मीनाक्षी थोडं हसली,
“गावाकडच्यांचं हेल्थ निसर्ग सांभाळतो गं सोनल.”
“गावाकडच्यांचं हेल्थ निसर्ग सांभाळतो गं सोनल.”
त्या वाक्यावर सासूबाईही हसल्या.
“हो ना, आम्ही गावाकडचे म्हातारे लोक अजूनही शेतात काम करतो!” सासुबाईंनी पण शांत स्वरात उत्तर दिलं.
सोनल थोडीशी गप्प बसली, पण लगेचच मोबाईलकडे वळली. तिचं मुंबईचं आयुष्याने तिला एवढं झपाटून टाकलं होतं की इथली मोकळीक, शांतता तिला विचित्र वाटत होती.
संध्याकाळी सोनल आणि तिचा भाऊ, म्हणजे मीनाक्षीचा नवरा विक्रांत, दोघे अंगणात बसले होते.
“भाऊ, तू फारच बदलला आहेस रे,” सोनल म्हणाली.
" का ग सोनू , तू असे का बोलत आहेस ? " विक्रांत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत तिला विचारतो.
“पूर्वी घरात तूच सगळं ठरवायचास, आणि आता बघ — सगळं वहिणींच्या मर्जीवर चालत आहे. ” सोनलने टोमणा मारला.
“अगं, संसारात सगळं ठरवायला एकजण असला की दुसऱ्याला ऐकावं लागतं. आणि मीनू विचारपूर्वक वागते.” विक्रांतने सहजच हसून उत्तर दिले.
“हं, पण तू अगदी सगळं तिच्या मागे मागे करत आहेस असेच दिसून येत आहे. " सोनलचा स्वर उपरोधिक झाला होता.
मीनाक्षीने हे दुरून ऐकलं. मनात एक काटा टोचल्यासारखा वाटला. ‘मी काही वर्चस्व गाजवत नाही ना?’ ती मनात विचार करत होती.
रात्री जेवताना सोनल म्हणाली,
“ वहिनी, तुम्ही एवढं सगळं करताय, पण बाहेर काम करत नाही का? मुंबईत तर स्त्रिया ऑफिस, घर सगळं सांभाळतात.”
मीनाक्षीने शांतपणे उत्तर दिलं,
“हो गं, माझ्या संसाराचं ऑफिस हे घरच आहे. सगळं इथंच सांभाळावं लागतं आणि या घरासाठी करताना मनाला वेगळच समाधान लाभत. ”
“हो गं, माझ्या संसाराचं ऑफिस हे घरच आहे. सगळं इथंच सांभाळावं लागतं आणि या घरासाठी करताना मनाला वेगळच समाधान लाभत. ”
सोनल गप्प झाली. सासूबाई मात्र मनोमन खुश झाल्या.
दुपारी अचानक सोनलची महागडी बॅग गायब झाली. सगळीकडे शोधाशोध झाली. ती बॅग म्हणजे तिचा सगळा संसार मोबाईल, कार्ड्स, पैसे, ऑफिसचे डॉक्युमेंट्स!
“वहिनी, माझी बॅग कुठे ठेवलीत तुम्ही? तुम्हीच साफसफाई करत होतात ना?” सोनलचा आवाज वाढला होता आणि आवाजातला रागही स्पष्टपणे दिसून येत होता.
“मी झाडलं होतं, पण तुझ्या बॅगला हात लावला नाही गं.” मीनाक्षीने घाबरून उत्तर दिले.
“मग कुठे गेली? कुणीतरी घेतलीच असणार!” सोनवणे लगेच पुढे स्वर ओढला.
सासूबाई घाबरल्या. विक्रांतने सगळीकडे शोध सुरू केला. शेवटी बॅग अंगणाच्या ओट्याखाली सापडली कुत्र्याने ओढून नेलेली!
" हे काय सोनल तुलाच तुझी बॅग व्यवस्थित ठेवता येत नाही. अगं जरा नीट शोधायचं तरी होतं , आधीच असा आरडाओरडा करायची काय गरज होती. " विक्रांत तिच्या हातात शांतपणे बॅग देत म्हणाला.
मीनाक्षीने बॅग स्वच्छ करून सोनलकडे दिली. सोनलला थोडं लाजल्यासारखं झालं.
“सॉरी वहिनी, मी जरा घाईत बोलले…”
“हरकत नाही, घरातलीच तर आहेस.” मीनाक्षी फक्त म्हणाली.
त्या एका वाक्याने सोनलचं मन हललं. तिच्या डोळ्यांत थोडं पाणी आलं.
’ आतापर्यंत मी कधीतरी वेळा तिला टोचून बोलले पण तिने कधीच माझा राग राग केला नाही. वहिणी इतकी शांत कशी काय वागू शकते ? ’ सोनलचे मन तिलाच प्रश्न विचारत होते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा