" ए रोहन तू उगाचच घाबरत आहेस.... मी मुलगी असून घाबरत नाही आणि तू का असं वागत आहेस... " संजना वैतागलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला विचारते...
आत्ता पुढें,
" रोहन तू जरा शांत हो... मी काय बोलतो ते ऐका, आपण तसेही आता बाहेरच आहोत... इकडून अर्ध्या तासाच्या अंतरावर ते पडके घर आहे... चला आपण तिकडे जाऊया... घराच्या आत जाऊन फक्त एक राऊंड मारून बाहेर येऊया.... मग तर ठीक आहे ना... " अमेय त्या तिघांकडे पाहून त्यांना विचारतो....
" ए तुम्हाला जर जायचं असेल तर आपण उद्या सकाळी जाऊया ना... आता इतक्या रात्री कशाला जायचे ? आधीच खूप रात्र झाली आहे... " रोहन तरी ही घाबरत आजूबाजूला पाहत बोलतो...
" रोहन अरे तू दुसऱ्या बाजूने विचार करणार आपण त्या घरात जाऊया मला विश्वास आहे तिकडे भूत वगैरे असं काहीही नसणार उलट तिकडे काही नाही हे जेव्हा आपण सगळ्यांना सिद्ध करून दाखवू तेव्हा आपण किती प्रसिद्ध होऊ ? तेव्हा आता असे घाबरणे सोडून दे आणि आमच्या सोबत चल... " अमेय त्याच्याकडे पाहून त्याला लाडीगोडी लावत बोलतो.. संजना आणि प्रतीक ते दोघेपण त्याचा विचार बदलण्याचा प्रयत्न करू लागतात... शेवटी त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून रोहनही जाण्यासाठी तयार होतो...
त्या रात्री नेमकीच पौर्णिमा होती परंतु या चौघांच्याही मनामध्ये तसल्या काही गोष्टी नसल्यामुळे त्या लोकांनी आपल्या सोबत घेऊन आलेल्या टॉर्च आपल्या हातात घेतल्या आणि त्या पडक्या घराच्या दिशेने निघाले...
पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ते पडकं घर अजूनच भयानक दिसत होते... त्या घराचा दरवाजा अर्धवट मोडलेल्या परिस्थितीत होता... भरपूर वर्ष झाल्यामुळे लाकूड कुजल्यासारखे वाटत होते... ते लोक त्या घराच्या आवारात पोचले.... तिकडची ती भयान शांतता पाहून एक सेकंद तर सगळ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली परंतु त्यांनी लगेच स्वतःच्या मनावर ताबा मिळवला... रोहन ला अजूनही भीती वाटत होती पण आपल्या मित्रांना सोबत पाहून पुन्हा आपण घाबरलो आहे असे सांगितले तर ते ओरडतील म्हणून तो शांत राहतो...
अमेय ने पुढे येऊन त्या घराचा दरवाजा उघडला... चर्रर्र असा आवाज करत तो दरवाजा उघडला गेला.... दरवाजा उघडल्याबरोबर आत मध्ये असलेला कुबटसर असा वास त्यांच्या नाकात शिरला तसे सगळ्यांनीच आपल्या हाताने आपले नाक दाबले... जुनाट , ओलसर , वर्षानुवर्ष दरवाजा बंद असल्यामुळे तसा वास त्या घरात पसरला असेल...
" अरे या घरातून असा विचित्र असा वास का येत आहे ? " रोहन आपले नाक दाबतच सगळ्यांकडे पाहून विचारतो...
" रोहन अरे मागची कितीतरी वर्ष या घराकडे कोणी फिरकले सुद्धा नाही ना या घराचा दरवाजा उघडून पाहण्याचा प्रयत्न केला मग आतून असा वास येणारच ना... " अमेय ने त्याच्या शंकेचे निवारण केले...
त्या चारही मित्रांनी एकत्र त्या घराच्या आत प्रवेश केला... त्या घराचे निरीक्षण करत असताना घराच्या प्रत्येक भिंतीवर कोळ्यांचे जाळे त्यांना लटकलेले दिसून येत होते...
" घराच्या आतले वातावरण खूपच भयानक वाटत आहे रे.... " रोहन हळू आवाजात आपल्या मित्रांकडे पाहून बडबडला...
" शांत बस! तू स्वतःही घाबरू नको आणि आम्हालाही घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस...." अमेय ने चिडून हळू आवाजात त्याला सांगितले...
" सगळेजण या घरात भूत आहे असे बोलत होते पण मला तरी अजून कुठे ते दिसले नाही... बहुतेक आपल्याला बघून पाहून गेले असावे... " संजना एक नजर रोहन कडे पाहून हसतच म्हणाली....
ते लोक हॉलमध्ये चालून पुढे दुसऱ्या रूमच्या दिशेने जाऊ लागले... तिकडे एका कोपऱ्यात मोडलेली खुर्ची तशीच पडून होती, काही तुटलेली भांडी पाडली होती...
.
..
...
To be continued...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा