Login

पडक्या घराचे रहस्य भाग ४ (अंतिम भाग)

भूत प्रेत अशा गोष्टींवर विश्वास नसलेली आजची नवीन पिढी जेव्हा या गोष्टींचा सामना करते...
" हा कसला प्रकाश असेल ? " संजनाने हळू आवाजात त्यांना विचारले... अमेय ने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच त्या खोलीचे दार उघडले... त्या चौघांची नजर त्या खोलीच्या आत गेली... त्या खोलीच्या कोपऱ्यामध्ये एक जुना पलंग होतं आणि त्या पलंगावर पांढरे कपड्यातील एक आकृती बसली होती... तिचे केस विस्कटलेले, चेहरा अंधारात लपलेला असल्यामुळे तो दिसून येत नव्हता...

आत्ता पुढें,

" ए तू..... तू कोण आहेस? " प्रतीक ने आपला आवाज शांत ठेवत त्या दिशेला पाहून विचारले खरंतर ती आकृती पाहून त्याच्याही मनामध्ये भीती निर्माण झाली होती... त्या आकृतीने हळूहळू आपला चेहरा त्यांच्या आवाजाच्या दिशेने मागे फिरवला... लालसर झालेले ते डोळे, ओठांवरून काळ रक्त ओघळत होतं, त्या सगळ्यांकडे पाहून ती आकृती जोरात किंचाळली ,

" हे माझं घर आहे... बाहेर निघा! " आणि अचानक ती आकृती तिकडून गायब झाली.... त्या आकृतीच्या आवाजाने आणि तिचा तो भयानक चेहरा पाहून सगळेच किंचाळून मागे सरकले....

" आता आपण अजून एक मिनिटही इकडे थांबायचं नाही आपण लगेचच या घरातून बाहेर पडूया.... " रोहन घाबरत असत्या सगळ्यांकडे पाहून त्यांना सांगू लागला.... ते लोक त्या खोलीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते की , त्या खोली चे दार आपोआप बंद झाले... खोली अचानक पूर्ण अंधारात बुडाली, त्यांच्या हातात असलेल्या सगळ्या टॉर्च ही बंद पडल्या... त्याचा उगानेही घाबरून एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवले...

" हा.... हा.... हा..... या घरात प्रवेश करणाऱ्याची सुटका होत नाही..... " अचानक त्या स्त्रीचा अभयानक असा हसण्याचा आवाज सगळीकडे घुमू लागला..... त्या आवाजाने सगळेच भीतीने थरथर कापू लागले... अचानक रोहनला आठवले की तो लहानपणापासूनच घाबरट असल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याच्या गळ्यात छोटी चांदीची हनुमान ची मूर्ती काळ्या दोऱ्यात ओवून गळ्यात घातली होती...

रोहनने ती मूर्ती बाहेर आपल्या हातात पकडली आणि हनुमान चालीसा बोलायला सुरुवात केली... त्याचे सगळे मित्र त्याच्या जवळच त्याला पकडून उभे होते... त्या पडक्या घरामध्ये रोहनचा हनुमान चालीसा बोलण्याचा आवाज घुमू लागला, तसे काही सेकंदांनी त्या अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाश झाला आणि त्या खोलीचे दार उघडले गेले.... त्या सगळ्यांनी रोहनचा आहात पकडूनच त्या खोलीच्या बाहेर पळ काढला... चौघेही एक क्षणाचाही विलंब न करता पायऱ्यांवरून खाली येत त्याला पडक्या घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडले.....

" तुझ्या गळ्यात असलेल्या अभिमंत्रित मूर्तीमुळे आज तुमचा जीव वाचला आहे पण पुन्हा असे होणार नाही...  " घराच्या आतून जोरजोरात हसत आवाज येऊ लागला....

" हे घर शापित आहे ... आता तरी तुम्हा लोकांना हे समजले ना..... पुन्हा कधीही आपण इकडे येण्याचा प्रयत्न करायचा नाही..... " रोहन घाबरलेल्या आवाजातच एक नजर त्या घराकडे पाहून आपल्या मित्रांना सांगू लागला....


" हे काही साधन नाही.... आपल्याला या घरामध्ये घडलेला भूतकाळ समजायला हवा... आपण उद्याच आपल्या वडीलधाऱ्या माणसांना याबद्दल विचारूया.... " अमेय ने एक नजर त्या पडक्या घराकडे पाहिले... वरच्या मजल्यावर असलेल्या खिडकीमधून त्यांना लालसर डोळे दिसू लागले जे सध्या त्यांच्याकडेच रागाने पाहत होते....

" चला आता इकडे जास्त वेळ थांबण्यात काहीही अर्थ नाही... " संजना त्या खिडकीकडे पाहून घाबरतच बोलत होती... तसे ते चौघे पण त्या घरापासून लांब आपल्या गावाच्या दिशेने पळू लागले... सगळे घाबरल्यामुळे अमेय त्या सगळ्यांना आपल्या घरी घेऊन गेला... त्याच्या घरात वरच्या बाजूला असलेल्या मोकळ्या आवारातच सगळे जाऊन झोपले....

सकाळी उठल्यावर सगळेजण फ्रेश होऊन अमेयच्या घरी त्याच्या आजोबाच्या जवळ येऊन बसले...

" आजोबा त्या पडक्या घराकडे कोणी का जात नाही त्या घराचा काय भूतकाळ होता आम्हाला सांगाल का ? " अमेय ने पुढाकार घेत आपल्या आजोबांना विचारले...

" आज अचानक तुम्हा मुलांना त्या पडक्या घराबद्दल का जाणून घ्यायचे आहे ? " आजोबांनी त्या सगळ्यांकडे पाहून त्यांना प्रति प्रश्न केला....

" आजोबा प्लीज!  आम्हाला सांगा ना.... त्या घरामध्ये असे काय घडले होते.... " संजनाने त्यांच्याकडे पाहून त्यांना रिक्वेस्ट केली....

" खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्या घरामध्ये एक सावित्री नावाची स्त्री राहत होती... तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासरच्या लोकांनी तिला खूपच यातना दिला होत्या.... असे म्हणतात की तिच्या घरातून पुरेसा हुंडा न मिळाल्यामुळे तिच्या सासरच्यांनी मिळून तिला त्या घरातच जाळले होते...

तिच्या मृत्यूनंतर काही दिवसानंतर हळूहळू तिच्या सासरकडचे एक एक जण मरण पावले... असे बोलतात की त्या घरामध्ये अजूनही तिचा आत्मा भटकतो.. जे पण त्या घरात जातात त्या लोकांना ती जिवंत सोडत नाही... तुम्हा सगळ्या मुलांना मी आधीच सांगतो, चुकूनही त्या घराच्या जवळ जाण्याचा किंवा त्या घराच्या आत जाण्याचा विचार करू नका की , तसा प्रयत्न करू नका... आपल्या घरातली मोठी माणसं काहीतरी विचार करूनच तुम्हाला सांगत असतात त्यांच्या शब्दांना मान द्या... " आजोबा त्या सगळ्यांकडे पाहून गंभीर स्वरात बोलले....

हे ऐकून चौघं थरारले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं...... चौघांनाही याबद्दल काय बोलावे ते सुचत नव्हते.... काही वेळानंतर ते घराच्या बाहेर येऊन बसले....


"आपण काल तिलाच पाहिलं होतं..." संजना हळू आवाजात आपल्या मित्रांकडे पाहून म्हणाली.... आता त्या चौघांनाही आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसला होता...

त्या दिवसानंतर कोणीच त्या पडक्या घराकडे फिरकत नव्हतं....  आणि जे धाडस करायचे, ते पुन्हा परत यायचे नाहीत...


.