अर्धांगिनी - भाग - 70 ( अंतिम भाग )
(शर्वरीचं लग्न… आणि सुखाचा नवा आरंभ)
लग्नाचा दिवस उजाडतो, पहाटेच घरात हालचाल सुरू होते, हलक्या हशांचा गोंगाट,फुलांचा सुगंध…घर आज आनंदाने भरून गेलेलं असतं. घरात पाहुणे आलेले असतात, सगळे हॉलवर जायला तयारी करत असतात, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो..
शर्वरी आंघोळ करून तयार होते.आरशात स्वतःला असं सजलेलं पाहुन तीला खूप आनंद होतो, सुंदर पिवळी साडी, हातात हिरव्या बांगडया, कपाळावर चंद्रकोर टिकली, डोळ्यांत काजळ, गळ्यात तन्मणी …पायात पैंजण, हलकासा मेकअप केलेला असतो.
साक्षी तिच्या जवळ येते,आणि हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते.......“शऱू… खूप सुंदर दिसते आहेस आजपासून तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात आहे, भीतीला इथेच ठेवून पुढे जा.” कायम सुखी रहा..सुखाचा संसार कर... तनिशला जप.
शर्वरी तिच्या पाया पडते आणि म्हणते - “वहिनी… आज जे काही आहे, त्यात तुझंदेखील मोठं योगदान आहे.” तू मला आधार दिलास, दुःखातून सावरलसं, मला जपलंस, तू आणि दादाने मला समजून घेतलंत, मला त्या दुःखातून बाहेर काढलंत, मला सत्य जगासमोर मांडायला हिम्मत दिलीत, तुमच्यामुळे मी लढू शकले.. आणि आज हा आंनदाचा दिवस पाहू शकले... वहिनी म्हणते तू रडू नकोसं, चल निघूया आता आपण...
साक्षी तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते...
“बस… आता रडायचं नाही.
आज फक्त आनंद.”
शर्वरी घरातून निघताना दादा, वहिनीला मिठी मारून रडते.
सगळे हॉलवर पोचतात, तनिश आधीच आलेला असतो, मंगलाष्टक सुरू होतात.
शर्वरी पडद्याआड उभी असते,हृदयाची धडधड वाढलेली…अक्षता उडतात…पडदा सरकतो, त्या क्षणी दोघांच्या नजरा जुळतात.
मंगलसूत्र बांधताना तनिशचा हात थोडासा थरथरतो.
तो हळूच म्हणतो,“शर्वरी… आयुष्यभर साथ देशील नां..”
ती म्हणते...हो… आयुष्यभर.
तो हळूच म्हणतो,“शर्वरी… आयुष्यभर साथ देशील नां..”
ती म्हणते...हो… आयुष्यभर.
फेऱ्या पूर्ण होतात.
भटजी उच्चार करतात, “आजपासून शर्वरी तनिशची अर्धांगिनी झाली..”
साक्षीच्या डोळ्यांत आनंदाश्रू असतात.दादा समाधानाने पाहत असतो..
आज त्याची बहीण सुरक्षित हातात सोपवली गेली आहे.
लग्न छान पार पडतं, संध्याकाळी तनिशच्या घरात गृहप्रवेश असतो, शर्वरी उंबरठ्यावर थांबते,.कुंकवाने आत पाऊल ठेवते. माप ओलांडून आत जाते.
तनिश हळूच म्हणतो,
“हे घर… आणि मी…दोघंही तुझ्यासाठी कायम आहोत...” वेलकम....
“हे घर… आणि मी…दोघंही तुझ्यासाठी कायम आहोत...” वेलकम....
शर्वरी तनिशकडे पाहते, त्याच्या डोळ्यांत पाणी येतं…ती त्याच्या हातात हात ठेवते आणि म्हणते, सगळं छान होणार....
एक स्त्री,जिनं वेदना अनुभवल्या,पण स्वतःवरचा विश्वास हरवला नाही,एक अर्धांगिनी,जिला पुन्हा हसण्याचा हक्क मिळाला.
.... समाप्त...
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा