अर्धांगिनी – भाग - 52
कोर्टातून घरी येऊन चार दिवसं होऊन जातात तरीही शऱूच्या कानात अजूनही वकिलांचे शब्द, समीरचं निर्लज्ज हसू, घुमत राहतं, ती खूप गप्प गप्प असते...तिला हे सगळं आरोप- प्रत्यारोप आता नकोसं वाटतं असतं.
सात वर्ष…हा आकडा आता फक्त वेळ नव्हता, तो तिच्या आयुष्यावर कोरलेला जखमेचा ठसा होता, तीने सुटकेसाठी एक एक दिवस मोजत सात वर्ष काढली होती, त्यामुळे तिला ते आठवूनही अधून- मधून रडायला येत असे, ती त्या आठवीनींनी अस्वस्थ होतं असे, दिवस- दिवस शांत बसत असे.
शर्वरीचा मूड ठीक करण्यासाठी दादा तिला म्हणतो, “शऱू… चल, आज बाहेर जेवायला जाऊया...साक्षी आज स्वयंपाक करू नकोस... तिघेही जेवायला बाहेर जातात, हॉटेलमध्ये पण शर्वरी गप्प असते..… पुरावा नाही आहे, हे समिरच्या वकिलाचे शब्द तिला बोचत असतात..
घरी आल्यावर वहिनी तिच्या जवळ येते आणि म्हणते,
“शर्वरी… उद्यापासून आपण नुसतं कोर्टात लढणार नाही आहोत, शोध पण घेणार आहोत.”
“कशाचा?” शर्वरी विचारते.
“आयशा… आसिफचा…
शर्वरीच्या डोळ्यांत पहिल्यांदाच आशेची एक ठिणगी चमकते.
दुसऱ्या दिवशी…दादाला एक दुसरा पत्रकार भेटतो, दादा त्याच्याशी बोलतो, तो म्हणतो-“हे प्रकरण फक्त कोर्टात अडकलेलं नाही, मानव तस्करीचं नेटवर्क असण्याची शक्यता आहे.”
दुसऱ्या दिवशी…दादाला एक दुसरा पत्रकार भेटतो, दादा त्याच्याशी बोलतो, तो म्हणतो-“हे प्रकरण फक्त कोर्टात अडकलेलं नाही, मानव तस्करीचं नेटवर्क असण्याची शक्यता आहे.”
“मग काही पुरावा मिळू शकतो का?” दादा विचारतो.
“जुनं काहीतरी नक्कीच असेल…आपण जरूर प्रयत्न करूयात..अशा गोष्टी कधी पूर्णपणे पुसल्या जात नाहीत.” काहीतरी सुगावा लागेलंच.
दरम्यान कोर्टात…पुढच्या तारखेला समीर मात्र निर्धास्त असतो....त्याचा वकील त्याला म्हणतो..“घाबरू नकोस. पुरावा नसेल तर केस टिकणार नाही.”
त्या संध्याकाळी शर्वरी देवासमोर बसते आणि देवाला म्हणते
“देवा…
फक्त सत्य बाहेर येऊ दे.”मी गप्प बसले तर हा समीर उद्या अजून कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करेल…
तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात...
रात्री उशिरा दादाच्या मोबाईलवर कॉल येतो..
समोरून वकील बोलतो- “एक धागा सापडलाय…..दुबईतल्या अशा एका जुन्या एजन्सीचं नाव सापडलं आहे...बघू अजून किती मुली तिथे फसवून नेल्या गेल्या आहेत आणि त्या सुटल्या आहेत कि अजून अडकल्या आहेत ते पण तपासू...
दादा शर्वरीकडे पाहतो आणि म्हणतो..“शरु... आता लवकरच आपल्याला न्याय मिळेलं.
(पुढील भागात — दुबईशी जोडलेला धक्कादायक पुरावा, समीरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती, आणि शर्वरीच्या आयुष्यात प्रवेश करणारी एक नवी, निर्णायक व्यक्ती…)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा