अर्धांगिनी - भाग - 66
आई गेल्यापासून तनिशने कोणाजवळचं, कधीच मन मोकळं केलं नव्हतं,पण शर्वरी आली…आणि नकळत त्या रिकाम्या जागेत बसली, काही नाती बोलून जपत नाहीत, ती शांतपणे सहन केली जातात, त्याला शर्वरी आवडू लागली होती.
इकडे शर्वरीचं नवं आयुष्य सुरू झालं होतं, Arise Legal & Social कन्सल्टन्सीमध्ये नोकरी सुरु झाली होती, मोठी इमारत, काचांच्या भिंती,वेगळीच झगमग.
पहिल्याच दिवशी तिला मोठ्या केबिनमध्ये बसवण्यात आलं,…नवा आयडी…नवं टेबल…इथे कामाचा वेग वेगळा होता....शर्वरी तीच आहे… पण थोडी बदललेली आणि त्या बदलात तिला सगळ्यात जास्त आठवण येतेयं.....तनिशची.
तनिश तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकायचा,कधीच सल्ला न देता,फक्त ऐकून घ्यायचा,एकदा तिने विचारलं होतं,“तुला एवढं सगळं कसं सहन होतं?मला तर ह्या मुलींचे प्रॉब्लेमसं ऐकून कधीकधी रात्र - रात्र झोप लागत नाही.........
तो हसला होता,आणि म्हणाला होता...“सहन नाही… मी स्वीकार केला आहे ह्या सगळ्याचा, कारण माझ्या घरी अशीच आई - बाबांची रात्रं- रात्रं भांडण व्हायची, रोजचाचं तमाशा असायचा, आणि हे सगळं मी वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत रोज बघत आलोय....”आज त्या वाक्याचा अर्थ तिला जास्त खोल समजतो.
इकडे तनिश त्याच्या घरी बसून विचार करत होता - आपण जे न बोललो…ते बोलायला उशीर तर नाही ना झाला? पण फोन दोघांच्याच हातात असूनही कोणीच कॉल करत नाही,काही भावना शब्द मागत नाहीत, त्या फक्त अंतर सहन करतात, शर्वरीने पण इथून नोकरी सोडून गेल्यावर एकदाही कॉल केला नाही आहे... तो विचार करत झोपी गेला..
एक महिन्याने शर्वरी तनिशला पहिल्यांदाच मेसेज टाइप करते,“तुझी आठवण येतेय.”पण पाठवत नाही, तोच मेसेज तनिशही मनातल्या मनात म्हणत असतो,
पण दोघेही बोलायला धजावतं नसतात...
पण दोघेही बोलायला धजावतं नसतात...
शेवटी एके दिवशी तनिश पुढाकार घ्यायचं ठरवतो..
त्या दिवशी शर्वरी ऑफिसमधून उशिरा बाहेर पडली,
आणि तेवढ्यात..“शर्वरी…”
ती दचकून वळते, समोर तनिश उभा असतो, क्षणभर दोघेही काहीच बोलत नाहीत, चार महिन्यांचं अंतर त्या शांततेत सामावलेलं.
“इथे कसा तू?”
ती विचारते...तो हसून खोटं बोलतो.. इथेच जवळ एका कामासाठी आलॊ होतो..,”“आणि… तुला बघावंसं वाटतं होतं..त्या वाक्यावर ती दचकून थोडी खाली पाहते,दोघे एकत्र चालायला लागतात.
रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कॅफेत बसुया असं तनिश सुचवतो, ती पटकन हो म्हणते..दोघेच… आणि शांतता.
चहा येतो,“नवं ऑफिस कसं आहे?”तनिश विचारतो.
शर्वरी म्हणते, छान आहे, “मोठं आहे… पगार चांगला आहे…
पण…”
ती वाक्य अपूर्ण ठेवते.
तो हसत म्हणतो पण माझी आठवण येतेय नां...
क्षणभर तिला भरून येतं, ती हळूच लाजत म्हणते,हो...
क्षणभर तिला भरून येतं, ती हळूच लाजत म्हणते,हो...
मी रोज तुला आठवत होते,”ती अचानक म्हणते.“पण मेसेज करायची हिंमत होत नव्हती.”
तनिश क्षणभर स्तब्ध होतो आणि म्हणतो...“मीही,”
(पुढच्या भागात - तनिश, शर्वरिच्या नात्याचं गोड वळण)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा