अर्धांगिनी - भाग - 64
रात्री शर्वरीला उशिरापर्यंत झोप येत नाही, मेघाचा थरथरता आवाज, तिचे डोळे, तिच्या शब्दांमधली दडपलेली वेदना… सगळं पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येतं.
“मी चुकीची नाही… पण मला ते पटवून द्यायला सहा वर्षं लागली…”
हे मेघाचं वाक्य शर्वरीच्या मनात घुमत राहतं.
“मी चुकीची नाही… पण मला ते पटवून द्यायला सहा वर्षं लागली…”
हे मेघाचं वाक्य शर्वरीच्या मनात घुमत राहतं.
दुसऱ्या दिवशी संस्था नेहमीपेक्षा गजबजलेली असते.
शर्वरी वेळेवर पोहोचते. आत शिरताच सुधामॅडम तीला म्हणतात,,“आज मेघाची केस महत्त्वाची आहे… तिचा नवरा आज पहिल्यांदाच समोर येणार आहे.”
थोड्याच वेळात एक उंच, नीटनेटका, आत्मविश्वासाने चालणारा पुरुष आत येतो.
डोळ्यांत अजब थंडपणा… ओठांवर बनावटी हसू.“मी रोहन देशमुख.”तो शांतपणे म्हणतो.
मेघा समोर बसलेली असते… पण आज तिच्या नजरेत भीतीपेक्षा थोडं बळ दिसतं, रोहन बोलायला लागतो...“माझ्या बायकोला सगळं चुकीचंचं वाटतंय. ती खूप सेन्सिटिव्ह आहे…
मेघा बोलते...
“आज मी खोटं बोलणार नाही… कुणासाठीही नाही... मेघा सासरच्यांनी केलेले अत्याचार, मानसिक छळ सगळं सांगते.
“आज मी खोटं बोलणार नाही… कुणासाठीही नाही... मेघा सासरच्यांनी केलेले अत्याचार, मानसिक छळ सगळं सांगते.
केस संपल्यानंतर शर्वरी बाहेर येते, तीच्या डोळ्यांतं पाणी असतं.
तिथे तनिश उभा असतो…तो म्हणतो...“शर्वरी… असं रडून चालणार नाही...रोजचं अशा केसेस इथे येतं असतात.
तिथे तनिश उभा असतो…तो म्हणतो...“शर्वरी… असं रडून चालणार नाही...रोजचं अशा केसेस इथे येतं असतात.
मी तुला हे सांगतोय..“कारण एकेकाळी मीही असाच असहाय्य होतो…
माझी आई… तीही छळ सहन करत होती. आणि मी काहीच करू शकलो नाही.”
शर्वरी ते ऐकून थक्क होते.“म्हणूनच मी इथे आहे… आणि म्हणूनच तुझ्यासारख्या लोकांची मला गरज आहे.”तो हळू आवाजात म्हणतो.
त्या क्षणी शर्वरीला जाणवतं,ही संस्था फक्त नोकरी नाही…हे जखमांमधून उभं राहिलेलं एक कुटुंब आहे.
ती डोळे पुसते, स्वतःला सावरते.“सॉरी…” ती नकळत म्हणते.
तनिश हलकंसं हसतो.
तनिश हलकंसं हसतो.
तेवढ्यात सुधा मॅडम जवळ येतात आणि म्हणतात, “मेघाला बोलायला बळ मिळालं… हेच सगळ्यात मोठं यश आहे.”
शर्वरी बोलते...“मॅडम… कधी कधी वाटतं, आपण खरंच बदल घडवू शकतो का?” सुधा मॅडम तिच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात...“सगळं एकदम बदलत नाही… पण एक स्त्री जेव्हा स्वतःसाठी उभी राहते, तेव्हाच सुरुवात होते.”
काम संपल्यावर शर्वरी फाईल्स नीट लावत बसलेली असते.
तनिश दूरून तिला पाहत असतो, ही मुलगी तुटलेली आहे… पण हरलेली नाही.
तो मनात म्हणतो.....
“शर्वरी,” “उद्या मेघाच्या केसची पुढची प्रोसेस आहे… कोर्ट नोटिस, मेडिकल रिपोर्ट्...तो जवळ येऊन म्हणतो,
हो मी सगळे पेपर्स तयार करून ठेवलेत शर्वरी म्हणते, तनिशच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटतं.
(पुढील भागात - शर्वरीच्या आयुष्यात उभं राहणारं एक कठीण नैतिक द्वंद्व… )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा