Login

एक भेट भाग १

मैत्री हे नात खूप अजब आहे..नवीन ऊर्जा देणार आणि अजून घेणार...
अग मुक्ता किती दिवस झाले तू आलीच नाहीस भेटायला_” आर्या .
“हो ग जमतच नाहीये सध्या.. इतकं काम पेंडिंग आहे ना.. ऑफिस , घर ,मुलं ,काही केल्या टाईमच मिळत नाही .”मुक्ता
“अगं वेळ मिळतच नसतो तो काढावा लागतो ,स्वतःसाठी ..सांग आता कधी भेटायच? खूप दिवस झाले एकदा भेटूयात आपण ..”आर्या
“चालेल मी तुला उद्या कळवते”मुक्ता
“हे बघ ,पुन्हा तेच ..आजच काम उद्यावर ,तुला उद्या पुन्हा वेळ मिळणार का मला फोन करायला? हाच फोन आपला तीन महिन्यांनी झालाय.. मी काय म्हणते या शनिवारी भेटूया आपण ,कसेही कर पण मॅनेज कर ,ओके. मी ऐकणार नाही.”आर्या
“बर बाई भेटूयात या शनिवारी .मस्त गप्पा मारू
चालेल बाय ..”मुक्ता..
“ये हुई ना बात..”आर्या खुषीत असते.

मुक्ता किचन मध्ये काम करतच आर्याशी बोलत होती.आर्या आणि मुक्ताची मैत्री तशी पाहिली तर जुनी कारण त्या एकाच कॉलेजमध्ये होत्या पण त्यांची भेट होत नव्हती . आर्याची जेव्हा बदली झाली तेव्हा दोघी एकाच शहरात होत्या आणि एक दिवस अचानक मॉलमध्ये त्यांची भेट झाली…
आर्या ला खूप आनंद झाला मुक्ताला भेटून, एका नव्या शहरांमध्ये एक जुनी मैत्रीण कोणालाही खूप आनंद होतो. तसा मुक्तालाही झाला .त्याच्यामुळे नंबर एक्सचेंज केले आणि गप्पा होऊ लागल्या. एवढ्या मोठ्या शहरांमध्ये दोन टोकांवरती राहणाऱ्या ह्या दोघी मैत्रिणी आता एकमेकांशी बऱ्याचदा गप्पा मारत होत्या ,पण मुक्ताला वेळ काढणं काही जमत नव्हता . कॉलेज मध्ये असताना दोघींचे ग्रुप वेगवेगळे होते. पण एकमेकांना ओळखायच्या त्या ..कधी मध्ये हसायच्या ,बोलायच्या त्यांच्यातला तोच एक दुवा होता जो आता घट्ट मैत्री मध्ये रुपांतरीत झाला होता ..त्यांचे काही कॉमन फ्रेंड्स होते पण या दोघींना एकमेकांबद्दल एवढी माहिती नव्हती ..
ही मैत्री आता नवीन रूप धारण करणार होती.आर्या कंपनीत काम करत होती.कंपनीमध्ये मॅनेजर होती .खूप स्ट्रेस आणि ताणतणाव तीच्या कामांमध्ये असायचा पण घर नवरा मुलगा आणि शिवाय बाहेरचं काम हे ती व्यवस्थित सांभाळत होती.आर्याच् चा स्वभाव हसत खेळत हॅप्पी अन् बोलकी असा होता .
मुक्ता ही एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होती.घर आणि दोन मुलांच्या मध्ये तिचं गणित थोडं गडबडून जायचं .सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम.. घराचं काम, मुलांचे शिक्षण हे सगळं बघता बघता ति दमून जायची.
क्रमशः
नमस्कार, वाचकहो..मला विसरलात न....अहो इतक्या दिवस ब्रेक घेतला होता...पण पुन्हा प्रयत्न करते आहे लिखाणाचा..अशा आहे तुम्हाला आवडेल ही कथा..
तुमचं प्रेम नक्की कळवा आणि कथेला प्रतिसाद द्या.
  1. लेखिका - अनुराधा पुष्कर

🎭 Series Post

View all