अर्धांगिनी - भाग -56
शर्वरीने शेवटची ओळ टाईप केली आणि काही क्षण स्क्रीनकडेच पाहत राहिली.
हात स्थिर होते… पण मन अस्वस्थ.
आयशा साक्ष देईल का?
हा प्रश्न तिच्या डोक्यात घुमत होता.
साक्षीने शांतपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली...
“शऱू… उत्तर काहीही असो, तू योग्य तेच करतेयस.”
शर्वरी मान डोलावते,त्या रात्री तिला झोप येत नाही,प्रत्येक पाच मिनिटांनी ती मेल इनबॉक्स रिफ्रेश करत राहते.
तीच्या डोळ्यांसमोर समीरचा चेहरा येत असतो, तोच उद्धट, आत्मविश्वासाने भरलेला......आयशा बोलली तर… हा मुखवटा कोसळेल…
शर्वरी स्वतःशीच म्हणते.
दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक लॅपटॉपवर नवीन मेलची नोटिफिकेशन चमकते.
शर्वरीचा श्वास अडखळतो, ती पटकन क्लिक करते, मेल उघडते.
आयशाचं नाव दिसताच तिचे डोळे भरून येतात.
आयशाने लिहिलेलं असतं...
आयशाने लिहिलेलं असतं...
“शर्वरी…
तुझा मेल वाचून खूप वेळ मी काही लिहू शकले नाही.
कारण तू जे भोगलंस, त्याला मीही जबाबदार आहे,
हे सत्य मी रोज स्वतःला आठवण करून देते आहे.
तू मला साक्ष देण्याबद्दल विचारलेस… खरंच प्रामाणिकपणे सांगते.....तेव्हा मी खूप घाबरले होते.
पण आता आसिफ नाही…
आणि त्याच्यासोबतची भीतीही हळूहळू संपतेय.
जर माझं बोलणं तुझ्या आयुष्याला न्याय देऊ शकत असेल,
तर मी गप्प बसणार नाही.
तर मी गप्प बसणार नाही.
हो शर्वरी…
मी साक्ष देईन, तू सांगते आहेस ते सगळं खरं आहे,
हे मी कोर्टात सांगेन,कारण काही गोष्टी उशिरा का होईना,
पण सत्य म्हणून उभ्या राहायलाच हव्यात.
तू सांगशील तेव्हा मी फ्लाईट पकडून इंडियाला येईन, पण प्लिज मी लगेचं परत जाईन, मला कशातच अडकायचं नाही आहे, माझी सुटका होईल नां पटकन ह्यातून, माझ्या साक्षीनंतर तू आसिफच्या विरोधातली केस मागे घे प्लिज माझी विनंती आहे तुला... त्या समीरला शिक्षा करणं तुझ्या हातात आहे पण प्लिज मला ह्यात अडकवू नकोसं प्लिज...
....आयशा...
मेल संपेपर्यंत शर्वरी वाचत राहते…आणि शेवटची ओळ वाचताच ती लॅपटॉप बंद करते,क्षणभर शांतता, ती साक्षीकडे पाहते.
डोळ्यांत अश्रू असतात…
“वहिनी…”
तिचा आवाज भरून येतो.
“वहिनी…”
तिचा आवाज भरून येतो.
“आयशा साक्ष देणार आहे.”साक्षी तिला घट्ट मिठी मारते. आणि म्हणते...
“देव मोठा आहे शऱू… आणि सत्य बाहेर आलं आहे...”
“देव मोठा आहे शऱू… आणि सत्य बाहेर आलं आहे...”
दुसऱ्याच क्षणी शर्वरी दादाला फोन लावते.
“दादा…” असं बोलून ती रडतं सगळं घडलेलं सांगते..
आता तो समीर सुटणार नाही.” दादा पण हे सगळं ऐकून खुश होतो आणि म्हणतो शऱू शेवटी सत्याचा विजय होणार....
त्या रात्री शर्वरी खिडकीत उभी राहून विचार करत राहते...... दहा महिने झाले आहेत केस दाखल होऊन... अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह होतं,पण आता देवाच्या कृपेनें उशिरा कां होईना आयशा माझ्या न्यायासाठी उभी राहणार आहे....
(पुढील भागात — आयशाची कोर्टात एन्ट्री, आणि समीरसमोर उभा राहणारा तो क्षण… जिथे त्याच्याकडे पळण्यासाठी एकही वाट उरणार नाही…)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा