Login

अर्धांगिनी - भाग -28

Bayko
अर्धांगिनी - भाग - 28


आसिफ निघून गेला आणि मी अरुणानेच हे काम केलं असणार असं मनात म्हणाले, मी खूप खुश झाले होते आनंदाने नाचू की काय असं मला वाटू लागले, पण नंतर क्षणात मला आसिफ म्हणाला ते वाक्य आठवलं, तो उदया साहेब आल्यावर समोरचं असणार होता, आणि त्याच्यासमोर मला तो बोलला तेंच बोलावं लागणार होतं, नाहीतर मला मारून कुठेतरी गाडायला पण हे लोक मागे - पुढे बघणार नाहीत असा मी विचार करू लागले.


मी मनात म्हणाले, बोलतेंच खरं उदया त्या साहेबांना ह्या दोघांची चांगलीच वाट लागुदेत, त्यांना समजूदेत मला कसं इथे ह्यांनी पाच वर्ष डांबून ठेवलं आहे ते.... ह्यांना कां शिक्षा मिळू नये, आता मला ह्यांच्याबद्द्दल चांगल बोलायला सांगतायत, मी इथे आल्यावर ह्यांच्या इथून मला सोडा असं म्हणून अक्षरशः हाता-पाया पडत होते, तेव्हा हयांना माझी दया आली नाही.


मी विचार करतचं बसले, मला आता आई- बाबा, दादा डोळ्यासमोर दिसू लागले, मी सुटणार असंही आतून खूप वाटू लागलं, मी बाप्पा तुझे आभार असं मनात बोलून हात जोडले, माझ्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू आले.


    मी डोळे पुसतं असतानाचं आयशा तिथे आली आणि म्हणू लागली, प्लिज एकदा आम्ही म्हणतोय तसं बोलं प्लिज,मला आपली समजून मदत कर आणि खरचं मी तुला इंडियाला परत पाठवायला मदत करेन, तू जर काही बोललीस तर आसिफला जेल होईल,तो अडकेल ह्या सगळयांत.


तू आमच्या म्हणण्याप्रमाणे बोललीस तर तू म्हणशील तसं होईल आम्ही लवकरच तुला इंडियाला पाठवायची सोय करू.


पण आसिफ ह्यात अडकला तर माझा संसार मोडेल, सगळीकडे नाचक्की होईल, आमची कंपनी बंद पडेल, कोणाला कळू नं देता आम्ही तुला इथे ठेवलं होतं.


आम्हाला वाटलं होतं तुला पहिल्या प्रयत्नात मुलं होईल आणि आम्ही तुला इथून मोकळं करू, पण नियतीच्या मनात कदाचित आम्हाला मुलं होऊ देणेच नव्हते, दोनदा देवाने फसवलं आम्हाला, कदाचित मुलं होण्याचं  दान देवाला आमच्या पदरात घालायचं नाही आहे, प्लिज मला तुझी बहीण किंवा मैत्रीण समज आणि मला मदत कर, मी शब्द देते मी तुला ह्यातून नक्कीच सोडवणार...तुला लवकरच आम्ही इंडियाला पाठवू...



मी बरं....मी काहीच त्या साहेबांना कळू नं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन असं आयशाला म्हंटल."



( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरी आता नाही बोलु शकत काहींचं पण नंतर ती कशी आसिफला ह्या सगळयांत अडकवून इथून सुटते ते.)
0

🎭 Series Post

View all