" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद लेखन
पहिलं भाडं! भाग ३ (अंतिम भाग)
©® एकता माने
"हो… पण मी फक्त बाबांनी सांगितलं म्हणून रिक्षा गॅरेजला नेत होतो. मी खरं तर अजून शाळेतच आहे." दीपकने हळू आवाजात सांगितलं.
हवालदार थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. त्याला त्या मुलाच्या डोळ्यांतली निरागसता दिसत होती.
तो कडक आवाजात नाही, तर प्रेमळ आवाजात म्हणाला,
"पहा, पहिलं भाडं घ्यायचं म्हणून आनंद झाला असेल तुला. रिक्षाही बऱ्यापैकी चालवतो तू; पण हा मार्ग चुकीचा आहे. जर आज एखादा अपघात झाला असता तर? तुला आणि इतरांना किती धोका झाला असता, विचार केलास का?"
"पहा, पहिलं भाडं घ्यायचं म्हणून आनंद झाला असेल तुला. रिक्षाही बऱ्यापैकी चालवतो तू; पण हा मार्ग चुकीचा आहे. जर आज एखादा अपघात झाला असता तर? तुला आणि इतरांना किती धोका झाला असता, विचार केलास का?"
दीपकच्या डोळ्यात पाणी आलं.
"मला माफ करा साहेब. मी पुन्हा कधीही असं करणार नाही." दीपकने खऱ्या मनाने माफी मागितली.
काही वेळाने ते दोघं पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचले जिकडे तो हवालदार दीपकच्या रिक्षामध्ये बसला होता. हवालदार रिक्षामधून खाली उतरला आणि त्याने दीपकच्या हातात दुसरी दोनशे रुपयांची नोट ठेवली.
"नाही. नको सर. ते... मला माफ करा. मी पुन्हा अशी चूक करणार नाही." दीपक अजूनही घाबरलेल्या आवाजात त्यांच्याकडे पाहून सांगू लागला.
"हे घे आणि तुझ्याजवळ ठेव; पण हा पैसा कमावला म्हणून नाही तर एक शिकवण म्हणून ठेव. ही शिकवण तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. काम कितीही छोटं असो की मोठं, ते योग्य मार्गानेच करायचं असतं. अन्यथा छोट्या चुकीमुळे मोठा पश्चात्ताप करावा लागतो." हवालदाराने त्याचा हात पकडून त्याच्या हातावर पैसे टेकवले आणि अगदी मवाळ भाषेत त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला सांगितलं.
दीपक त्या नोटेकडे पाहत राहिला. त्याला ते फक्त पैसे वाटले नाहीत, तर जणू काही तो त्याच्या जीवनाचा पहिला धडा होता.
"या वेळेला तुला मी सोडत आहे; पण यापुढे तू मला पुन्हा कधी रिक्षा चालवताना दिसला नाही पाहिजे. हे वय तुझे अभ्यास करायचे आहे. तेव्हा आधी अभ्यास कर आणि योग्य वेळ आली की प्रॉपर लायसन्स काढून रिक्षा चालव." त्या हवालदाराने थोड्या कडक भाषेमध्ये त्याला समजावले. दीपकनेही होकारात मान हलवली आणि लगेच आपली रिक्षा गॅरेजच्या दिशेने वळवली.
तो थेट गॅरेजमध्ये पोहोचला. गाडी तशीच उभी करून तो घरी आला. त्याला घरी आलेला पाहून त्याचे बाबा त्याच्या जवळ आले.
"काय रे, नीट पोहोचलास ना?" त्याला बराच वेळ लागला म्हणून त्यांनी काळजीने विचारले.
दीपकने गप्प खिशातून त्या नोटा काढल्या आणि बाबांच्या हातात ठेवल्या.
"हे काय?" बाबांनी आश्चर्याने त्या दोन नोटांकडे पाहिले आणि त्याला विचारले.
दीपक हळू आवाजात म्हणाला,
"बाबा, आज मला पहिलं भाडं मिळालं; पण त्याचसोबत एक शिकवणही मिळाली. मी अजून लहान आहे. मला अजून शाळा शिकायचीय. गाडी शिकायची असेल तर तुमच्या सोबतच शिकेन; पण एकटा असं नाही करणार. वचन देतो."
"बाबा, आज मला पहिलं भाडं मिळालं; पण त्याचसोबत एक शिकवणही मिळाली. मी अजून लहान आहे. मला अजून शाळा शिकायचीय. गाडी शिकायची असेल तर तुमच्या सोबतच शिकेन; पण एकटा असं नाही करणार. वचन देतो."
बाबांनी त्याला मिठी मारली.
"वा रे माझ्या मुला! आज खरंच तू मोठा झाला आहेस. आज जी गोष्ट तुला समजली आहे ती तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या शिकवणीचा तुला पुढे जाऊन खूप उपयोग होईल." बाबांनी त्याच्याकडे पाहून समाधानाने उत्तर दिले.
दीपकने त्यांच्या हातात दिलेल्या या दोन नोटांपैकी बाबांनी एक नोट त्याच्या हातात परत दिली. दीपकने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.
"हे तुझ्या आयुष्यातले पहिलं भाडं आहे. आज तू तुझ्या आयुष्यातलं पहिलं भाडं आणि त्याच्यासोबतच एक महत्त्वाची शिकवण घेतली आहे. त्यामुळे ही एक नोट तू कायम तुझ्याजवळ ठेव. ज्यावेळी तू या नोटेकडे बघशील, तेव्हा तुला आजचा दिवस आणि आज घेतलेली शिकवण आठवेल." बाबांनी शांत चेहऱ्याने त्याच्याकडे पाहून त्याला सांगितले.
त्या दिवशी दीपकला समजलं की हे पहिलं भाडं फक्त पैसा नव्हतं, ती एक जबाबदारी होती. त्या दोनशे रुपयांच्या नोटेत त्याला कायदा, प्रामाणिकपणा आणि आयुष्याचं खरं मूल्य समजलं.
ती नोट त्याने आपल्या वहीत ठेवली आणि तिथे लिहिलं,
'माझं पहिलं भाडं – माझी पहिली शिकवण.'
'माझं पहिलं भाडं – माझी पहिली शिकवण.'
समाप्त.
©एकता माने ( संघ कामिनी)
©एकता माने ( संघ कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा