Login

अर्धांगिनी - भाग -53

Bayko

अर्धांगिनी – भाग  - 53


दादाचे शब्द ऐकून शर्वरी काही क्षण शांत राहते.“आता लवकरच आपल्याला न्याय मिळेल…”हे वाक्य तिला आश्वासक वाटतं..

त्या रात्री ती विचार करत बसते, मला इथे येऊन आठ महिने झालेत, त्या आयशाने मला मदत केली खरी पण आसिफला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्याला मी घरी नाही समजले असणार, त्याने हे समजल्यावर आयशाची काय हालत केली असेल काय माहितं... त्याने तिला मारलंही असेल, पण तिच्याबरोबर तिची सासूबाई पण होती तेव्हा, त्यामुळे कदाचित दोघींनी मिळून सिचवेशन हॅन्डल सुद्धा केली असेल, तिचं बिचारीचं तिच्या नवऱ्यापुढे काहीच चालतं नव्हतं... त्या आयशाला काही झालं नसेल ना, सुखरूप असेल ना ती.... असा विचार करतच ती झोपी जाते..त्या रात्री बरेच दिवसांनी तिला नीट झोप लागते.


दरवेळी कोर्टात गेल्यावर समिरचा आणि त्याच्या वकिलाचा आत्मविश्वास कायम असे, पण समीरच्या चेहऱ्यावरचं ते बेफिकीर हसू हल्ली कमी झालेलं असतं.

दोन दिवसांनी तिला एक स्वप्न पडतं..त्या स्वप्नात आयशा असते....थकलेली, पण जिवंत,काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत असते, शर्वरी दचकून जागी होते, तिचं हृदय जोरजोरात धडधडत असतं.
स्वप्न असेल… की कसला संकेत?
हा प्रश्न तिच्या मनात घोळत राहतो.


पुढच्या काही दिवसांत वातावरण हळूहळू बदलू लागतं, पुढच्या वेळी कोर्टात गेल्यावर शर्वरीच्या लक्षात येतं, समीर आता थेट तिच्या नजरेला नजर मिळवत नाही.त्याचं ते उद्धट हसू गायब झालेलं असतं.तो वकिलाच्या कानात काहीतरी कुजबुजतो,आणि खुर्चीत अस्वस्थपणे हालचाल करतो.
शर्वरी हे सगळं शांतपणे पाहत असते आज तिच्या मनात भीती नव्हती..

दरम्यान दादाला वकिलाचा कॉल येतो, तो सांगतो,  दुबईच्या “त्या एजन्सीची फाईल सापडली आहे,”वकील म्हणतो“काही नावं… काही तारखा… आणि काही फोटो आहेत..”

दादा फोन ठेवतो.क्षणभर तो काहीच बोलत नाही,नंतर बोलू लागतंय..“शऱू… असं वाटतंय, आपण ज्या दिशेने शोध घेतोय,ती दिशा बरोबर आहे.”


कोर्टात पुढच्या तारखेला समीरचा आत्मविश्वास ढासळलेला स्पष्ट दिसतो, त्याचा वकील सुद्धा आता सावध प्रश्न विचारतो.
न्यायाधीश काही कागद पाहत म्हणतात — “या प्रकरणात नव्या माहितीचा उल्लेख झालेला आहे.
तपास यंत्रणेला पुढील चौकशीचे आदेश दिले जातील.”

शर्वरीच्या छातीतून एक दीर्घ श्वास बाहेर पडतो.
ती म्हणते हा शेवट नाही…..पण ही सुरुवात आहे...

(पुढील भागात — आयशाच्या अस्तित्वाचा पहिला ठोस पुरावा, आणि शर्वरीसमोर उभा राहणारा निर्णायक निर्णय…आणि सत्य लपून राहू शकत नाही, ते उशिरा का होईना, बाहेर येतंच.)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख

0

🎭 Series Post

View all