माझा होशील ना? भाग -71

माझा होशील Na
मागील भागात आपण पाहिलं कि, भूतकाळात घडलेल्या घटनापासून अजिंक्य बेखबर होता....त्यामुळे तो कॉन्फरेन्स ला गेलेल्या च्या आठवणी तिच्या सोबत शेअर करत होता.... पण तिला काही आठवत नव्हतं.... ती तशीच चक्कर येऊन कोसळली... तस अजिंक्य ने घाबरून त्याच्या वडिलांना आवाज दिला... डॉक्टर सतीश ह्यांनी तिला इंजेक्शन देऊन शांत केल... आता पाहूया पुढे.....,

           डॉक्टर सतीश विचार करत होते........हा अजिंक्य कधी दुसऱ्याची अवस्था समजून घेईल.....एवढी मोठी रिस्क सावनी घेणार नाही नक्कीच अजिंक्य ने तिला वर जायला भाग पाडले असणार..... आता ह्या सगळ्या बद्दल त्याच्याशी बोलायलाच लागेल......

असा आयुष्यात कधी पेच निर्माण होईल असे वाटलेच नव्हते.. त्यामुळे मनाची.. या प्रसंगासाठी कोणतीच तयारी केली नव्हती.

त्या सगळ्यांची रात्र जवळपास अशीच गेली... टेन्शन मध्ये..... कुणालाही झोप लागली नाही....... पहाटे पहाटे अजिंक्य चा डोळा लागला.... पण त्याला सकाळी जाग आली ती विहंग च्या रडत उठण्यामुळे...!.

खरेतर तसे उजाडले होते बऱ्यापैकी..... सहा वाजले असावेत...... त्याने विहंग ला पुन्हा थोपटून झोपवले... आणि सावनी कडे एक नजर टाकून खाली गेला... खाली गेल्यावर त्याने पाहिलं कि त्याचे बाबा डॉक्टर सतीश हॉल मध्ये असणाऱ्या सोफ्यावर झोपले होते......त्याच्या मनात विचार आला.....

        " बाबा कदाचित सावनी च्या चिंतेत विचार करत बाहेरच हॉल मध्येच झोपी गेले असावेत.... झोपू दे त्यांना ...... त्यांची सुद्धा खूप दगदग होते......"


असा विचार करून लवकर उठून देखील त्यांना उठवायला गेला नाही.. !

त्याने तसंच स्वयंपाक घरात जाऊन सर्वांच्या साठी चहा आणि स्वतःसाठी कॉफी बनवून घेतली..... आणि तो पण हॉल मध्ये असणाऱ्या सोफ्यावर येऊन बसला......तो तिथे नुकताच बसलेला असताना विहंग वरून धावत पळत आणि रडत खाली उतरून आला.... ! तो खूपच रडत होता........अजिंक्य ने त्याला विचारलं....,

"विहंग काय झालंय? तु रडतोस का.....? "

"ड्या... डा.... मम्मा..... "

विहंग अजूनच रडत म्हणाला..

हा तिला काय झालं.....? "

तेवढ्यात त्यांचं लक्ष त्याच्या नाइटी वर गेलं......त्याचा नाइट शर्ट मागच्या बाजूला ओला झाला होता... रक्त मिश्रित पाण्याने..! हे पाहून तो घाबरला...... त्याने पटकन विहंग चा शर्ट काढला आणि त्याला कुठे लागलंय ते पाहू लागला....पण त्याला कुठेही लागलेलं दिसत नव्हतं.....तस त्याने विहंग ला विचारलं....

" विहू कुठे लागलंय तुला? "

"ड्या... डू.... मला नाही मम्मा ला लागलंय....... कुठे तरी... मी उठवतोय पण ती उठत नाही आहे...... "


विहंग कसातरी म्हणाला....

रात्री ते तिघेही एकाच ठिकाणी झोपले होते..! पण सकाळी अजिंक्य उठून आला तेव्हा तर असे काही आढळले नव्हते त्यांना...!

अजिंक्य चे बाबा देखील विहंग च्या रडण्याने जागे झाले होते एव्हाना आणि समोरचे दृश्य पाहून मनातून सचेत देखील झाले होते......


म्हणजे...! म्हणजे पुन्हा एकदा...? हो ज्याची भीती वाटत होती तेच झाले होते...!
रात्रीचा तो अटैक साधा नव्हता...! आणि आता सावनी लेबर पेन मध्ये पोहोचून देखील पूर्ण ट्रांस मध्ये असल्याने समजू शकले नव्हते ते...!

पण हे दृश्य पाहताच डॉ. सतीश जे समजायचे ते समजून गेले होते... त्यांनी त्या क्षणी आधी तिच्या आई वडीलांना उठवून सावनी सोबत पुन्हा तेच घडतंय..... आपण तयारीत राहूया चला..... असं म्हणून काल च आणि आज पाहिलेलं सगळं सांगितलं.....


विहंग ला आपल्या पत्नी च्या शकुंतला बाईंच्या हाती दिले.... आणि बाकी सगळ्यांसोबत पहिल्यांदा त्यांनी वरची खोली गाठली...!

ह्याच दरम्यान अजिंक्य ने हॉस्पिटल मधून एम्बुलेंस मागवून घेतली होती.

सावनी च्या आई तिचे कपड़े बदलून तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी तयारीत होत्याच.......पण हे सर्व नक्की काय चालू आहे हे एक डॉक्टर असूनही अजूनही अजिंक्य च्या लक्षात येत नव्हते.


त्याच दरम्यान खाली येऊन डॉ. सतीश यांनी एक कॉल केला..... सावनी च्या आत्याला...... डॉक्टर गीतांजली ह्यांना.......

" डॉक्टर गीतांजली...., सावनी पुन्हा त्याच कंडिशन मध्ये गेली तुम्ही मिळेल ती flight पकडून लवकर मुंबईला या....... "


असं म्हणून जे काही घडलं ह्याची थोडक्यात कल्पना त्यांनी डॉक्टर गीतांजली ह्यांना दिली...... आणि शक्य तितक्या लवकरात लवकर पोहोचण्याची विनंती केली.... पलीकडून देखील होकार आला आणि चार पाच तासात पोहचणार असे सांगितले गेले....

खरेतर या फोन मुळे अजिंक्य अजूनच अचंबित झाले होते..! कोण आहेत या डॉ गीतांजली ? आणि वाराणसी वरून इतक्या लांबून त्या इथे येण्या मागचे कारण काय असावे.....?

तो त्याच्या वडिलांना काही विचारणार तेवढ्यात ऍम्ब्युलन्स चा हॉर्न ऐकू आला....... ऍम्ब्युलन्स दारात येऊन थांबली तसे लगेचच स्ट्रेचर वरून सावनी ला खाली आणले गेले...!

आणि पुढच्या अर्ध्या तासात तिच्या वर हॉस्पिटल मध्ये पोहोचून उपचार सुरू केले गेले...! पण ती मात्र बेशुद्धावस्थेत होती अजूनही...!

फारच विचित्र अनुभव होता हा अजिंक्य करता..! पण सर्व परिस्थिती कंट्रोल मध्ये येई पर्यंत तरी शांतपणे सारे पाहत राहणे एवढेच त्याच्या हातात होते... तो फक्त बघत होता... हे काय चालू आहे... पण स्वतः डॉक्टर असल्यामुळे बेसिक रूल त्याला ठाऊक होता... सावनी स्टेबल झाल्यावर विचारू.... असं त्याने ठरविले आणि तो सगळं पाहत बसला....

इकडे डॉक्टर स्नेहा आणि डॉक्टर सतीश दोघेही सावनी साठी आवश्यक ट्रीटमेंट देण्यात गुंतले होते.... ब्लीडींग होऊन ती बेशुद्ध होती... आणि आधी सिझर झाल्यामुळे आता सुद्धा सीझर च करावे लागणार होते......हे सगळं होत असताना डॉक्टर अजिंक्य मात्र तिच्या शेजारी बसुन सारे काही शांतपणे पाहत होता...!

डॉ. स्नेहा नी सावनी थोडी स्टेबल झाली तसे कॅन्टीन मधून तीन कॉफी ऑर्डर केल्या...... अजिंक्य ला बाहेर नेऊन त्यातली एक कॉफी त्यांनी अजिंक्य ला आणि एक डॉक्टर सतीश ह्यांना दिली..... आणि त्या त्याच्या समोर येऊन बसल्या.


आता मात्र अजिबात न राहवून अजिंक्य ने आपल्या बाबांना आणि डॉक्टर स्नेहा ना विचारले..!

"प्लीज तुम्ही दोघे मला काही सांगाल का की सावनी सोबत हे सगळे काय होते आहे? मुळात काही न होता सातव्या महिण्यात तिला ब्लीडींग का व्हावी.....?
आणि तुम्ही तिच्यावर ही कोणती ट्रीटमेंट करत आहात?
काल रात्री पर्यंत छान हसणारी, बोलणारी, खेळती असणारी माझी सावनी......तिचे आज हे असे काय होऊन बसले आहे... ती बेशुद्ध झालीच कशी.....??
बाबा, मला तर असे वाटायला लागले आहे की हे लग्न करून माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे.

कारण मी ज्या सावनी ला ओळखतो ना ती आमच्यात घडलेल्या छोट्यात छोट्या गोष्टी देखील आनंदाने मिरवत होती... पण ही... ही म्हणते की हिला ते काही आठवतच नाही.

त्यात सतत विहंग सोबत राग राग करणे, तिचं सावत्रपन दाखवून जात..... आणि हे काय हे असे सतत झटके येणे, काय... काय आहे हे सगळे? कसला आजार आहे तिला...... अनु ने जसं लपवलं तस ही पण लपवत होती का???

आणि बाबा... तुम्ही.....?? तुम्ही तर असे रिएक्ट करताय की तुम्ही तिला खूप आधीपासून ओळखता किंवा तिच्या या आजाराची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे...!

हे देवा काय चालू आहे हे माझ्या आयुष्यात...? सगळेच मला फसवत आहेत का???"


मागच्या वेळेस आली तशी सावनी ह्या वेळेस पण बाहेर येईल का?
अजिंक्य च्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का त्याला???
क्रमश

🎭 Series Post

View all