अर्धांगिनी - भाग - 59
नवा अध्याय....(शर्वरीच्या आयुष्याची नवी सुरुवात)
कोर्टाच्या पायऱ्या उतरताना शर्वरी थांबते, तीच्या डोळ्यात अश्रू असतात, तीला रडू आवरत नसतं.... साक्षी तिच्या खांद्यावर थोपटून म्हणते, शऱू आता रडायचं नाही...“शऱू… आता सगळं संपलं गं.” तो समीर अडकला... आपण ही लढाई जिंकलो बघ... आता तू रडायचं नाहीस...स्वतःला सावर...
दादा पुढे येतो, तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो...
“खूप धीर धरलास गं तू,”..त्याचा आवाज थरथरतो.
“आज आई-बाबा असते ना… तर किती अभिमान वाटला असता त्यांना.”शर्वरीचे डोळे पुन्हा पाणावतात...ती दादाला मिठी मारते.
“खूप धीर धरलास गं तू,”..त्याचा आवाज थरथरतो.
“आज आई-बाबा असते ना… तर किती अभिमान वाटला असता त्यांना.”शर्वरीचे डोळे पुन्हा पाणावतात...ती दादाला मिठी मारते.
घरी परतताना रस्ता तिला वेगळाच वाटतो, तीच झाडं… तेच वळण…
पण आज तिच्या मनात एक नवी शांतता आहे...
पण आज तिच्या मनात एक नवी शांतता आहे...
घरी पोचताच साक्षी तिला चहा देते, आणि म्हणते शऱू..“आज काही विचार नकोस करूस,.आजचा दिवस फक्त तुझा आहे.”शर्वरी खिडकीजवळ जाऊन बसते,तेच ठिकाण…जिथे कित्येक रात्री ती तिथेच रडत बसली होती, आज तिथेच ती हसते…
तीच्या मनात विचार येतो...सात वर्ष आणि आता इथे आल्यावरचे दहा महिने…अपमान, भीती, प्रश्न…आणि आज सगळ्याचं … उत्तर मिळालं ....
शर्वरी दोन दिवसांनी आयशाला पुन्हा इमेल करते आणि सुखरूप पोचलीस कां असं विचारते, आयशा पण तीला लगेचच रिप्लाय देऊन हो मी ठीक आहे, सुखरूप पोचले... असं लिहिते... तुला नवीन आयुष्या्साठी बेस्ट ऑफ लक असं पण आयशा लिहिते... खुश रहा, इमेलवर बोलत राहू......हो, चालेल... असं शर्वरी बोलते...
चार दिवसांनी शर्वरीचा मोबाईल वाजतो, अनोळखी नंबरवरून कॉल असतो..ती थोडी घाबरते…पण कॉल उचलते.“हॅलो… शर्वरी मॅडम?”.... पलीकडून सौम्य आवाज.“हो, मीच.”“मी महिला सहाय्यता केंद्रातून बोलते आहे.
तुमची केस ऐकली…तुमच्यासारख्या मुलींना मदत करण्यासाठी आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे.”
शर्वरी काही क्षण शांत राहते थोड्यावेळाने ती ठामपणे म्हणते,“मी नक्की येईन.”फोन ठेवताना साक्षी तिच्याकडे पाहते आणि विचारते...
“काय झालं?”
शर्वरी हसते आणि म्हणते...“नवी सुरुवात.”त्या रात्री ती देवासमोर उभी राहते.
ती आज देवाकडे काही मागत नाही...फक्त एवढंच म्हणते...“धन्यवाद बाप्पा...
ती आज देवाकडे काही मागत नाही...फक्त एवढंच म्हणते...“धन्यवाद बाप्पा...
झोपायला जाताना ती आरशात स्वतःकडे पाहते, तोच चेहरा…पण डोळ्यांत आता भीती नाही..आता त्याजागी आहे...आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास, वयाच्या तेहतीसव्या वर्षी ती स्वतः साठीची लढाई जिंकली होती...
(पुढील भागात — शर्वरीचा नवा प्रवास, आणि तिच्या आयुष्याला मिळणारा एक अनपेक्षित वळण…)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा