हरवलेला रंग
शाळेतल्या आज मोठी गडबड होती. कारण आज “बालदिन विशेष कार्यक्रम” होता. सगळ्या मुलांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते. कुणी सुपरहिरोसारखा पोशाख आणि मधेच एक छोटीशी, शांत दिसणारी मुलगी दिव्या.
दिव्या हातात चित्रकला वही धरून उभी होती. आज होणाऱ्या चित्रकला स्पर्धेबद्दल ती खूप उत्सुक होती. पण तिच्या चेहऱ्यावर तितकाच ताणही होता. कारण दिव्याला रंग फारच आवडायचे… पण गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रांमध्ये काहीतरी कमी भासत होतं तिचा आनंदाचा रंग हरवल्यासारखा.
इतक्यात तिचा मित्र आरव धावत आला.
“अगं दिव्या! तयार आहेस ना? स्पर्धा सुरू होणार आहे!”
“हो… पण आज माझ्या मनात काही रंग उमटत नाहीत रे.” दिव्या शांतपणे म्हणाली.
“काय झालं? तू तर नेहमी इतकी रंगीत फुले, फुलपाखरे काढतेस… आज उदास का?” आरव
दिव्या काही बोलणार, इतक्यात शिक्षिका सुहासिनी मॅडम तिथे आल्या.
“मुलांनो, आपल्याला १ तास आहे. विषय आहे ‘माझं स्वप्नातील जग’. चला, सगळेजण सुरुवात करा!”
सगळे मुलं आपापल्या जागेवर बसले. दिव्याने वही उघडली, पण हात उचलतच नव्हता. पेन्सिल जवळ होती, रंगपेटी जवळ होती, पण मनात मात्र काळोखच.
“दिव्या काही मनात असेल तर सांग. मन हलकं केलस की रंग आपोआप उमटतात.” आरव काळजीने म्हणाला.
दिव्या थोडी शांत झाली. तिच्या डोळ्यांतले पाणी टिपूसारखं चमकलं.
“आरव… बाबा सतत कामात व्यस्त असतात. मला शनिवार- रविवारला पार्कला न्यायचं, चित्र काढायला मदत करायची… पण आता ते रोज म्हणतात ‘वेळ नाही’. मी त्यांच्यासोबत बोलते तेव्हा ते फोनमध्ये असतात. मला… मला रंगच दिसत नाहीत आता.”
“अगं, बाबा कामात असले तरी त्यांना तू खूप आवडतेस. कधी कधी मोठ्यांना वेळ देण्याची आठवण करून द्यावी लागते.” अरवने समजावले
दिव्या हळूच हसली.
“चल, तुझं स्वप्नातील जग तर काढ. कदाचित तुझा ही हरवलेला रंग परत मिळेल.” आरव
दिव्या विचारात पडली. तिने पेन्सिल घेतली.
ती सुरुवात करत होती तेवढ्यात सुहासिनी मॅडम शांतपणे तिच्या बाजूला बसल्या.
ती सुरुवात करत होती तेवढ्यात सुहासिनी मॅडम शांतपणे तिच्या बाजूला बसल्या.
“दिव्या, अजून तू काही चित्र काढलं नाही?”
दिव्याने मान खाली घालून सांगितलं.
मॅडमने प्रेमाने तिचे केस हलकेच अलगद कुरवाळले.
“बाळा… रंग फक्त पेटीत नसतात. रंग आपल्या मनात असतात. मनात आशा असेल ना, तर कोणताही दिवस रंगीबेरंगी होतो. आणि तू एकदम हुशार मुलगी आहेस. खोलीत प्रकाश हवा असेल, तर पहिली खिडकी उघडावी लागते… समजलं?”
“बाळा… रंग फक्त पेटीत नसतात. रंग आपल्या मनात असतात. मनात आशा असेल ना, तर कोणताही दिवस रंगीबेरंगी होतो. आणि तू एकदम हुशार मुलगी आहेस. खोलीत प्रकाश हवा असेल, तर पहिली खिडकी उघडावी लागते… समजलं?”
दिव्याने मान हलवली. मॅडमच्या शब्दांत एक गोड ऊब होती, अगदी सूर्याचा पहिला किरण जसा हळूवार खिडकीतून आत शिरतो तशी.
दिव्याने खोल श्वास घेतला आणि चित्र काढायला सुरुवात केली. निळा आकाश, हिरवळ, खेळणारी मुलं, झोके आणि एका कोपऱ्यात तिचे बाबा. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसणं हातामध्ये फोन नाही. फक्त तिचा हात पकडून दोघे झाडाखाली बसले होते.
“वा! खूप सुंदर चित्र.." आरव आश्चर्याने पाहत राहिला.
“हे माझं स्वप्नातील जग. जिथे मी आणि बाबा… पुन्हा एकत्र वेळ घालवतो.” दिव्याच्या चेहऱ्यावर हसू आले. मॅडम दूरून बघून खूश झाल्या.
स्पर्धेचा वेळ संपला. परीक्षकांनी चित्रे पाहिली. दिव्याचं चित्र पाहताना ते काही क्षण थांबले.
चित्रातलं प्रेम, उब, आणि आशा फारच मनाला भिडत होती.
चित्रातलं प्रेम, उब, आणि आशा फारच मनाला भिडत होती.
शेवटी निकाल जाहीर झाला
“पहिला क्रमांक मिळतोय दिव्या कुलकर्णी! तिच्या ‘स्वप्नातील जग’ या चित्राला!”
सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. दिव्या स्टेजवर गेली. पुरस्कार घेताना तिच्या नाराज मनात पहिल्यांदाच खूप दिवसांनी आनंद चमकला. तिलाही जाणवलं कधी कधी आपला हरवलेला रंग आपणच शोधायचा असतो.
कार्यक्रम संपला. बाबा तिला न्यायला आले होते.
त्यांनी दिव्याचा मेडल आणि चित्र पाहिलं.
त्यांनी दिव्याचा मेडल आणि चित्र पाहिलं.
“अरे वा! हे कुणी काढलं इतकं सुंदर?”
“मी. आणि बाबा, हे चित्र सांगतंय की… मला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडतं.” दिव्या
बाबा थोडे गहिवरले. त्यांनी दिव्याला जवळ घेतलं.
“माफ कर बाळा… मी कामात अडकलो होतो. पण आता आपण सगळ्या शनिवार-रविवारला एकत्र काही तरी करणार! हे मी वचन देतो.”
दिव्या आनंदाने बाबांच्या मिठीत हरवली.
तिचा हरवलेला रंग परत आला होता.
तिचा हरवलेला रंग परत आला होता.
त्या दिवशी मॅडम म्हणाल्या
“मुलांनो, बालदिन म्हणजे फक्त खेळ-गाणी नाही…
बालदिन म्हणजे मोठ्यांना आठवण
बालदिन म्हणजे मोठ्यांना आठवण
‘मुलांचा वेळ, प्रेम आणि लक्ष हेच त्यांच्यासाठी सर्वात मौल्यवान रंग आहेत.’”
मुलांनी एकसुरात टाळ्या दिल्या. दिव्या म्हणाली,
“हा माझा सर्वात रंगीत बालदिन.”
“हा माझा सर्वात रंगीत बालदिन.”
