अर्धांगिनी - भाग- 36
शर्वरी पोलीस स्टेशनला पोचते, तीला खूप रडायला येतं असतं, तिच्याकडे मोबाईल नसतो त्यामुळे तीला कोणाला कॉन्टॅक्ट करता येईना, ती पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथल्या साहेबांना सांगते, मला सात वर्षांपूर्वी पळवून नेण्यातं आलं होतं, आणि ती ते सगळं सांगताना खूप रडतं असते, ते पाहून तिथल्या एक लेडीज कॉन्स्टेबल बोलतात ताई तू शांत हो, काळजी करू नकोसं, तुझ्या घरच्यांचा पत्ता लागेपर्यंत आम्ही तुला महिला आश्रमात ठेवू.
देवाच्या कृपेनें तिची फाईल हाती लागते आणि त्यात तीच्या दादाचा मोबाईल नंबर सापडतो, पोलीस दादाला कॉल करून सांगतात, तुमची बहीण सापडली आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला या. दादा हो मी आलोच बोलून फोन ठेवतो.
दादा आपल्याला घरी न्यायला येतोय हे ऐकूनच शर्वरी खूप खुश होते, हात जोडून साहेबांचे आभार मानते, दादा एक तासात येतो, शर्वरीला बघून मिठी मारतो, आणि तीला घरी चल असं म्हणून तिच्याबरोबर निघतो.
शर्वरी त्याच्याबरोबर रिक्षात बसते, ती दुबईला होती ते ती दादाला सांगते पण तिच्याबरोबर सात वर्षात - काय अत्याचार झाले किंवा आसिफ - आयशाच्या बाळासाठी तीला पळवून नेलं होतं हे सांगायला तिचं मन धजावत नसतं.
ती बोलते दादा आई- बाबा कसे आहेत, आणि आपलं घरं कां बददलं तुम्ही, दादा बोलतो ते दोघं पण वारले, काय असं शर्वरी ओरडून बोलते, दादा बोलतो- तू गेल्यापासून आईने जे हंतरून धरलं ते अगदीमरेपर्यंत, तू गेल्यावर आई एक वर्षाने हार्ट अटॅकने वारली, आणि बाबा आई गेल्यावर टेन्शनने दारू पियायला लागले, त्यामुळे लिव्हरचा त्रास होऊन ते पण तीन वर्षांपूर्वी वारले.
शर्वरी रडून विचारते, आता घरी कोण आहे...
दादा बोलतो - तुझी वहिनी आहे, बाबा गेल्यावर सहा महिन्यानी मी लग्न केलं, आणि घरं कां बददल तर...... तू हरवल्यावर आजू- बाजूचे लोक सतत प्रश्न विचारत असतं, त्यात आई पण वारली म्हणून मग ते घरं बदलून मी आणि बाबा दुसरीकडे राहायला गेलो, बाबा डिप्रेशनमध्ये जातं होते, आई वारली होती, तू हरवली होतीस, तुझ्याबद्दल लोक आडून - आडून विचारत असतं, त्यामुळे बाबांनी दारूला जवळ केले. रोज दारू पिऊन घरी येऊ लागले, दारुमुळे त्यांची नोकरी गेली. घराची दुर्दशा झाली अगदी, बाबा वारल्यावर मी माझ्या वर्गमैत्रिणीशी साक्षीशी लग्न केले.
शरयू मनात म्हणते, मी अशी तिकडे सात वर्ष राहून आलेली आहे हे ऐकून वहिनी काय रिऍक्ट करेल, मला स्वीकारेल कां.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - वहिनी शर्वरीला स्वीकारते की तीला शर्वरी त्यांच्या सुखी संसारात आलेली अडचण वाटते.)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा