Login

अर्धांगिनी - भाग -29

बायको

अर्धांगिनी - भाग - 29


आयशा निघून गेल्यावर मी काय करायचं ह्या विचारात पडले, आसिफ म्हणतोय तसंचं बोलायचं कां आणि बरं नाही बोलले तसं तर काय होणार हेही समजत नव्हते, मी रडून काय करू हा विचार करून हैराण झाले.


दुसऱ्या दिवशी सकाळीच आसिफ आत येऊन बोलला...तू जर काही कमी जास्त बोललीसं आणि त्यामुळे मी जर अडकलो ना तर मी तुला सोडणार नाही. सडतं रहा मग आयुष्यभर इथेच...अशी वाट लावेन नां तुझी की कोणीच तुला बघणार नाही...


मी घाबरून रडतं बसले, आसिफ माझं काहीतरी करेल ह्या भीतीने आता मी अजूनच घाबरले होते कारण मला ह्या दोघींना शिक्षा दिल्याशिवाय नक्कीच मरायचं नव्हतं.


आसिफने सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी दोन ऑफिसर घरी आले, मी कां कोण जाणो पण समोर आयशा आणि आसिफ होते म्हणून की काय पण मी आसिफने सांगितले होते तेंच बोलले.


मला बोलताना रडू यायला लागले होते त्यामुळे ते ऑफिसर अजून काही प्रश्न विचारू लागले पण मला अस्वस्थपणामुळे चक्कर येऊ लागली, आणि मी जोरात म्हंटल मी सांगतेय ते खरं आहे.


आसिफ त्या ऑफिसरबरोबर निघून गेला आणि मी आयशाला म्हंटल....आयशा तू म्हणालीस तसंच बोलले मी. आता प्लिज परत पाठव मला.. इथून सुटका नाही हे समजल्यावर मी तुम्हाला वाचवलं आहे....


मी काय वाईट केलं होतं तुझं आणि तुझ्या नवर्‍याचं, भावनाशून्य लोकांनो आता तरी सोडा मला, आणि मी हुंदके देऊन रडायला लागले, आणि ओरडून बोलायला लागले, अरे माझी पाच वर्ष फुकट घालवलीत तुम्ही.


एव्हाना माझं लग्न झालं असतं, माझ्या सासरी असते मी, पण तुम्ही मला फसवून इथे आणलंत, आणि माझी अशी वाट लावलीत, कुठल्या तोंडाने मी पुन्हा जाणार घरी, पाच वर्ष घराबाहेर राहिलेली मुलगी म्हणून लोक कशा नजरेने बघतीलं मला...


आयशा म्हणाली, शर्वरी शांत हो, प्लिज. आणि मला मिठीत घेऊन माझं ती सांत्वन करू लागली.


तेवढ्यात आसिफ आत आला आणि ओरडून म्हणाला, आयशा तुझं जास्तचं प्रेम ओतू जातंय हिच्यावर, आयशा रागाने म्हणाली मला पण आता तुझा राग येतोय, मला तर तुला सोडून जावंस पण वाटतंय...मला नको आहे हे असलं जगणं, ह्या मुलीला त्रास देतोय नां आपण म्हणूनच देव आपली परीक्षा बघतोय.


आयशा तुझी पण जीभ जोरात चालायला लागली आहे कां आज..तुला माहित नाही का मी काय करू शकतो?" आसिफ ओरडून म्हणाला.


आयशा म्हणाली...मला सगळं माहित आहे आणि हे पण माहित आहे की तू काही करणार नाहीस. कारण त्यातचं आपल्या दोघांचं हित आहे.


आणि ह्या शब्दांबरोबर खूप रागाने पण काही न बोलता आसिफ गप्प बसला आणि बाहेर निघून गेला.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरीची सुटका करण्यात तिची अजून कोण मदत करत ते)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all