Login

माझे मन

मनातले अवर्णनीय भाव
मोहक होई मन माझे
भास होई तुझा जसा
मनात लपलेले सत्य
दाखवतो हा आरसा...

चैतन्य भरून आले
हृदयात माझ्या आज
आरशात पाहून प्रतिमा
मलाच वाटते आहे लाज...

अथांग या सागराप्रमाणे
मन ही फिरूनी आले
तुझ्या प्रेमात पूर्ण बुडूनी
मी लगेच तुझीच झाले....