अर्धांगिनी – भाग – 65
संस्थेत चार महिने कसे गेले… शर्वरीलाच कळलं नाही, चार महिन्यात तिची आणि तनिशची चांगली मैत्री झालेली असते.
तनिश पस्तीस वर्षाचा होता, त्याचं लग्न झाले नव्हते, त्याचं लग्न जमवणार कोणीच नव्हतं, त्याला नातेवाईक नव्हते, तो एकटाच राहत असे, त्याचे वडील आईला लहानपणी दारू पिऊन खूप मारायचे, त्याला कंटाळूनच त्याच्या आईने ट्रेनखाली जीव दिला होता, त्यामुळे त्याचं बालपण त्रासात गेलं होतं, आणि आई गेल्यावर पाच वर्षाने वडील पण वारले होते, त्यामुळे त्याला समोरच्याचं दुःख पटकन स्वतःचं वाटतं असे....
चार महिन्यांपूर्वी, पहिल्या दिवशी घाबरणारी शर्वरी …आणि आज तीच शर्वरी फाईल्स हाताळतं असते, केसेस मांडत असे, महिलांना समजावून सांगत असे..संस्थेच्या भिंतींमध्ये तिचा आवाज रुळायला लागला होता, मेघाची केस पुढच्या टप्प्यावर गेली होती..
त्या दिवशी दुपारी शर्वरीचा फोन वाजतो.
“Hello, this is from Arise Legal & Social Consultancy., आपण चार महिन्यापूर्वी दिलेल्या इंटरव्ह्यूनंतर आम्ही आपली नोकरीसाठी निवड केली आहे.”...शर्वरी क्षणभर स्तब्ध होते.
पगार… सध्याच्या नोकरीपेक्षा जवळजवळ दुप्पट होता..
संध्याकाळी ती संस्थेतच बसून राहते, सगळे निघून गेलेले असतात, सुधा मॅडम येतात, आणि विचारतात...“काय झालं शर्वरी? आज शांत दिसतेयस.”
शर्वरी म्हणते “मॅडम… मला दुसरीकडे नोकरीची ऑफर आली आहे…पगार चांगला आहे……”
सुधा मॅडम काही क्षण काहीच बोलत नाहीत.“थोड्या वेळाने त्या म्हणतात...मला माहित होतं… हा दिवस येणारच,” त्यात संस्थेत तसा पगार कमी आहे नां...
तनिशला पण कळल्यावर तोही थोडा गप्प राहतो, शर्वरी त्याला सांगते, तीन दिवसांनी जॉइनिंग आहे, बरं एवढंच तो बोलतो...
शर्वरी घरी आल्यावर दादा आणि वहिनीला सांगते, ते दोघे पण खुश होतात.. शर्वरी सांगते- पगार दुप्पट आहे, कंपनी खूप मोठी पण आहे, मी जॉईन व्हायचं म्हणतेय, ते दोघेही हो तू जॉईन हो, मोठी कंपनी आहे, नवीन गोष्टी शिकायला मिळतील, बेस्ट ऑफ लक असं म्हणतात...
संस्थेतल्या शेवटच्या दिवशी ती प्रत्येक फाईलवरून हात फिरवते.प्रत्येक खुर्ची, प्रत्येक भिंत…जणू ते साक्षीदार असतात तिच्या उभं राहण्याच्या प्रवासाचे,दारात उभी राहून ती एकदा मागे वळून पाहते.....सर्वांना बाय बाय करून शर्वरी बाहेर पडते...
(पुढील भागात – नव्या नोकरीत शर्वरी रूळते, पण तनिशच्या आठवणीने ती कासावीस होते...)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा