अर्धांगिनी - भाग - 54
“हा शेवट नाही… पण ही सुरुवात आहे…”
शर्वरीचे शब्द स्वतःलाच ऐकू गेले. कोर्टरूमच्या बाहेर पडताना तिच्या पावलांमध्ये आज वेगळाच ठामपणा होता. इतके महिने अंगावर झेललेली भीती, अपमान, असहाय्यता.....आज ती सगळी जणू मागे पडत होती,दादा तिच्या शेजारी चालत होता.
त्या रात्री शर्वरी पुन्हा एकदा जागीच पडून होती. स्वप्नात दिसलेली आयशाची नजर तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हती, ती नजर तक्रारीची नव्हती, ती नजर विनवणीचीही नव्हती,ती फक्त असल्याची साक्ष होती.
कसला संकेत होता हा...शर्वरी स्वतःशीच पुटपुटली.
पुढच्या सुनावणीच्या दिवशी कोर्टात वातावरण वेगळंच होतं, समीर आज अजिबात नजर वर करत नव्हता,त्याचा वकील मध्येच घाम पुसत होता.
शर्वरीच्या नवीन वकिलांनी ठाम आवाजात विचारलं...
“समीर , तुम्ही आसिफ या नावाच्या माणसाला तुम्ही शर्वरिबांईना विकलंत हे सत्य आहे नां...?... पुरावे तरी हेच सांगत आहेत, तुम्ही कबूल करा..
क्षणभर कोर्टरूम स्तब्ध झाली.
समीर गप्प होता..
“न… नाही…”एवढंचं बोलला पण त्याचा आवाज थरथरत होता.
शर्वरीने डोळे मिटले,हेच तर होतं होतं दरवेळी, समीर काही केल्या तोंड उघडत नव्हता..… सत्य जवळ येत होतं, पण समीर सांगत नव्हता त्यामुळे केस पुढे जातं नव्हती..
कोर्टातून बाहेर पडल्यावर शर्वरी थांबली, तिने दादाकडे पाहिलं आणि म्हणाली..
“दादा… जर आयशासमोर आली तर बरं होईल, पण तीला शोधणं शक्य नाही आहे,शर्वरीच्या डोळ्यांत पाणी आलं, पण ते अश्रू कमकुवतपणाचे नव्हते..
एके दिवशी सकाळी वहिनीला कपाट आवरताना शरुची एक छोटीशी बॅग सापडते, वहिनी तीला हाक मारून म्हणते, शऱू आता ये जरा... हे बघ तू दुबईतुन ही बॅग आणली होतीस नां तुझे दोन ड्रेस आहेत बहुतेक ह्यात...
शर्वरी आत जाते आणि बॅग बघितल्यावर तीच्या लक्षात येतं की ही बॅग आयशाने तीला निघताना दिली होती, त्यात तिने दोन ड्रेस आणि प्रवासात खाण्यासाठी चिप्स वैगेरे दिले होते, तिने प्रवासात पूर्ण वेळ रडून घालवला होता त्यामुळे तिने ती बॅग उघडली नव्हती, आणि घरी आल्यावर दोन दिवसांनी रागाने ते चिप्स फेकून दिले होते. आणि ती बॅग कपाटात टाकली होती...
शर्वरी ती बॅग हातात घेते आणि म्हणते, हे ड्रेस नकोत मला, तिकडे मी हे ड्रेस घालायची, तिथल्या आठवणीचं नको आहेत मला, वहिनी म्हणते बरं मी ते ड्रेस आत स्टोरेज बॉक्सला ठेवते आणि ही बॅग खाली करून ठेवते.
वहिनीला ड्रेस आत ठेवताना एका ड्रेसमध्ये एक चिट्ठी सापडते..... ती ओरडुन शऱूला बोलते शऱू हे बघ चिट्ठी आहे ह्यात... आयशा नाव आहे ह्यावर....
(पुढील भागात — चिट्ठीत काय लिहिलेलं असतं आणि त्यातून मिळणार आयशाचा प्रत्यक्ष ठावठिकाणा, कोर्टासमोर येणारं निर्णायक साक्षीदार …)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा