अर्धांगिनी - भाग - 69
रात्री शर्वरी उशीवर डोकं ठेवते, आणि मनातल्या मनात म्हणते,आज मन शांत आहे…आणि मला पुन्हा आनंद मिळण्याचा हक्क आहे ह्यावर विश्वास बसतोय..
दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी दादा भटजींशी फोनवर बोलत असतो.
साक्षी किचनमध्ये असते,आणि शर्वरी हॉलमध्ये बसलेली असते.
“शऱू…”
दादा फोन ठेवत म्हणतो,“भटजी म्हणालेत पुढचा महिना खूप शुभ आहे.
साखरपुडा पाच तारखेला आणि लग्न त्यानंतर वीस तारखेला करता येईल.”
क्षणभर शर्वरी काहीच बोलत नाही, हे सगळं इतक्या पटकन घडतंय, यावर तिचाच विश्वास बसत नाही.

“काय?”“मग तयारीला लागायचं!”साक्षी आनंदाने म्हणते.
शर्वरीच्या डोळ्यांत पाणी येतं.
दादा तनिशला फोन करतो, सांगतो सगळं,पलीकडून तो शांतपणे म्हणतो,
“दादा मला सगळं मान्य आहे.तुम्ही ठरवाल तसं करूया.”
बघता बघता साखरपुड्याचा दिवस उजाडतो, शर्वरी साध्या हिरव्या साडीमध्ये बसलेली असते, डोळ्यांत संकोच… पण आत्मविश्वासही.
तनिश तिच्यासमोर बसतो, दोघांच्या नजरा क्षणभर जुळतात.
अंगठी घालताना शर्वरीचा हात थोडासा थरथरतो.
तनिश हळूच म्हणतो,“घाबरू नकोस… मी आहे.”
ती हा म्हणून मान हलवते.
तनिश हळूच म्हणतो,“घाबरू नकोस… मी आहे.”
ती हा म्हणून मान हलवते.
साखरपुड्यानंतर साक्षी हसत म्हणते,
“आता आमची शऱू नवरी होणार...,.”
तो शब्द कानावर पडताच शर्वरी क्षणभर स्तब्ध होते.
नवरी…हा शब्द कधी तरी तिच्यासाठी भीतीचा होता,आज मात्र तो आश्वासक वाटतो, ती नकळत तनिशकडे पाहते, तोही तिलाच पाहत असतो...
नवरी…हा शब्द कधी तरी तिच्यासाठी भीतीचा होता,आज मात्र तो आश्वासक वाटतो, ती नकळत तनिशकडे पाहते, तोही तिलाच पाहत असतो...
संध्याकाळी सगळे निघून गेल्यावर घर पुन्हा शांत होतं, शर्वरी खोलीत येते, आरशासमोर उभी राहते, हातातली अंगठी पाहते,हे खरंच घडतंय…ती स्वतःशीच हसते.
पुढचे काही दिवस तयारीत जातात.
साधी तयारी… पण प्रत्येक क्षणात आपुलकी.
साक्षी कधी साडी दाखवते कधी दागिने,
“शऱू ही बघ… जास्त नक्षी नाही, पण छान आहे.”
“मला साधंच आवडतं वहिनी,”
शर्वरी हसून म्हणत असे.
साधी तयारी… पण प्रत्येक क्षणात आपुलकी.
साक्षी कधी साडी दाखवते कधी दागिने,
“शऱू ही बघ… जास्त नक्षी नाही, पण छान आहे.”
“मला साधंच आवडतं वहिनी,”
शर्वरी हसून म्हणत असे.
दादा भटजींशी, हॉलवाल्याशी बोलून,सगळं शांतपणे ठरवत असतो.
कुठेही गोंगाट नाही…कारण हा सोहळा दिखाव्याचा नसतो.
कुठेही गोंगाट नाही…कारण हा सोहळा दिखाव्याचा नसतो.
एक दिवस संध्याकाळी तनिश शर्वरीला म्हणतो,“शर्वरी…”
“तुला काही हवंय का? घरात काही बदल करायचा असेल तर सांग.”
ती क्षणभर विचार करते,आणि मग हळूच म्हणते,“नाही…
काहीच नको.”
“तुला काही हवंय का? घरात काही बदल करायचा असेल तर सांग.”
ती क्षणभर विचार करते,आणि मग हळूच म्हणते,“नाही…
काहीच नको.”
पलीकडून हलकंसं हसू येतं.
बघता बघता लग्नाचा दिवस जवळ येतो...लग्नाच्या आधीच्या रात्री शर्वरी खिडकीत उभी असते, ती स्वतःला म्हणते,उद्यापासून नवीन आयुष्य सुरू होतंय..तिच्या ओठांवर हलकंसं हसू येतं.
पुढच्या भागात - लग्नाचा दिवस
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा