कृष्णभेट
सहज मनात एक विचार आला…
काय झालं असतं जर कृष्ण मला भेटायला आला असता?
देव म्हणून नाही, आरती-धूपाच्या चौकटीत अडकलेला नाही, तर माझा मित्र, माझा सखा बनून. त्या भेटीचं दृश्यच किती अगम्य असतं! निळसर सावळा रंग, डोळ्यांत अपार शांतता आणि ओठांवर हलकंसं हसू… हातात बासरी, गळ्यात वैजयंती माळा जणू सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच माहीत असलेला.
मी त्याला विचारलं असतं,
“काय रे कृष्णा, तुला जन्म घेऊन पाच हजार वर्षं झाली तरी तुझा महिमा का कमी होत नाही? अशी कोणती जादू केलीस तू जनमानसावर, की आजही तुझं नाव घेतलं तरी मन शांत होतं. संकटांशी सामना करायला बळ मिळतं. आधार वाटतो… विश्वास वाटतो.”
तो हसून म्हणाला असता,
“अगं मनिषा, मी मंदिरात नाही शोधायचा. मी तुमच्या हृदयातच असतो. पण तुम्ही मला बाहेर शोधत बसता, हीच चूक करता. मनापासून साद दिलीत, तर मी क्षणात तुमच्या मदतीला धावून येतो.”
त्याच्या शब्दांत गूढ नाही, तर प्रचंड साधेपणा असतो.
तो पुढे म्हणाला असता,
“हो, पण एक लक्षात ठेव. मी फक्त मदत करतो. प्रयत्न तुम्हालाच करायचे असतात. जसं महायुद्धात मी अर्जुनाचा सारथी होतो, पण धनुष्य उचलून युद्ध अर्जुनानेच केलं. मी मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली… चालायचं त्यालाच होतं.”
त्या क्षणी मला गीतेचा अर्थ नव्याने उमगला असता.
कृष्ण देव म्हणून पूजला जातो, पण मित्र म्हणून समजून घेतला, तर आयुष्य अधिक सोपं होतं. तो आपल्याकडून चमत्काराची अपेक्षा करत नाही, तो फक्त धैर्य, प्रामाणिक प्रयत्न आणि कर्माची तयारी मागतो.
“कर्म कर,” तो पुन्हा आठवण करून देतो,
“फळाची चिंता करू नकोस. फळ माझ्यावर सोड. तू तुझं काम मनापासून कर.”
त्या कल्पित भेटीनंतर मला इतकंच वाटलं
कृष्ण खरंच दूर नाही.
तो माझ्या प्रश्नांत आहे, माझ्या संघर्षांत आहे, आणि माझ्या न डगमगणाऱ्या प्रयत्नांतही आहे.
फक्त त्याला देवाच्या उंच सिंहासनावरून खाली उतरवून, मित्राच्या जागी बसवायला शिकलं पाहिजे. तेव्हाच तो खऱ्या अर्थाने भेटतो.कृष्ण असतोच आपल्या सोबत. कर्म करताना त्याची आठवण ठेवा, वाईट कर्म हातून होणारच नाही.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमत्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः
कृष्णार्पण अस्तु.
जयश्री कृष्ण.
मनिषा डोंगरे
बडोदे.गुजरात

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा