अर्धांगिनी - भाग -57
शर्वरी आयशाला इमेल करून सांगते, पुढच्या सुनावणीची मी तुला तारीख कळवते, तेव्हा तू ये......
बरं चालेल, तू तारीख कळवलीस की मी तिकीट बुकिंग करते..असं आयशा कळवते...
अखेर दहा महिन्यांनी तो दिवस उजाडणार होता, ज्याची शर्वरी, दादा, साक्षी खूप वाट बघत होते तिघेही खुश होते...
सतरा दिवसांनी वकिलांनी तारीख कळवली, शऱूने आयशाला कळवलं..
ती बोलली मी नक्की येते, पण प्लिज मला ह्यात गुंतवू नका, ज्याने हे सगळं ठरवलं तो आसिफ गेला, त्यामुळे मला आता ह्यात पडायचं नाही आहे, त्या समिरचा चेहरा मला माहित आहे कारण त्याचं आणि आसिफचं व्हिडीओ कॉल वरचं बोलणं मी ऐकलं होतं आणि त्यात त्या समिरचा चेहरा पण मी पहिला होता.....
हे सगळं त्या दोघांनी एका एजन्ट थ्रू ठरवलं गेलं होतं, तो एजन्ट कोण आहे आणि अजून त्यांचं काम कसं चालतं, कसं मुलींना फसवून कोंडून ठेवून मग त्यांना बेशुद्ध करून इकडे आणलं जातं हे सगळं मला माहित आहे...
हे मोठं रॅकेट आहे. आजपर्यंत भरपूर मुलीं ह्यात भरडल्या गेल्या असतील, पण आता बसं झालं, आता अजून मुलीं ह्यात फसवल्या जाणार नाहीत, मी त्या एजन्सीचं नावं सांगेन, आणि तिथला कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस सगळं पोलिसांनां देईन, पण माझी एकंच अट आहे मला ह्यात अडकवू नका... प्लिज मी माफी मागते तुझी, तुझ्या दादा- वाहिनीची... पण मला सुखरूप दुबईला परत जाऊंदेत...
शर्वरी बोलते, मी आणि दादा तुला शब्द देतो की, आम्ही तुला ह्यात कुठेचं अडकवणार नाही, तू करते आहेस ती मदतच आमच्यासाठी खुप मोलाची आहे, तु यायला तयार झालीस हेच खूप आहे आमच्यासाठी....
आयशा बोलते....बरं. मी परवा नक्की येते, तुम्ही काळजी करू नका...
किती वाजता, आणि कोर्टात पोचायचा टायमिंग असं सगळं शऱू तीला कळवते...
नेहमीप्रमाणे कोर्टाच्या बाहेर सकाळची लगबग सुरू होती.
पायऱ्यांवरून लोकांची ये-जा, वकिलांचे काळे कोट, पोलिसांचा वावर…पण शर्वरीसाठी तो दिवस बाकी सगळ्यांपेक्षा वेगळा होता, ती कोर्टाच्या आवारात पाऊल टाकते…तिचं हृदय जोरात धडधडत होतं, साक्षी तिच्या शेजारीच होती..
पायऱ्यांवरून लोकांची ये-जा, वकिलांचे काळे कोट, पोलिसांचा वावर…पण शर्वरीसाठी तो दिवस बाकी सगळ्यांपेक्षा वेगळा होता, ती कोर्टाच्या आवारात पाऊल टाकते…तिचं हृदय जोरात धडधडत होतं, साक्षी तिच्या शेजारीच होती..
दूर समीर उभा असतो… नेहमीसारखा आत्मविश्वासाने भरलेला, हसरा चेहरा, वकिलाशी कुजबुज…जणू त्याला काहीच फरक पडत नाही.
क्षणभर शर्वरीच्या अंगावर काटा येतो......… पण आतून एक आवाज येतो, आज ह्या समिरचा खेळ खल्लास होणार...
क्षणभर शर्वरीच्या अंगावर काटा येतो......… पण आतून एक आवाज येतो, आज ह्या समिरचा खेळ खल्लास होणार...
तेवढ्यात कोर्टरूमच्या दाराजवळ हालचाल होते.“आयशा खान हजर आहे,”कोर्ट कर्मचाऱ्याचा आवाज घुमतो, शर्वरीचे डोळे त्या दिशेने वळतात.
पांढऱ्या रंगाचा साधा सूट, चेहऱ्यावर थोडा थकवा…पण डोळ्यांत भीतीपेक्षा जास्त निर्धार, आयशा आलेली असते..
आयशा......क्षणभर दोघींची नजर एकमेकांना भिडते.
आयशाच्या डोळ्यांत अपराधीपणाची छाया…आणि शर्वरीच्या नजरेत धन्यवाद.
समीरचा चेहरा त्या क्षणी बदलतो, हसू ओसरतं… भुवया उंचावतात, त्याला कल्पनाही नव्हती की आयशा खरंच येईल.
न्यायाधीश येतात, कोर्टरूम शांत होते.“साक्षीदाराला बोलावण्यात येत आहे,
आयशा पुढे येते, शपथ घेताना तिचा आवाज थोडासा थरथरतो…पण शब्द स्पष्ट असतात.
सरकारी वकील प्रश्न विचारायला सुरुवात करतो.
“आयशा, समिरला ओळखता कां,
आयशा एक क्षण डोळे मिटते…आणि म्हणते हो...मग खोल श्वास घेते.
शर्वरीवर अन्याय झाला आहे,समीरने तिला फसवून दुबईला पाठवलं,
आणि जे काही घडलं, त्याची साक्षीदार मी आहे.”....कोर्टरूममध्ये कुजबुज सुरू होते,समीर अस्वस्थ होतो.
आणि जे काही घडलं, त्याची साक्षीदार मी आहे.”....कोर्टरूममध्ये कुजबुज सुरू होते,समीर अस्वस्थ होतो.
त्याचा वकील मध्येच उठतो, आक्षेप घेतो…पण न्यायाधीश हात वर करून त्याला थांबवतात. आणि ओरडून बोलतात.. “साक्षीदाराला बोलू द्या.”
आयशाचा आवाज आता अधिक ठाम होतो.
आयशाचा आवाज आता अधिक ठाम होतो.
पुढील भागात — समीरची उलटतपासणी, त्याचा कोसळणारा मुखवटा… आणि शर्वरीचा तो क्षण, जिथे ती पहिल्यांदाच स्वतःला पूर्णपणे मुक्त झालेलं अनुभवेल…)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा