*माझा होशील ना? भाग -70*

माझा होशील ना
मागील भागात आपण कि, अजिंक्य आणि सावनी कॉफी पिता पिता एकमेकांशी संवाद साधतात.... तेव्हा अजिंक्य तिला त्यांचे दिल्ली चे काही काढलेले फोटोग्राप्स दाखवतो ; आणि आपल्या मनातले बोलायला सुरुवात करतो....ज्याकडे सावनीच अजिबात लक्ष नसत.......आता पाहूया पुढे......,


अजिंक्य एकटाच  बोलत  असतो....,

अनुराधा कडून आमचे लग्न ठरल्याचे तुला समजले तेव्हा तुझ्या चेहऱ्या वरील बदललेले भाव अनुराधा कडून समजले होते मला..! पण मला तुझ्याबद्दल तेव्हा काही वाटत नव्हतं ना.....

पण तु का कधी बोलली नाहीस???"

अजिंक्य बोलत होता पण सावनी चे त्याच्या कडे लक्ष च नव्हतं.....आणि तो पुढे बोलतच राहिला.....

"अनु मला म्हणाली देखील होती की सावनी तुझ्यावर प्रेम करत होती आणि आपल्या दोघांच्या संसारात राहून तिला आपले घर डिस्टर्ब करायचे नव्हते म्हणून ती पुण्याला तिच्या घरी निघून गेली आहे.

नंतर आमचे लग्न झाले, संसार, आधी क्लिनिक मग हॉस्पिटल हे सगळं जोडीने सुरू झाले. पण तिचे विचार, वागणे आणि चॉईस कधीच जुळले नाहीत माझ्या सोबत हे आधी नव्हतं समजलं मला.....
त्यामुळे वाद टाळण्यासाठी मी तिच्या पासून लांब लांब राहत होतो.... मला वाद घालणे आधीपासून जमतच नाही.....हे तुला देखील ठाऊक आहेच......

जेव्हा जेव्हा मी चिडचिड करत असे तेव्हा तेव्हा सहवासाने प्रेम निर्माण होते असे आई समजावत असे म्हणून शांत होतो मी.......! म्हणजे असं नाही अनु प्रयत्न करत नव्हती.... ती पण खूप प्रयत्न करायची त्यासाठी..! पण तिचे प्रयत्न खूप खर्चिक असायचे..! आणि त्यावेळी बाबांच्या कडून पैसा घेऊन बायको साठी काही करणे मला पटत नव्हते...मला! तिला मी हे समजावत असे.... पण तिचं म्हणणे असं पडे कि तुझंच आहे ना सगळं.....मग आता वापरलस तर काय होईल? कोण काही बोलणार नाही....
पण मग जसे जसे उत्पन्न वाढत गेले तसे तसे मी तिच्या आवडी-निवडी सांभाळायचा प्रयत्न केला ही..! पण ती वेगळीच होती...तीला काही-तरी कमी जाणवायचीच.......असो..! ज्याचा त्याचा स्वभाव....!!!!

पण मी जेव्हा आमच्या लग्ना नंतर तीन वर्षांनी  कॉन्फरन्स च्या निमित्ताने तुझ्या कडे आलो होतो ना पुण्यात, त्यावेळी नकळत मी तुझ्यात आणि अनु राधा मध्ये तुलना करत गेलो...!

तेव्हा तुझ्या हातचे पदार्थ, तुझी टापटीप, घर सजवायची हौस यामुळे मी तुझ्या प्रेमात पडलो होतो.
त्यानंतर आपण दिल्लीत गेलो.. तिथले ते तीन दिवस.. ते तर आजही स्वप्नवत वाटतात मला...!
आपण चौघं एकत्र केलेली दिल्ली मधली मजा..! आणि ती भांग पार्टी.. अगदी सारे जसेच्या तसे आता ही समोर येत आहे माझ्या..!

पण दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्स संपल्या वर कोणाशी ही काही ही न बोलता कोरडा निरोप घेऊन तुझे रुक्षपणाने निघून जाणे मात्र आज ही मनाला खटकते आहे माझ्या..!
आधीचे पाच दिवस खळखळून हसत आयुष्य सकारात्मक पणे पाहत प्रतिसाद देणारी सावनी त्या दिवसापासून आज पर्यंत मिस करतोय मी...! किती क्रियेटिव्ह होतीस तु.... तो तुझा आत्मविश्वास.... ती तडफदार सावनी..... हे सगळं मला हवं आहे.... मिस करतो मी तुझ्यातल्या त्या सावनी ला.... "


तो खाली मान घालून हे सगळे भडाभडा बोलत होता आणि सावनी ...... ती मात्र ते फोटो एकेक करून आश्चर्याने पुन्हा पुन्हा पाहत होती...! तिला काहीच आठवत नव्हतं.....

"अजिंक्य.......!"

ती म्हणाली तस त्याने मान वर करून पाहिले.........तेव्हा फूल एसी मध्ये तिच्या चेहऱ्या वर फुटलेला घाम आणि तिची विचित्र अवस्था त्याला काहीतरी विचित्र चाहूल देऊन गेली होती.

त्याने झटकन उठत तिचा हात हातात घेऊन तिला सावरून बसवण्याचा प्रयत्न केला...! ती खूप च कसनुसे होत असावे अशी बोलली...

" अजिंक्य.... "

"हा सावू ... बोल ना.. काय होतंय तुला? काही त्रास होतोय का? असा घाम का फुटलाय तुला.....??"

तिची अशी अवस्था पाहून अजिंक्य घाबरला....

"अजिंक्य.....हे सगळं माझ्या आयुष्यात कधी घडल्याचे मला का आठवत नाहीये."

ती तिच्या मेंदू वर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करते....तिच्या दोन्ही हातांनी तिने डोकं गच्च धरलं होत....

"अजिंक्य मला कसे तरीच होते आहे.. आज्जू..... मी कोण आहे? कुठे आहे? मला काहीच का आठवत नाहीये?? हे फोटो? मी आहे ना? मग मला का नाही.... आठ.... व..... त......."

एवढं म्हणाली ती आणि पुढच्या क्षणात ती पुन्हा एकदा झटका येऊन पडली होती..!

पण यावेळचा हा झटका काही वेगळाच वाटला होता अजिंक्य ला ...!

तसे अजिंक्य ने प्रसंगावधान दाखवत खोलीतून बाहेर पडत खाली तिच्या आई वडीलांना आवाज दिला...!

नुकतेच आलेले डॉ.सतीश अजून दारातच लॅच ची चावी खिशातच ठेवत होते..! अजिंक्य चा तो घाबरा आवाज ऐकुन ते दार बंद करून आत धावले..! आणि त्याला विचारले......

"काय झाले अजिंक्य.....? "

"बाबा.. सावनी....
तिचे इंजेक्शन खालीच आहेत ना? तिला पुन्हा एकदा झटका आला आहे.. पण यावेळचे प्रमाण....!"


अजिंक्य झटकन म्हणाला....


" तु घाबरू नकोस....., मी आलोच... वर....... येताना इंजेक्शन आणतो..तिच्या कडे बघ .. "


असे म्हणत डॉ. सतीश विहंग च्या खोलीत जाऊन अत्यावश्यक गोष्टी घेऊन वर पोहोचले...!

त्यांनी तिला तपासून उपचार सुरू केले... इंजेक्शन देऊन तोपर्यंत हे आलेले संकट टाळले.....पण नेमके त्याच वेळी ते फोटो तिच्या बाजूला पडलेले असल्याने त्यांचे लक्ष त्या कडे वेधले गेले...त्यांना कल्पना आलीच काय घडले असावे त्याची.....!

ते काही विचारणार इतक्यात तिचे आई वडील वर आल्यामुळे त्यांनी त्या फोटो सकट तिच्या अंगावर पांघरुन ओढून घातले...!

आल्या आल्या सावनीच्या वडिलांनी विचारलं.....,

" अजिंक्य काय झालं तुम्ही असे ओरडलात का? आणि सावनी अशी का झोपले..... "

" काळजी करू नका..... तिला परत तशीच चक्कर आली..... आता मी इंजेक्शन दिल आहे....उद्या सकाळ पर्यंत वाट पाहून आणि काय तो निर्णय घेऊ......आता ती शांत झोपली आहे..... तर आपणही आपापल्या खोलीत जाऊन आराम करूया....अजिंक्य आहेच इथे... काही वाटल तर तो आवाज देईल..... "

सतीश राव च सगळ्यांना म्हणाले..... सावनी ची आई काळजी पोटी जायला रेडी नव्हती.... तेव्हा देखील ते म्हणाले.....,


" रेवती ताई.... काळजी करू नका.... विश्वास आहे ना माझ्यावर.... आता तिला पण आराम करू द्या... आणि तुम्ही ही करा.... "


असं म्हणून ते सगळ्यांना खाली घेऊन गेले..... आपल्या रूम मध्ये जाऊन ते वॉश घेऊन बाहेर आले..! पण मनातील ते फोटो आणि त्या मागील खळबळ काही केल्या शांत होत नव्हती..! ज्याची भीती वाटत होती तेच घडले होते.. कदाचित आता सर्व काही सांगायची गरज निर्माण झाली होती अजिंक्य ला. हे त्यांना समजून आलं होत......!

पर्यायाने त्याची वाढलेली जबाबदारी देखील समजावून सांगायची गरज निर्माण झाली होती. आज सातवा महिना चालू असताना सावनी अजिंक्य ने काहीतरी बोलले असणार किंवा काही हट्ट धरला असणार म्हणून जिने चढून वर गेली असणार.......
ही पहिली रिस्क आणि ते फोटो.. ही आता दूसरी... काय करावे... कसे करावे?? ......हा अजिंक्य कधी दुसऱ्याची अवस्था समजून घेईल.....एवढी मोठी रिस्क सावनी घेणार नाही नक्कीच अजिंक्य ने तिला वर जायला भाग पाडले असणार..... आता ह्या सगळ्या बद्दल त्याच्याशी बोलायलाच लागेल......

असा आयुष्यात कधी पेच निर्माण होईल असे वाटलेच नव्हते.. त्यामुळे मनाची.. या प्रसंगासाठी कोणतीच तयारी केली नव्हती.

आता येणारा काळच ठरवेल पुढे काय ते... हेच खरे!


डॉक्टर सतीश अजिंक्य ला काही सांगू शकतील का?
अजिंक्य समजून घेईल का ती परिस्थिती?
सावनी ठीक होईल ना?
कि भूतकाळ पुन्हा डोकावेल?
क्रमश

🎭 Series Post

View all