Login

पडक्या घराचे रहस्य भाग १

भूत प्रेत या गोष्टीवर विश्वास नसलेली आजची नवीन पिढी जेव्हा अशा गोष्टींचा सामना करते...
पडक्या घराचे रहस्य...


गावाच्या वेशी जवळच  जुनं , पडलेलं एक घर होतं... ते घर आजूबाजूला वाढलेल्या झाडांनी आली वेलीं ने वेधले गेले होते... त्या घराच्या आजूबाजूला मोकळे आवार होते... गावातील इतर घर त्या घरापासून खूपच लांब होती.... गावातील सगळी लोकं त्या घराला " पडकं घर " असे म्हणायचे...

गावातले कोणीही त्या घराच्या जवळ येत नसे... त्या घराजवळून सकाळच्या वेळेस जाता नाही लोक घाई गडबडीने जात होते.... सूर्य मावळती नंतर तर त्या वाटेलाही कोणी जात नव्हते...

गावामध्ये असा समज पसरला होता की रात्रीच्या वेळी त्या घराच्या जवळून जाताना त्या घराच्या आत मधून चित्र विचित्र आवाज ऐकू येतात...... कधीकधी कोणाच्यातरी रडण्याचे, विचित्र आवाजात हसण्याचे , तर कधी कोणाच्याही नावाने हाक मारण्याचे असे भयानक आवाज त्या घरातून सगळ्यांना ऐकायला येत होते आणि मग तिकडून जाणारा त्या आवाजामध्ये मंत्रमुग्ध होऊन त्या घराच्या दिशेने खेचला जातो...

काही काही लोकांनी तर त्या घराच्या खिडक्यांमधून लालसर डोळ्यांसारखा प्रकाश चमकता नाही पाहिला होता आणि किती जरी लोकांना हे पाहत असताना दरदरून घाम फुटला होता ते भीतीने आजारीही पडले होते म्हणूनच त्या गावात राहणारे जुने गावकरी मात्र चुकूनही त्या रस्त्याला जात नव्हते आणि आपल्या पुढच्या पिढीला ही ही गोष्ट समजावून सांगत होते...

पण नेहमीसारखंच, तरुण पिढीला या गोष्टी हसण्यासारख्या वाटत .... एक रात्री अमेय आपल्या इतर मित्रांसोबत घराच्या बाहेर असलेल्या अंगणात गप्पा मारत बसला होता... तेव्हा त्यांचे शाळेचे कॉलेजचे असे खूप साऱ्या विषयांवर बोलणं चालू होते... हळूहळू त्यांनी गावातील त्या पडक्या घराबद्दल बोलायला सुरुवात केली....

" अमेय तुला काय वाटतं रे त्या घरामध्ये खरंच कोणतं भूत राहत असेल का ? " संजनाने त्याच्याकडे पाहून त्याला विचारले...

" मी माझ्या वडिलांकडून त्या घराबद्दल खूप काही ऐकले आहे पण मला या सगळ्या गोष्टींवर काही विश्वास नाही... मला नाही वाटत त्या घरात कोणतं भूत असेल... " अमेय ने आपल्या मनातली गोष्ट सांगितली...

" रोहन तुझं काय म्हणणं आहे याबाबत ? " प्रतीक ने त्याचे चेहऱ्याचे निरीक्षण करत त्याला विचारले....

" मला माहित नाही बाबा पण अशा सगळ्या गोष्टींची फार भीती वाटते.... आपल्या घरातली मोठी मंडळी काहीतरी सांगतात म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल ना ? " रोहन थोडा घाबरलेल्या आवाजात त्या सगळ्यांकडे पाहून बोलू लागला....

" ए घाबरटा तू तर त्या घराचे नाव काढल्याबरोबरच इतका घाबरायला लागला आहेस , तुला जर त्या घरामध्ये जायला सांगितले चांगलीच मजा येईल रे.... " अमेय हसतच त्याच्याकडे पाहून त्याला चिडवण्याच्या स्वरात बोलू लागला....

" मी काय म्हणते आपण सगळे मिळून त्या घरामध्ये जाऊन एकदा बघूया का ? असे कोणते भूत आहे ज्याने आपल्या गावातल्या जुन्या माणसांना घाबरवले आहे ? " संजना हसत त्या तिघांकडे पाहून त्यांना विचारते....

" छान आयडिया आहे... मला तर उत्सुकता आहे त्या घरात जाऊन एकदा पाहायची... ए आपण जायचे का ? " प्रतीक पण एक्साईटेड होऊन सगळ्यांकडे पाहून बोलायला लागला.....

" ए बाबांनो उगाचच विषयाची परीक्षा कशाला घेता... आपल्या घरच्यांनी,  घरातल्या मोठ्या माणसांनी काही सांगितले आहे म्हणजे काहीतरी विचार करून सांगितले असेल ना... उगाचच बिन कामाचा त्या घराकडे जाण्यामध्ये काय अर्थ आहे... खूप रात्र झाली आहे , आपण आपापल्या घरी जाऊन झोपूया का ? " रोहन घाबरलेल्या नजरेने सगळ्यांकडे पाहून बोलू लागतो...

" ए रोहन तू उगाचच घाबरत आहेस.... मी मुलगी असून घाबरत नाही आणि तू का असं वागत आहेस... " संजना वैतागलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला विचारते...