Login

पडक्या घराचे रहस्य भाग ३

भूत प्रेत या गोष्टीवर विश्वास नसलेली आजची नवीन पिढी जेव्हा अशा गोष्टींचा सामना करते...
ते लोक हॉलमध्ये चालून पुढे दुसऱ्या रूमच्या दिशेने जाऊ लागले... तिकडे एका कोपऱ्यात मोडलेली खुर्ची तशीच पडून होती, काही तुटलेली भांडी पाडली होती...

आत्ता पुढें,

" अरे ! तिकडे बघा...  ते काय आहे? " रोहन थोड्यावेळ मोठ्या आवाजातच किंचाळला... बंद घर असल्यामुळे अचानक त्याचा आवाज पूर्ण घरांमध्ये घुमला... शांततेचा भंग झाल्यामुळे त्याचे मित्रही घाबरून तो दाखवत होता त्या दिशेला पाहू लागले... तिकडे खाली जमिनीवर काही रक्ताचे डाग पसरलेले होते, पण ते दाग खूप जुने असावे असे दिसून येत होते...

" हे... हे खरंच रक्त असेल का? पण कोणाच ? इकडे तर कोणी ही येत नाही.... " रोहन त्या दिशेला पाहून घाबरतच आपल्या मित्रांना सांगू लागला... प्रतीक ने आपल्या हातात असलेली टॉर्च ची लाईट त्या दिशेला फिरवली आणि तो त्या डागांचे व्यवस्थित निरीक्षण करू लागला....

" हे डाग पाहून तर खूपच जुने वाटत आहे... खूप वर्षापूर्वीचे असावे बहुतेक... पण तरी ही" प्रतीक थोडा खाली वाकून त्या डागांचे व्यवस्थित निरीक्षण करत म्हणाला... बाकी तिघही त्याच्या भोवती घोळका करून उभे होते आणि अचानक त्यांच्यामागे असलेला घरचा मेन दरवाजा बंद झाला.... तो दरवाजा बंद होण्याचा धाडकन असा आवाज झाला आणि सगळ्यांच्या अंगावर शहारे आले...

" हा दरवाजा कोणी बंद केला असावा ? " रोहन घाबरून त्या दरवाजाकडे पाहत सगळ्यांना विचारू लागला...

" आपल्या शिवाय इकडे दुसरे कोणी ही नाही... " प्रतीक सगळ्यांकडे एक नजर बघत त्या दरवाज्याकडे पाहून म्हणाला... बोलताना त्याचा आवाजही आता थोडा थरथरत होता...

सगळ्यांचे लक्ष त्या दरवाजाच्या दिशेने असताना अचानक घराच्या वरच्या मजल्यावर पावलांचा चालण्याचा आवाज त्यांना येऊ लागला... धड... धड... धड... त्या आवाजाने घाबरून सगळ्यांनीच वरच्या दिशेला पाहिले...

" कोण आहे तिकडे ? " अमेय ने वर पाहतच जोरात ओरडून  विचारले... पण काही उत्तराला नाही आणि पावलांचा आवाजही थांबला... सगळं वातावरण अचानक शांत झालं आणि मधूनच एक भयानक हसण्याचा आवाज सगळीकडे घुमू लागला....

" हा..... हा.... हा..... " त्या आवाजाने घाबरून संजना ने पटकन अमेयचा हात पकडला,  तर रोहनने प्रतीकचा...

" घाबरू नका....  चला, आपण वर जाऊन बघूया... " प्रतीक ने त्या सगळ्यांकडे पाहून त्यांना सांगितले...

" बर नको जायला... प्रतीक, मला वाटते आपण आता या घरातून बाहेर जायला हवे... " रोहन प्रतीक कडे पाहून त्याला सांगतो...

" अरे रोहन जर कोणी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर... आपल्याला वर जाऊन बघितले पाहिजे.. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत... " अमेय शांतपणे त्याच्याकडे पहात त्याला सांगतो... ते चौघेही एकमेकांकडे पाहू लागले पण नंतर धीर धरत त्यांनी वर जाण्याच्या पायरीवर पाय ठेवला... त्या पायऱ्या लाकडाच्या असल्यामुळे आणि खूपच वर्षांपूर्वीच्या असल्यामुळे त्या आवाज करत होता जणू कधीही त्या तुटेल असे वाटत होते...

वरच्या मजल्यावर पोचल्यावर त्यांना समोर असलेली एक खोली दिसली....  ती खोली अर्धवट उघडी होती... खोलीच्या आतून मंद दिव्याच्या प्रकाशासारखं काहीतरी दिसत होतं...

" हा कसला प्रकाश असेल ? " संजनाने हळू आवाजात त्यांना विचारले... अमेय ने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच त्या खोलीचे दार उघडले... त्या चौघांची नजर त्या खोलीच्या आत गेली... त्या खोलीच्या कोपऱ्यामध्ये एक जुना पलंग होतं आणि त्या पलंगावर पांढरे कपड्यातील एक आकृती बसली होती... तिचे केस विस्कटलेले, चेहरा अंधारात लपलेला असल्यामुळे तो दिसून येत नव्हता...