" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद लेखन
पहिलं भाडं! भाग २
©® एकता माने
दोनशे रुपयाची करकरीत नोट पाहून दीपकला खूप आनंद झाला. आज ही आपली पहिली कमाई, आपण आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पैसे कमावले, त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरही झळकून येत होता. तो काही क्षण तर त्या नोटेकडे पाहत राहिला. ती वेळ त्याच्यासाठी खूप खास होती आणि त्याला मिळालेलं पहिलं भाडं! खूप स्पेशल...
"बरं ऐक ना. मला इकडे समोरच्या गल्लीमध्ये थोडं काम आहे. लगेच परत जायचं आहे. जर तू फक्त दहा मिनिटं माझी इकडे वाट पाहिली तर मग मी तुला रिटर्न भाडंही देईन." तो माणूस त्याच्याकडे पाहून शांत स्वरात म्हणाला.
'काय भारी! एकदाच दोन वेळा भाडं मिळणार. म्हणजे एका दिवसातच मी एवढी कमाई करणार. परत पैसे मिळणार असतील तर थांबायला काय हरकत आहे आणि तसेही मला त्याच दिशेला जायचं आहे. मग त्यांची वाट पाहत थोडावेळ थांबून त्यांना सोबत घेऊनच जाऊ.' दीपकने मनामध्ये विचार केला.
आपल्याला एका वेळीच एवढे पैसे मिळणार आणि हे पैसे जेव्हा आपण घरी जाऊन आपल्या आईला देऊ तेव्हा तिला किती आनंद होईल या विचारानेच त्याने समोरच्या माणसाला होकार दिला आणि तिकडेच आपली रिक्षा थांबवून त्याची वाट पाहू लागला.
तो माणूस आत गेला. काही वेळ गेला. दीपक गाडीच्या हँडलवर बोटं वाजवत बसला होता. त्याच्या मनात आता कल्पनांची गर्दी सुरू झाली होती.
'आपण आज चक्क इतके रुपये कमावले हे जेव्हा आपल्या घरी आपल्या आईला समजेल तेव्हा ती किती खूश होईल? या पैशांनी आपल्या घरात आपण आज गोडाचे जेवण बनवायला सांगू. सगळ्यांना किती आनंद होईल.'
तो मनाशी खूश झाला होता.
थोड्या वेळाने तोच माणूस बाहेर आला; पण आता तो बदललेला होता. त्याने पांढरा शर्ट-पॅन्ट काढून टाकलेला आणि त्याऐवजी ट्रॅफिक हवालदारचा गणवेश घातलेला! हातात काठी, डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर लाल पट्टी.
दीपकचे डोळे विस्फारले गेले. त्याच्या तोंडून आवाज निघाला,
"अ..अहो! तुम्ही… तुम्ही हवालदार?"
"अ..अहो! तुम्ही… तुम्ही हवालदार?"
हवालदार हसत म्हणाला,
"हो आणि तू? एवढा लहान असून रिक्षा चालवतोयस?"
"हो आणि तू? एवढा लहान असून रिक्षा चालवतोयस?"
दीपक गप्प बसला. चेहरा पांढराफटक झाला. त्याच्या अंगातलं सगळं धैर्य क्षणात गळून पडलं. त्याला वाटलं,
'आता तर मला थेट पोलीस ठाण्यात नेतील. बाबांना बोलावतील. किती मोठी चूक झाली माझ्याकडून!'
'आता तर मला थेट पोलीस ठाण्यात नेतील. बाबांना बोलावतील. किती मोठी चूक झाली माझ्याकडून!'
तो हवालदार गप्पपणे येऊन त्याच्या रिक्षामध्ये जाऊन बसला.
"एवढा कसला विचार करत आहेस? चला, निघायला पाहिजे." त्याने दीपककडे पाहून सांगितले. दीपकने शांतपणे आपली रिक्षा चालू केली आणि त्या माणसाने सांगितलेल्या दिशेला रिक्षा चालू लागली.
यावेळी मात्र दीपकच्या अंगात असलेलं होतं नव्हतं ते सगळं अवसान गळून पडलं. इतका वेळ त्याच्या मनामध्ये असलेला सगळा कॉन्फिडन्स खाली आला.
'किती काय काय विचार करून ठेवले होते; पण सगळे विचार व्यर्थ! आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला घरच्यांकडून ओरडा मिळू नये. हा हवालदार नक्कीच आपल्याला त्याच्या चौकीमध्ये घेऊन जाणार.' दीपक शांतपणे समोर पाहून रिक्षा चालवत तर होता; परंतु त्याच्या मनामध्ये आता वेगवेगळ्या विचार सुरू झाले होते आणि भीतीने हृदय जास्तच धडधड करत होते.
"काय रे बाबा, एवढं घाबरतोस का? नाव काय तुझं?" त्याच्या मनाची अवस्था मागे बसलेल्या हवालदारालाही समजली म्हणून त्याने शांतपणे प्रश्न विचारला.
"दी... दीपक." तो घाबरत म्हणाला.
"दीपक, ऐक. गाडी चालवणं शिकायला हरकत नाही; पण योग्य वय झाल्यावरच परवानगी घेऊन गाडी चालवायची असते. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो. तुला माहितीये ना?" त्या हवालदाराने समजावण्याच्या सुरात सांगितले.
क्रमशः
©एकता माने
©एकता माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा