माझा होशील ना भाग -60

माझा
मागील भागात आपण पाहिलं कि सावनी लागलेल्या मारामुळे कॉम मध्ये जाते ..तेव्हा तिची ट्रीटमेंट करण्यासाठी मुंबईतून डॉक्टर सतीश देशपांडे ह्यांना बोलावले जाते ....ते तिचे रिपोर्ट्स पाहतात आणि त्यांना काळजीयुक्त गोष्टी दिसतात , आता पाहूया पुढे ....


त्यांनी सर्व रिपोर्ट तपासून पाहिल्यात तिचे आई वडील आणि आत्या जिच्या हॉस्पिटल मध्ये सावनी अ‍ॅडमिट होती, त्या सर्वाना समोर बसवले..आणि ते जे काही सांगतील ते शांतपणे बसून विचार करून ऐकुन घेण्याची विनंती केली.

"आता मी जे काही सांगेन ते तुम्ही शांत पणे ऐका.......मी तिचे सगळे रिपोर्ट्स पाहिले...त्यामध्ये मला जी शंका होती ती खरी ठरली आहे.... सावनी साधारण दीड महिन्या पुर्वी पुण्यातून इथे आली..ना?"

डॉक्टर सतीश ह्यांनी विचारलं

"हो डॉक्टर... म्हणजे आधी दिल्ली ला कॉन्फरन्स आणि नंतर इकडे.... झाले असतील दीड महिण्यापेक्षा जास्त दिवस..... पण का डॉक्टर ?"

सावनी चे वडील डॉक्टर निनाद म्हणाले.....

" सांगतो.... आणि हा प्रसंग एक महिन्या पूर्वी घडला ना? "
डॉक्टर सतीश ह्यांनी विचारलं....

"हो.....म्हणजे होईल आता एक महिना.... "

त्यावर तिची गीतांजली आत्या म्हणाली...


" ok.... मग त्या नंतर ती स्वतःच्या बद्दल काही बोलली होती का? तिचे लग्न झाले नाहिये हे तुम्ही सांगितलेत, पण तिचे कोणा सोबत प्रेम संबंध होते का?  तिच्या आयुष्यात कुणी आहे का??
कारण तसे असेल तर कोणत्याही परिस्थितीत त्या मुलाचा शोध घ्यायला हवा..! कारण ती सज्ञान आहे आणि दुसरे म्हणजे ती आता कोमात आहे. अशा वेळी फक्त तो मुलगाच काही निर्णय घेऊ शकतो..!
आणि आपण तिच्यावर तातडीने पुढचे उपचार देखील सुरू करू शकतो... "

डॉक्टर सतीश म्हणाले.....

"म्हणजे डॉक्टर.... काय बोलता तुम्ही? आम्हाला काहीही समजत नाही आहे....."

त्यांना तिघांना काहीही समजलं नाही म्हणून सावनी च्या वडिलांनी विचारलं.....

"म्हणजे तिचे रिपोर्ट सांगतायत की ती प्रेग्नंट आहे.
आणि पोटात मुल वाढत असताना कोणतीही उपचार पद्धती ही तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण करू शकते....."


डॉक्टर सतीश म्हणाले पण ऐकून त्यांना सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला...

"नाही डॉक्टर... म्हणजे आम्ही शंका नाही घेत पण तुम्ही रिपोर्ट नक्की नीट चेक केले का? कारण तिचे कुणाशीही प्रेम प्रकरण नव्हते.... उलट ती लग्नाला सुद्धा रेडी नव्हती.... असं काही असत तरी तिने नक्की सांगितलं असत....."


तिचे वडील म्हणाले.....

"तुम्ही नक्की आठवून बघा..कारण रिपोर्ट बद्दल म्हणाल तर मला खात्री आहे...... आणि त्या मुलाबद्दल माहिती मिळणे गरजेचे आहे..... कारण दुर्दैवाने उद्या असे काही झाले तर तो मुलगा किंवा प्रत्यक्ष सावनी कडून कोणाच्या परवानगीने हे केले तर असे खूप सारे प्रश्न निर्माण होतील आणि आपण सगळेच जण एक वेगळ्याच अडचणीत येऊ शकतो.

तेव्हा विचार करा आणि शांतपणे निर्णय घ्या.. अन्यथा ती यातून बाहेर पडल्यावरच पुढचे ठरवता येईल..!

त्यात तिचे रिपोर्ट ही देखील सांगत आहेत की तिच्यावर जी सर्जरी केली जाईल त्यात तीचा मधला दोन वर्षाचा काळ  तिच्या स्मरणातून निघून जाऊ शकतो... कायमचा......."

डॉक्टर सतीश त्यांना म्हणाले....

"डॉक्टर... कल्पना न देता आपण प्रेगॅन्सी टर्मिनेट करू शकतो का? कारण त्या मुलाबाबत आम्हाला काहीच कल्पना नाही आहे... न प्रेगॅन्सी बद्दल सावनीला काहीच माहित नसेल मग तिचा जीव वाचवण्यासाठी?"

तिची आत्या म्हणाली...

"नाही आपण असं नाही करू शकत त्यात अजून एक धोका म्हणजे तिच्या माकड हाडाला लागलेला जबरदस्त मार, याचा परिणाम थेट गर्भाशयाला आता प्रेग्नंसी टर्मिनेट करायची ठरवले तरी बसू शकतो..!

किंवा ती वाढू द्यायची ठरवली तरी!

दोन्ही प्रकारात  कदाचित ती पुन्हा कधीच आई नाही होऊ शकणार.
खूप complicates आहे हे सगळं....

या बद्दल डॉ. गीतांजली च जास्त चांगले सांगू शकतील...!
सो तुम्ही ठरवा की काय करायचे ते... आणि मला सांगा....."

डॉक्टर सतीश ह्यांनी माहिती पुरवली....

"हो डॉक्टर...."

सावनी चे बाबा निनाद पंडित एकदम हताशपणे म्हणाले...

"हो आणि अजून एक महत्वाचे जर हे ऑपरेशन करायचे ठरले तर  पुण्यात किंवा मुंबईत माझ्या हॉस्पिटल मध्ये करावे लागेल हे तुम्हाला वेगळे सांगायला नकोच, पण त्या आधी प्रेग्नन्सी बद्दल ठरवा..! काय करायचं ते..... त्या मुलाची परवानगी घ्या......त्या नंतर एक महिन्याने आपण ब्रेन सर्जरी प्लॅन करू..... चालेल? तोपर्यंत तुम्ही बोलून ठरवून मला सांगा...."

त्यावर तिघांनी फक्त माना डोलावल्या.....

एवढं बोलून ते तिथून पुन्हा मुंबई त यायला निघाले......

---------------------------------------------------------


इकडे मधल्या सहा - सात महिन्यात अनुराधा च्या नेहमी प्रमाणे बारीक सारीक कुरबुरी चालूच होत्या..!तिची ट्रीटमेंट डॉक्टर सतीश ह्यांचे मित्र डॉक्टर विलोभ करत होते.....

ह्या आधी तिचे रिपोर्ट चांगले होते.....पण तिच्या सातव्या महिन्यात करण्यात आलेल्या सोनोग्राफी नंतर डॉक्टर विलोभ टेन्शन मध्ये आले.... त्यांनी लगेच डॉ. सतीश ह्यांना तातडीने बोलवून घेतले....

ते तिथे गेल्यावर त्यांनी डॉक्टर सतीश ह्यांना सांगितलं कि, ......

"सतीश..... अनुराधा चे यावेळचे रिपोर्ट खूप चांगले नाहीत.......त्यात ती मानसिक आणि शारीरिक त्रास लपवत असावी, आणि तिच्या मनाला वाटेल ती गोळ्या औषध घेतली जात असावीत असे वाटत आहे मला.......प्रथम दर्शनी..... तेव्हा तुम्ही ह्यात लक्ष घाला... कारण धोका दोन्ही जीवाला आहे..... "


डॉक्टर विलोभ ह्यांना थँक्स म्हणत आम्ही लक्ष देऊ असं म्हणत त्यांनी त्यांचा निरोप घेतला.....

ते विचारात पडले...,कि असं काय बर घडलं असावं.... शकुंतला बाईंना विचारावं तर याच दरम्यान डॉ. अजिंक्य च्या आजी म्हणजे शकुंतला बाईंची आई खूप आजारी असल्याने त्याची आई त्या दरम्यान अनुराधा सोबत नव्हती..! नाही म्हणले तरी थोडे दुर्लक्ष झालेच होते घरच्यांचे तिच्याकडे.! झाले ते झाले पण इथून पुढे मात्र तसे होऊन चालणार नव्हते, कारण आता हाता तोंडाशी आलेले फळ आणि कदाचित देव न करो पण काही  मोठा आजार याला अनुराधा ला सामोरे जावे लागु शकेल यासाठी आधीच काळजी घ्यावी असे स्पष्ट केले होते डॉक्टरांनी....

आणि याच संदर्भात बोलायचे म्हणून डॉ. सतीश त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या भयंकर व्यस्त असणाऱ्या डॉ. मुलाच्या म्हणजे अजिंक्य च्या हॉस्पिटल मध्ये त्याला भेटायला म्हणून गेले.....

बाहेर रिसेप्शन मध्ये त्यांना पाहून नर्स आत फोन करून सांगणार तेवढ्यात त्यांनी हात करून.....

"सिस्टर प्लीज no कॉल..! I Want to give him surprise"

असे थोडेसे हसुन सांगत तिला थांबविले

तसे तिने ही हसत ok म्हंटल.....

तसे ते डायरेक्ट अजिंक्य च्या केबिन कडे गेले.....

त्यांनी नेहमीप्रमाणे दारावर टकटक करून दार उघडले.

त्यावेळी नेमकी डॉ. अजिंक्य हातात कोणते तरी फोटो घेऊन पाहत बसले होते.

वडिलांना दारात पाहताच त्यांनी ते तसेच टेबलवर टाकत उभे राहून त्यांना आत बोलावले.

" बाबा.... तुम्ही इथे.अचानक ... या ना..... "

तसे ते आत मध्ये गेले आणि म्हणाले....

"म्हंटल आपल्या बिझी मुलाला काही वेळ नाही तर आपणच जाऊन भेटावे.... म्हणून आलो.... "


"या... बसा... काय करणार आपला डॉक्टरी पेशा....... तुम्हाला पण माहित आहेच.....असो...... मी कॉफी ऑर्डर करतो...... "

अजिंक्य हसत म्हणाला....

अजिंक्य आणि अनुराधा मध्ये सगळं ठीक असेल ना....?
काय सांगतील डॉक्टर सतीश अजिंक्य ला?
सावनी च्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल?
ती ह्यातून बाहेर पडेल ना?
क्रमश

🎭 Series Post

View all