एक भन्नाट रोमँटिक कथा, तरुणपणातील प्रेमाची धडधड पुन्हा जागी झालेली
लेखन : सुनिल पुणे TM
लेखन : सुनिल पुणे TM
तरुणपणीचं प्रेम विचित्र असतं ते डोळ्यांच्या कोपऱ्यातून सुरू होतं,
हृदयाच्या ठोक्यांपर्यंत पोचतं,
आणि अंगावर रोमांच उभे करत आत्म्याच्या खोलवर स्थिरावतं...

...ती आणि तो…दोघांचीही सुरुवात अशीच झाली होती.
कॉलेजच्या पहिल्या वर्षी ती त्याला दिसली, आणि त्याच्या मनात एखाद्या वादळासारखं काहीतरी उठलं. ती चालत जाताना तिच्या केसांच्या टोकांवर अडकलेला वारा त्याला स्पर्श करत असे, आणि त्याच्या अंगावर नकळत रोमांच उठत.
तिला पाहिलं की त्याचा श्वास थांबत असे. तिने त्याच्याकडे पहिले तर तिच्या नजरेतला प्रकाश त्याच्या संसारभराच्या अंधाराला उजेड देईल असं वाटत असे.

त्यांचं प्रेम निर्मळ होतं, तरुण होतं, धडधडीत होतं
पण नशिबाला त्यांचं एकत्र येणं पसंत नव्हतं.
घरची परिस्थिती, जबाबदाऱ्या, समाजाची बंधनं…
सगळ्यांनी मिळून त्या स्वप्नवत प्रेमाची दोरी तडकवली.
दोघांनीही दुसरीकडे लग्नं केली.
जीवन पुढे सरकलं… पण मन तिथेच थांबलं.
आठवणींचा एक कोपरा नेहमीच जिवंत राहिला जिथे तिला त्याचं हसू आणि त्याला तिच्या नजरेची ऊब कायम दिसत राहिली.

वर्षानुवर्षं एकामागून गेली… दोघेही रिटायर झाले.
मुलं मोठी झाली, कर्तव्यं कमी झाली, पण मनातल्या पोकळीचं काय?
प्रेमाचा जुना धागा अजूनही कुठेतरी जिवंत आहे, अशी हलकीशी जाणीव मनाला होतच होती.

एका धुकट पहाटेचा तो दिवस
जिस बागेत तो दररोज चालत जायचा, तिथेच अचानक त्याचा श्वास अडकून पडला.
समोरच्या बाकावर बसलेली स्त्री त्याच्यासाठी अजूनही परीसारखीच होती.
केस पिकले होते, पण त्या चेहऱ्यावरचं तेज? ते अजूनही त्याच्या तरुणपणीच्या आठवणीसारखंच धगधगतं होतं.
तो तिला पाहतच राहिला…
काही क्षणांनी तीनेही त्याच्याकडे पाहिलं आणि त्या एका नजरेतून वर्षानुवर्षे दडवलेली ओळख उजळून बाहेर आली.

ती हलकंसं हसली.
त्याच हसण्यात तिच्या कॉलेजकाळची चमक अजूनही होती.
तो तिच्या जवळ जाऊ लागला, प्रत्येक पावलागणिक त्याच्या अंगावर रोमांच धावत होते. “तू… इतक्या वर्षांनी?” तो थरथरणाऱ्या आवाजात म्हणाला. तीने शांतपणे उत्तर दिलं, “काही नाती कितीही वर्षांनी भेटली तरी पहिल्या क्षणापासून तिथेच उभी असतात.”

त्या भेटीनं दोघांच्या मनात दडून बसलेलं तरुणपण पुन्हा जागं झालं.
ते दररोज भेटू लागले
पहाटेच्या थंड हवेत तिच्या सुगंधाचा मंद स्पर्श त्याच्या मनाला परत मोहवू लागला,
आणि त्याच्या आवाजातला तोच गोड आग्रह तिला पुन्हा लाजवू लागला.

एकदा चालताना तिच्या हाताने नकळत त्याचा हात धरला.
त्या क्षणी त्याच्या शरीरात एखादी अदृश्य वीज पसरली.
तिला देखील जाणवलं
इतक्या वर्षांनी तिच्या हातात तो स्पर्श पुन्हा आला होता… आणि मन थरारून उठलं होतं.

सूर्यास्ताच्या रंगांनी भरलेल्या वातावरणात एका संध्याकाळी तो म्हणाला,
“तरुणपणी तुला हरवलं… पण अजूनही तूच आहेस माझ्या मनात. उरलेलं आयुष्य माझ्यासोबत चालशील?”
तीने त्याचा हात अलगद दाबला आणि म्हणाली,
“तुझ्यासोबत चालणं मी कधीच थांबवलं नव्हतं… फक्त वाट वेगळी झाली होती. आता पुन्हा एकत्र चालूया.”

त्यांच्या हृदयाचा ठोका त्या क्षणी पुन्हा तरुणपणासारखा धडधडू लागला.
वेळ जणू थांबून गेला होता…
आणि प्रेमाची दुसरी इनिंग सुरू झाली होती
आणखी खोल, आणखी उबदार, आणखी रोमँटिक.
वेळ जणू थांबून गेला होता…
आणि प्रेमाची दुसरी इनिंग सुरू झाली होती
आणखी खोल, आणखी उबदार, आणखी रोमँटिक.
आता लोक त्या बागेत दोन वयस्क व्यक्तींना हातात हात घेऊन चालताना पाहतात.
पण त्यांचं प्रेम?
ते अजूनही १८ वर्षांचंच आहे.
डोळ्यात चमक, हृदयात धडधड, अंगावर रोमांच
सगळं तसंच ताजंतवानं.
पण त्यांचं प्रेम?
ते अजूनही १८ वर्षांचंच आहे.
डोळ्यात चमक, हृदयात धडधड, अंगावर रोमांच
सगळं तसंच ताजंतवानं.
कारण प्रेमाला वय नसतं…
उत्सुकता कधी मरत नाही…
आणि तरुणपण?
ते कधीच संपत नाही, जेव्हा मनातून कोणीतरी अजूनही “आपलं” वाटतं.

सुनिल पुणे TM 9359850065
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा