माझा होशील ना भाग -61

माझा होशील ना
मागील भागात आपण पाहिलं कि,सावनी प्रेग्नेंट असल्याच तिच्या आई वडिलांना आणि आत्याला समजत..... पण त्या बाळाचा बाप कोणता हे काही समजलं नाही....... इकडे अनुराधा ची तब्येत बिघडत चाललेली डॉक्टर सतीश ह्यांना समजत.... तस ते अजिंक्य ला सावध करण्यासाठी त्याला भेटायला जातात.....


त्यांनी नेहमीप्रमाणे दारावर टकटक करून दार उघडले.

त्यावेळी नेमकी डॉ. अजिंक्य हातात कोणते तरी फोटो घेऊन पाहत बसले होते.

वडिलांना दारात पाहताच त्यांनी ते तसेच टेबलवर टाकत उभे राहून त्यांना आत बोलावले.

" बाबा.... तुम्ही इथे.अचानक ... या ना..... "

तसे ते आत मध्ये गेले आणि म्हणाले....

"म्हंटल आपल्या बिझी मुलाला काही वेळ नाही तर आपणच जाऊन भेटावे.... म्हणून आलो.... "

"या... बसा... काय करणार आपला डॉक्टरी पेशा....... तुम्हाला पण माहित आहेच.....असो...... मी कॉफी ऑर्डर करतो...... "

अजिंक्य हसत म्हणाला....


"आणि काय रे..! काय पाहण्यात एवढा गढून गेला होतास? मी आलो तेव्हा..... "

सतीश रावांनी विचारलं....


"अहो बाबा तुम्हाला आठवत ना....मी सहा सात महिन्यापुर्वी  दिल्लीत गेलो होतो ना, तेव्हा तिथे त्या कॉन्फरन्स साठी..... सांगितलं होत तुम्हाला....... तेव्हा माझ्या कॉलेज मधील काही मित्र पण आले होते...... तसे आम्ही पुण्यात च भेटलो आधी...!

आणि तुम्हाला सांगतो......, तो पूर्ण आठवडा धम्माल केली होती आम्ही....... तेव्हा माझ्या मित्राने त्याचे काही कॅमेरा मध्ये फोटो काढले होते, आज उद्या देतो म्हणताना तब्बल सात महिन्यांनी पाठवलेत.....
तेच पाहत होतो... खरे सांगतो बाबा..!
त्या मित्रांच्या सोबत पुन्हा एकदा कॉलेज लाईफ जगलो.. फ्रेश झालो..आणि त्याचा च परिणाम.. तुम्ही पाहताच आहात!...."

त्यावर थोडे हसत अजिंक्य उत्तरले..!

"हम्म ! ते बरोबर आहे सगळे.. पण काही गोष्टी चिंता करायला लावणाऱ्या आहेत..... तू फ्रेश झालास, त्याचे परिणाम.. तुमच्यातील दुरावा कमी झाला.. आणि त्यामुळे आता हे येऊ घातलेले बाळ..!

पण आता ची अनु राधा ची सोनोग्राफी काहीतरी वेगळे संकेत देत आहे. तिच्या शरीरात काही चुकीच घडत आहे.. जे येणाऱ्या बाळाला जन्म घेताना धोका निर्माण करू शकते, किंवा डिलेव्हरी नंतर तिच्या आयुष्याला... हे रिपोर्ट.. प्लीज एकदा पाहून घे..!

आणि यापुढे तिच्याशी कसे वागायचे..... आणि किती लक्ष द्यायचे ते तूच ठरव..!"

असं म्हणून त्यांनी हातातील रिपोर्ट असणारे पाकीट त्याच्या समोर टाकले...!

इकडे अजिंक्य रिपोर्ट उघडून वाचेपर्यंत, त्याच्या समोरील त्याचे दिल्लीतील काढलेले फोटो उचलून ते पाहू लागले..!

चार मित्र.. एकत्र येऊन मस्त धम्माल करत होते, कुठे गार्डन मधला तर कुठे आइसक्रीम हातात घेतलेला..! अजून काय नी काय.. पहिले दहा बारा फोटो पाहून त्यांच्याही चेहऱ्या वर समाधानाचे हसू फुटले होते.

पण अचानक. एका फोटो वर मात्र त्यांची नजर खिळून राहिली...! त्या नंतरच्या बहुतेक सगळ्या फोटो मध्ये ती व्यक्ति त्या चारही मुलांच्या सोबत होती..!

तेव्हा त्यांनी न राहवून अजिंक्य ना विचारलेच...!

"हे चौघे तुम्ही सांगितलेत पण ही पाचवी मुलगी कोण आहे चिरंजीव?"

तेव्हा थोडेसे अडखळत थोडे लाजत अजिंक्य ने उत्तर दिले..!

"बाबा या डॉ. सावनी.......! पुण्यात राहतात, अनु च्या सिनियर डॉक्टर आणि माझी बॅचमेट, बेस्ट फ्रेंड...!
बाबा तुमच्या पासून आजपर्यंत काय लपले आहे...! अनुराधा जर माझ्या आयुष्यात आली नसती तर कदाचित आज हीच तुमची सून असती..!"

"म्हणजे अनुराधा नंतर ह्या तुमची दूसरी पसंती..तर....!"

ते फोटो पाहत म्हणाले....

." आ.. हा! पहिली.......ती मला कॉलेज मध्ये असल्या पासून आवडत होती पण अनुराधा कडून मी तिला खूप आवडतो हे कळल्या पासून मी सावनी सोडून अनु मध्ये गुंतत गेलो..!
त्यामुळे कदाचित मी तिच्या क्वालिटी, किंवा तिच्याकडे त्या नजरेने कधी पाहिलेच नाही.
पण बाबा या दिल्ली ट्रीप पासून मात्र मला सतत असे वाटते आहे की माझी निवड जरा घाईघाईने झाली..!"

अजिंक्य म्हणाले...

"का बरे....? असं काय घडलं आम्हालाही कळू दे...... "

डॉक्टर सतीश त्यावर म्हणाले.....

"कारण बाबा....., तिच्या हातचे  चविष्ट जेवण, वस्तू आणि वास्तु जपण्याची हातोटी, माणसे जोडायची कला...सगळं काही निराळे आणि आवडणारे......

पुण्यात होतो त्या दिवसात , तिन्ही संध्याकाळ तिच्या घरी तिच्या हातचे लाजवाब खाणे आणि कौटुंबिक वातावरणात राहणे यात कसे गेले ते समजलेही नाही..!

तेच आपल्या घरात.. आई समोर नसेल तर एक गोष्ट जागेवर मिळत नाही, सतत बाहेरून येणारे जेवण, अनावश्यक खर्च, गरजेचे नसताना होणारे शॉपिंग आणि इतके करूनही छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वितंडवाद..! एक तास देखील घरात बसून निवांत राहावे असे वाटत नाही.!"

तो इतके सगळे भरभरून बोलत होता, पण एव्हाना डॉ. सतीश मात्र त्या मुलीच्या विचारात पूर्ण गढून गेले होते.

" ह्म्म्म.... ठीक आहे.... बिता कल क्या याद करने का..... तु रिपोर्ट्स पाहिलेस...?.. "


सतीश रावांनी त्याला विचारले....

"पाहतो....."

आणि तो रिपोर्ट पाहू लागला.... पाहताना अजिंक्य सुद्धा काळजीत पडला...रिपोर्ट पूर्ण पाहिल्यावर डॉ. अजिंक्य त्याच्या बाबांना म्हणाला.....

"बाबा.... मी इथून पुढे अनु कडे पूर्ण लक्ष देण्याचा प्रयत्न करेन...... प्रॉमिस..... "

त्याच्याकडून वचन घेऊन ते तिथून निघून गेले.....

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

डॉ सतीश ह्यांनी ती रात्र कशीबशी काढली..... आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटल मध्ये पोहोचताच डॉ. गीतांजली च्या हॉस्पिटल मध्ये कॉल लावला..!

सुदैवाने डॉ. गीतांजली यांनीच कॉल घेतला होता.
कॉल उचल्या बरोबर ते म्हणाले..,.,

"नमस्कार मॅडम.....,  मी मुंबई तून डॉ. सतीश बोलतो आहे. मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी मी आपल्याकडे सावनी केस संदर्भात आलो होतो.. आठवले का तुम्हाला?"


डॉक्टर सतीश फोन वरुन म्हणाले.....

"हो हो,! कसे विसरू शकते डॉक्टर तुम्हाला?
बोला ना प्लीज......"

डॉक्टर गीतांजली म्हणाल्या....

"मॅडम, ते मला सावनी संदर्भात जाणून घ्यायचे होते. म्हणून कॉल केला होता. काय प्रोग्रेस आहे?
अजूनही तुमच्याच हॉस्पिटल मध्ये आहे ना की?"

डॉक्टर सतीश म्हणाले,

"हो हो डॉक्टर..! ती अजूनही इथेच जन्म मृत्यूच्या दारात उभी आहे..अजूनही in coma..!
पण डॉक्टर आम्ही मात्र त्या मुलाचा शोध लावू शकलो नाही. त्यामुळे मेडिकल टर्म नुसार प्रेग्नंसी कंटीन्यु करावी लागली आहे."

.......

त्यानुसार आता तिला आठवा महिना संपत आला आहे.! पण डॉक्टर त्यातही एक मेजर प्रॉब्लेम उभा राहिला..! कदाचित त्या मुलाचा रक्तगट विरुद्ध असावा..! त्यामुळे तिला मधूनच झटक्याना सामोरे जावे लागत आहे..! त्यामूळे खूपच लक्ष द्यावे लागते आहे..!"

डॉक्टर गीतांजली म्हणाल्या......,

"ओह्ह.....!!!"

डॉक्टर सतीश sad फील करत म्हणाले.....

" तस मी माझ्या काही परदेशी डॉक्टर मैत्रिणीच्या सोबत बोलून मी दोन इंजेक्शन बाहेरून मागवून घेतली होती, त्यामुळे आता थोडा कमी त्रास होतोय इतकेच..! पण तिला असे पाहताना खूप वाईट वाटत.... "

डॉक्टर गीतांजली म्हणाल्या......,

"हम्म.. मी समजू शकतो, मॅडम मला अजून थोडी माहिती द्याल का??? ती मूळची पुण्यात राहणारी ना?

आणि तिचे आई वडील देखील डॉक्टर..!

म्हणजे मागे आम्ही बोललो होतो त्यावरून समजले..! पण ती तिकडे का आली होती? म्हणजे सहजच की? आणि तिचे शिक्षण? म्हणजे ती काय करत होती या घटने पूर्वी?"


डॉक्टर सतीश ह्यांनी विचारले......,



डॉक्टर गीतांजली सगळं सांगतील का?
डॉक्टर सतीश का विचारतात हे सगळं त्यांना?
क्रमश :-

🎭 Series Post

View all