अर्धांगिनी - भाग - 68
दुसऱ्या दिवशी सकाळी शर्वरी लवकर उठते, ती फोन हातात घेते.
क्षणभर थांबते…आणि मग नंबर डायल करते.
क्षणभर थांबते…आणि मग नंबर डायल करते.
“तनिश…”
पलीकडून शांत आवाज येतो, “हो शर्वरी…”
पलीकडून शांत आवाज येतो, “हो शर्वरी…”
ती म्हणते..“मी खूप विचार केला…माझ्या भूतकाळाचा,… आणि तुझ्या प्रामाणिकपणाचा.”
क्षणभर शांतता.
“मला तुझी अर्धांगिनी व्हायला आवडेल....तनिश.”
पलीकडे काही क्षण शब्दच येत नाहीत,मग तनिशचा आवाज किंचित भरलेला…
“शर्वरी…मी तुला वचन देतो,तुझ्या भूतकाळाचा मी कधीच विषयसुद्धा काढणार नाही, तुला नेहमी सुखात ठेवेन.......”
“शर्वरी…मी तुला वचन देतो,तुझ्या भूतकाळाचा मी कधीच विषयसुद्धा काढणार नाही, तुला नेहमी सुखात ठेवेन.......”
फोन ठेवताना तिचे डोळे पाणावतात.
संध्याकाळी तनिश पहिल्यांदाच शर्वरीच्या घरी येतो, साक्षी दार उघडते.
“या… तुम्ही तनिश ना?”“हो वहिनी,”
तो आदराने म्हणतो.
हॉलमध्ये दादा, वहिनी बसलेले असतात.
शर्वरी थोडीशी घाबरलेली असते,
तनिश बोलायला सुरुवात करतो, माझं स्वतःचं वन बी एच के चं घरं आहे, माझे आई- वडील वारले आहेत, मी एकटाच राहतो, ,“मला माहीत आहे, शर्वरीचं आयुष्य सोपं नव्हतं, पण तिच्या त्या संघर्षामुळेच ती आज इतकी सशक्त आहे.” ती मला मनापासून आवडते.
शर्वरीचा दादा पुढे म्हणतो,
“आम्हाला श्रीमंती नको…फक्त माझ्या बहिणीला सुरक्षित, सन्मानाचं आयुष्य हवंय.”तनिश थेट नजरेला नजर देत म्हणतो,“तेच मी देऊ शकतो… आणि देईन.”
साक्षी शर्वरीकडे पाहते आणि हसत म्हणते,
“आम्हालाही काही हरकत नाही.”
त्या क्षणी शर्वरीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात.
“आम्हालाही काही हरकत नाही.”
त्या क्षणी शर्वरीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात.
शर्वरी म्हणते मला लग्न अगदी साधेपणाने करायचं आहे, अगदी वैदिक पद्धतीने पण चालेल. बरं जशी तुझी इच्छा असं दादा हसत म्हणतो.
तनिश पण म्हणतो,
“मलाही लग्न अगदी साधंच हवं आहे, दिखाऊपणा नकोचं..
त्या वाक्यावर दादाच्या चेहऱ्यावर समाधान उमटतं.
तनिश निघतो, साक्षी त्याला सांगते उदया आम्ही दोघी तुझं घरं बघायला येतो दादा म्हणतो...आमच्या भटजींशी बोलून आपण पुढच्या महिन्याची लग्नाची तारीख ठरवू..
हो दोघीपण नक्की या, असं बोलून आणि मग दादाला बाय करून तनिश निघतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी म्हणते,“शऱू… आज संध्याकाळी आपण तनिशच्या घरी जाऊया.घर पाहूया… शर्वरी हसून म्हणते...
“हो वहिनी… मला आवडेल.”
दोघीही ठरल्याप्रमाणे तनिशच्या घरी जातात.तनिशचं घर छोटंसं पण स्वच्छ असतं.खिडकीतून भरपूर उजेड येत असतो..भिंतींवर मोजकी चित्र असतात.
तनिश शर्वरीला म्हणतो कसं वाटलं घरं, जास्त नीटनेटकं नाही आहे, कारण मी एकटाच असतो नां..“हे घर माझं एकटेपणाचं होतं,”
तनिश हळूचं तीच्या जवळ जाऊन म्हणतो.
“आता… आपलं होईल हे घरं,तू आल्यावर नीट सजवं सगळं तुझ्या पद्धतीने...”
तनिश हळूचं तीच्या जवळ जाऊन म्हणतो.
“आता… आपलं होईल हे घरं,तू आल्यावर नीट सजवं सगळं तुझ्या पद्धतीने...”
“मला हे घर आवडतं,”
ती थोड्या वेळाने म्हणते...
संध्याकाळी परतताना साक्षी शर्वरीला म्हणते,
“शऱू… चांगला मुलगा आहे तनिश, जप त्याला, बिचारा बरेच वर्ष एकटाच राहतोय, त्याला साथीची गरज आहे, हो असं लाजून शर्वरी म्हणते...
“शऱू… चांगला मुलगा आहे तनिश, जप त्याला, बिचारा बरेच वर्ष एकटाच राहतोय, त्याला साथीची गरज आहे, हो असं लाजून शर्वरी म्हणते...
पुढच्या भागात - साखरपुड्याची आणि लग्नाची तारीख ठरणार, शऱूच्या आयुष्यात सुखं येणार...
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा