" आई आज परत माझे पोट भरावे म्हणून स्वतःच्या वाटणीचे अर्ध जेवणही मला दिलेस ना... " रेवा उदास चेहऱ्याने आपल्या आईकडे पाहून बोलते....
" असे काही नाही... मला जास्त भूक नव्हतीच आणि तसे पण माझ्या चिमणीचे पोट भरले की , माझ्या मनालाही समाधानच मिळणार आहे ना.... " रेवाची आई प्रतिभा तिच्याकडे बघून बोलते...
" हे घे आज एवढीच मजुरी भेटली आहे.... " प्रतिभाचा नवरा घराच्या आत येत तिच्या हातात काही नोटा ठरवत बोलतो....
" आपण जे पण मिळवतो , जे पण खातो ते कष्टाच्या कमाई ने खातो फुकटचे तर घेत नाही ना , मग त्यातच आनंद मानावा.... ही तुमच्या मेहनतची कमाई आहे... " प्रतिभा त्या नोटा देवाच्या पुढे ठेवून देवाला नमस्कार करत बोलते....
एका साध्या अशा झोपडपट्टीमध्ये राहणारी प्रतिभा स्वतः चार घराचे धुणे भांडी करत होती आणि तिचा नवरा पण मजुरी करून कमवत होता... त्यांना आपल्या एकुलत्या एका मुलीला शिकून खूप मोठे करायचे होते... त्यासाठीच ते दिवस-रात्र कष्ट करत होते.... त्यांनी आपल्या मुलीचे नाव एका चांगल्या शाळेमध्ये घातले होते... त्या शाळेची फी भरण्यासाठी एवढे सगळे कष्ट चालू होते... दोघेही नवरा बायको आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजा पुरवताना कधी कधी स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष ही करत होते.... एवढं सगळं असूनही प्रतिभा स्वाभिमानी होती... तीला दुसऱ्याकडून मदत घेणे योग्य वाटत नव्हते.... ती ज्या घरांमध्ये काम करत होती त्या घरातल्या बायका तिला जास्तीचे पैसे देण्याचे प्रयत्नही करत होत्या परंतु तिने कधीही त्याचा स्वीकार केला नाही.... आपल्या कष्टाचीच कमाई ती घेऊन आनंदाने जगत होती....
प्रतिभा च्या संसार आनंदाने सुखाने चालू होता... अचानकच या आनंदा मध्ये मिठाचा खडा पडावा अशी गोष्ट झाली... एक दिवस रात्री अचानक रेवाच्या डोक्यात खूप जोरात दुखायला सुरुवात झाली.... तिला मागच्या काही महिन्यापासून हा त्रास होत होता परंतु थोडा वेळ डोकं दुखल्यावर नंतर तिला परत वाटत होते त्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना त्याबद्दल काही सांगितले नाही , कधीकधी ती मेडिकल मधून डोकेदुखीची गोळी घेऊनही खात होती.... आज मात्र ते डोकेदुखी थांबायचं नावच घेत नव्हती.... त्या वेदनाही असाह्य झाल्या होत्या.... शेवटी ना इलाजाने रेवाला आपल्या आई-वडिलांना सांगावे लागले...... प्रतिभा आणि तिच्या नवऱ्याने तुला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले.... डॉक्टर तिला चेक करत होते... डॉक्टरांनी तिचा एम आर आय आणि काही अजून तपासणी करायला सांगितल्या....
प्रतिभाने आपल्या मुलीचे शिक्षणासाठी जे पैसे साठवून ठेवले होते ते पैसे हळूहळू या तपासणीसाठी खर्च होऊ लागले.... डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून सांगितले की, रेवाच्या डोक्यामध्ये छोटासा ट्युमर आढळून आला आहे... ट्यूमर ची सुरुवात झाली असल्यामुळे जर वेळेवर उपचार केले तर आपण लवकरच तिला या आजारातून मुक्त करू शकतो.... पण उपचारासाठी लागणारा खर्च ऐकून मात्र प्रतिभा आणि तिचा नवरा मोठ्या धर्म संकटात अडकला..... त्यांना काय करावे ते सुचत नव्हते.....
रेवाची तब्येत ठीक नाही म्हणून प्रतिभा ने काही दिवसाची सुट्टी घेतली होती त्यामुळे ती ज्या चार घरात काम करायला जात होती त्, या घरच्यांनाही रेवाच्या तब्येतीची चौकशी करता त्यांना या सगळ्याची कल्पना आली.....
प्रतिभा आदितीच्या घरीही काम करत होती.... स्वाभिमानी आणि कामात चोख असल्यामुळे आदिती ला प्रतिभा खूपच आवडायची..... ही गोष्ट जशी आदिती च्या कानावर पडली तेव्हा तिने प्रतिभाला मदत करायचे ठरवले परंतु जर सरळ पैसे देऊन केले तर प्रतिभा घेणार नाही याचा तिला आधीपासूनच अंदाजा होता म्हणून तिनेच एक युक्ती लढवली......
प्रतिभा ज्या लोकांच्या घरी काम करायला जात होती, त्या सगळ्यांना अदितीने भेटून तिच्या डोक्यात चालू असलेला आपला आणि सांगितला तेव्हा त्यांनीही तिला होकार दिला.... एक दिवस रेवाला भेटण्यासाठी म्हणून आदिती प्रतिभा च्या घरी गेली.....
" प्रतिभा ऍक्च्युली माझे तुझ्याकडे थोडे वेगळेही काम होते... " आदिती प्रतिभा कडे बघून बोलली....
" बोला ना ताई... " प्रतिमाने तिच्याकडे बघून उत्तर दिले
" अदिती मला माझ्या ऑफिस मधून काही घरगुती जेवणा च्या डब्याची ऑर्डर कोणी घेत का ते बघायला सांगितले होते.... मी त्यांना तुझे नाव सुचवले आहे.... तुझ्या हाताला खूप छान चव आहे.... तू घरात जेवण बनवते ते आम्ही सगळे आनंदाने खातो त्यामुळे माझ्या ऑफिसमधल्या सगळ्यांना तुझ्या हातची चव खूप आवडेल म्हणूनच मुद्दामून मी तुझे नाव पुढे केले आहे .... तू मला दररोज डबे बनवून देऊ शकतेस का ? " आदिती प्रतिभा कडे बघून विचारते....
प्रतिभा एक नजर आपल्या मुलीकडे पाहते तिच्या मनात विचार येतो की , तिच्या आजारासाठी पैसे कसे मिळवायचे असा गेल्या काही दिवसापासून ती विचार करत होती परंतु आज लक्ष्मी स्वतः तिच्या दारात चालत आली होती .... प्रतिभा ही लगेच हे काम करण्यासाठी तयार झाली.....
" थँक्यू सो मच प्रतिभा मला माहित होते की तू या गोष्टीसाठी नकार देणार नाहीस.... मी उद्याच माझे ऑफिसमध्ये जाऊन सांगते.... ते काही पैसे ऍडव्हान्स मधून देणार आहेत, जसे ते मला देतील मी तुला ते पैसे देते.... " आदिती प्रतिभा कडे बघून खुश होऊन तिकडून बाहेर निघून जाते....
" देवच पावला म्हणायचं... मी विचारच करत होते की, रेवा च्या उपचारासाठी कुठून आणि कसे पैसे जमवावे, तर ताई साहेबांनी स्वतः समोरून ही चांगली ऑफर दिली आहे.... मला तर ताई साहेबांच्या रूपात देवच आपल्या मदतीला धावत आल्यासारखा वाटू लागले आहे.... " प्रतिभा आनंदाने देवासमोर हात जोडून आपल्या नवऱ्याकडे पाहून बोलू लागते....
" प्रतिभा तुझा स्वाभिमान आणि तुझी तुझ्या कामाच्या प्रती असलेली एकनिष्ठता पाहून मला विश्वास होता की, तू नक्कीच काहीतरी मार्ग शोधून काढशील..... आज तुझ्या या स्वभावामुळेच तो खूप माणसं जोडून ठेवली आहेत जी वेळेवर आपल्या उपयोगी आली....... मला अभिमान आहे की , तू माझी बायको आहे.... मी पण आज पासून डबल मजुरी करणार आणि आपल्या मुलीच्या उपचारा सोबतच त्याच्या शिक्षणासाठी जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणार..... " प्रतिभा चा नवरा ही तिच्याजवळ येऊन प्रेमाने तिच्या हातात हात देऊन बोलतो......
आदिती पण त्या सगळ्या बायकांना आपल्या घरी बोलवते.... त्या सगळ्या तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेल्या असतात....
" प्रतिभा या गोष्टीसाठी तयार झाली आहे.... " आदिती त्या सगळ्यांकडे बघून बोलते...
" बर झाल आदिती, तू हा विचार केलास नाहीतर प्रतिभा ने आपल्याकडून मदत स्वीकार केली नसती.... आपण अशा प्रकारे तिची नक्कीच मदत करू शकतो... मी माझ्या ऑफिसमध्ये ही जे बाहेर जेवण करत असतात त्यांना याबद्दल सांगितले तर , ते देखील माझ्याकडून डब्बे घ्यायला तयार झाले आहेत... असंच आपण सगळ्यांनी मिळून एक मोठी ऑर्डर बनवून रोज प्रतिभा ला देऊया म्हणजे तिला तिच्या मुलीच्या उपचारासाठी लागणारा पैसा कमावता येईल...... " त्या सगळेजणे आदितीच्या घरी बसून प्रतिभाला कशाप्रकारे मदत करता येईल याची उपाययोजना बनवू लागतात............
समाप्त
( थोडेसे एकातेबद्दल आज प्रतिभा सारख्या स्वाभिमानी आणि चांगल्या स्वभावाच्या स्त्रीला मदत करण्यासाठी तिच्या आसपासचे पुढे आले आणि त्यांनी माणुसकी दाखवली..... अशीच माणुसकी जर प्रत्येकाने आपल्याला जमेल त्या पद्धतीने दाखवायला सुरुवात केली तर आपल्या देशाचे भविष्य सुधारायला सगळ्यांचीच मदत होईल.... )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा