पण ही दोघं भावनाशून्य माणसं होती.


असेच मध्ये दोन महिने गेले, आताशा आयशा आणि आसिफच्या नजरेत मला त्यांचं वागणं वेगळंच दिसें...माझा काहीच उपयोग होणार नाही बहुदा आणि हा मला उगाच ते पोसतायत असं वागत असतं.


एके दिवशी सकाळी आसिफ येऊन म्हणाला -  तुला संध्याकाळी कोणीतरी भेटायला येणार आहे...


मी अचंबून विचारलं मला इथे कोण आणि कशासाठी भेटायला येणार आहे, तो ओरडून म्हणाला... कोणीतरी कंप्लेंट केलीय बहुतेक, आणि तो चिडून बोलू लागला कोणाला आमचं सुखं पाहावंत नाही आहे देवचं जाणो, कोण करतेय हे त्याचं एकदा नावं कळूदेत... आणि तो दोन - चार शिव्या घालून गप्प बसला आणि मग पाच मिनिटांनी पुन्हा बोलायला लागला.


एक साहेब येणार आहेत,  भेटायला आल्यावर तुझी चौकशी करतील...आत्ता मी सांगतोय तेवढंच आणी तेच बोलायचं. तेच तुझ्याही हिताचं आहे आणी आमच्याही, जराही उलट- सुलट बोललीस तर हाल बत्तर होतील हे लक्षात ठेवं- शर्वरी शहाणपणा करायचा नाही..


मी म्हणाले - मला इथून सोडवालं कां, बाकी काहींचं नको,


तू माझं ऐकलस तर आपण सगळेचं सुटू, मी पाठवेन तुला पुन्हा इंडियाला. माझं नाव ह्या प्रकरणात आलं आणि तू उलट सुलट बोललीस तर मेलीस समज तू, असं आसिफ म्हणाला...


मी म्हणाले - मी काय सांगायचं आहे त्या साहेबांनां -


आसिफ म्हणाला - तू माझी दुसरी बायको आहेस आणि तू स्वखुशीने इथे राहते आहेस असं बोलायचं आहे, आणि आमच्या धर्मात जास्त बायका करायला परमिशन आहेच. त्यामुळे त्यांना ते पटेल.


मी गप्प होते ते बघून आसिफ ओरडून बोलला समजतंय नां काय बोलतोय ते. मी हो तू म्हणालास तसंच बोलेन असं म्हंटल तो गुड गर्ल असं म्हणतं माझ्या गालाला हात लावून निघून गेला.



( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरी कशी आणि किती वर्षांनी इथून सुटते.)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all