अर्धांगिनी - भाग -34
असेच दिवस जातं होते, आयशा आता माझी चांगली मैत्रीण झाली होती, ती माझ्या रूममध्ये येऊन माझ्याशी गप्पा मारत असे.
आणि एक महिन्याने घरात सकाळचं गोंधळ ऐकू आला, मी पटकन बाहेर गेले, तरं समजले- आसिफला हार्ट अटॅक आला आहे, त्याला हॉस्पिटलला नेण्याची सर्व घाई करत होते.
आसिफला हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलं, त्याच्या आई- वडिलांना बोलावण्यात आलं, त्याचे आई- वडील आले, सगळ्या टेस्ट करण्यात आल्यावर समजले कि चेस्टमध्ये दोन ब्लॉक आहेत.
आयशा आता पूर्ण दिवस हॉस्पिटललाच असे, चार दिवसांनी ती मला म्हणाली, डोळे बंद करं -एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी...
मी डोळे बंद केल्यावरआयशने माझ्या हातात माझे जाण्यासाठीचे तिकिट आणि पासपोर्ट ठेवले, मी खुश होऊन रडू लागले, तीने मला गच्च मिठी मारली आणि म्हणाली जमलं तर मला माफ कर.
आयशा म्हणाली माझ्या सासूबाईंना तुझी माफी मागायची आहे, त्यांना आत बोलावते हा..
आसिफची आई आत आली आणि माझ्या गालावर हात फिरवून म्हणाली, बाळा- जमलं तर आम्हाला माफ कर, आसिफच्या हट्टापुढे आमचं काहीच चाललं नाही, आमचा नाईलाज होता, आम्हाला माफ कर असं बोलून त्या रडू लागल्या, तुला त्याने सात वर्ष असं डांबून ठेवलं, त्याबद्दल आम्हाला पण दुःख आहे, पण तुझी कोणत्या शब्दात माफी मागावी हेच कळतं नाही आहे, त्यांनी माझ्या हातात दोन सोन्याच्या जाड बांगड्या दिल्या आणि म्हणाल्या, तु आम्हाला माफ तर करू शकणार नाहीस पण तरीही मी तुला इथून खाली हात जाऊ देणार नाही म्हणून हे छोटंसं गिफ्ट..जमलं तर मोठ्या मनाने आम्हाला माफ कर असं बोलून त्या रडतंच बाहेर गेल्या.
आयशा म्हणाली, आसिफ हॉस्पिटलला ऍडमिट आहे म्हणून मी हे सगळं शक्य करू शकले, नाहीतर तो इथे असताना मला हे सगळं जमवणं अवघड होतं, मी म्हणाले अगं पण तो बरा होऊन आल्यावर मी इथे नाही आहे हे समजल्यावर तो चिडेल, गोंधळ घालेल, तुला त्रास देईल.
आयशा म्हणाली, आता जे होईल ते होईल, कारण आता इथे माझी सासूबाई पण साथीला आहे, त्यामुळे आम्ही दोघी मिळून आसिफला हॅन्डल करू...
आयशा निघून गेली, आणि मी माझा पासपोर्ट उघडून पाहिला. त्यावरचं शर्वरी नाव वाचून मला आनंदाने नाचवसं वाटलं, मी खूप खुश झाले, दोन दिवसांनी मी जाणार होते.
दोन दिवसांनी अखेर एवढे वर्ष ज्या दिवसाची वाट पहिली होती तो दिवस उजाडला होता, मी खूप खुश होते, आयशा आणि तिची सासूबाई स्वतः मला सोडायला एअरपोर्टवर आल्या होत्या.
आणि मग सुरु झाला माझा माझ्या घरी जाण्यासाठीचा प्रवास, पण हा नंतरचा प्रवास पण खूप कठीण आहे.
( शर्वरिला अजून काय अडचणी येतात ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत.)
.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा