Login

मैत्रीची खरी व्याख्या...

मैत्री फक्त समोर असताना नाही तर मनापासून निभवावी...
मैत्रीची खरी व्याख्या..

"अरे चिनू... मला ना तो नंबर सापडत नाही रे... कॉलेजमधल्या त्या जुन्या ग्रुपचा नंबर आहे का तुझ्याकडे?" राजू तिला विचारतो..

"नाही रे राजू, पण मी प्रयत्न करतो शोधून काढायचा.... तुला अचानक का आठवली सगळी मंडळी?" चिनू आश्चर्याने त्याला विचारतो...

"आज फ्रेंडशिप डे आहे ना.... सगळ्यांना एकदा भेटावं वाटतंय... पण एक व्यक्ती... ती जरा वेगळी होती... तिचा नंबर मिळाला पाहिजे...." राजू काहीतरी विचार करत उत्तर देतो...

"कोण रे?" चिनू प्रश्नार्थक नजरेने विचारतो...

त्याचा प्रश्न ऐकून राजू थोडा गप्प झाला... काही क्षण शांततेत गेले....

"साक्षी..." त्याच्या डोळ्यात एक ओल आली होती...

राजू, चिनू, साक्षी, नेहा, साहिल आणि मयंक हे सहाजण एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये एकत्र होते.... चार वर्षं एकत्र अभ्यास, गप्पा, खोड्या, प्रेम, भांडणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं  अटूट मैत्री....


साक्षी वेगळीच होती... ती सगळ्यांची काळजी घ्यायची, कोणाच्या नोट्स राहिल्या तरी साक्षी पाठवायची.... कुणाचं मन खट्टं झालं तरी तिचा फोन यायचाच.... पण ती फार खोल मित्र मैत्रीण नव्हती कोणाशी, आणि तरी सगळ्यांशी नातं गहिरं होतं....

एक दिवस चिनू आणि मयंकमध्ये जोरात भांडण झालं....

"तू कायम मला छोटा समजतोस! माझं मत काही मोलाचं नाही असं वाटतं तुला!" मयंक रागाने त्याला विचारतो...

"मयंक, मी फक्त practicality बोलतोय!" चिनू शांततेत उत्तर देतो...

सगळा ग्रुप दोन भागात विभागला गेला.... साक्षी मात्र दोघांनाही समजावून शांत राहिली....

"साक्षी, तू कोणाचंच साइड घेत नाहीस.... तू काहीच बोलत नाहीस!"  नेहा चिडून म्हणाली....

"नेहा, मी साइड घेतली तर आपलं मैत्रीचं नातं कमजोर होईल.... मी सगळ्यांची मैत्रीण आहे.... आपण सगळे एकच ग्रुप आहोत... "साक्षीने शांततेतने तिला समजावले...

तीचा तो साधा संवाद सगळ्यांच्या मनात घर करून गेला....

कॉलेज संपलं.... कोणी पुण्यात, कोणी बंगळुरूमध्ये, कोणी परदेशात.... व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू होता, पण हळूहळू नात्यांतला तो उत्साह फिकट होत गेला. .. साक्षी मात्र अधूनमधून सगळ्यांना wishes पाठवत राहायची....

"Happy Diwali", "All the best for new job", "Take care" हे तिचे साधेसे messages, पण मनाला भिडणारे....

एक दिवस चिनूचा अपघात झाला. .. दोघे-तिघे भेटायला आले.... बाकी कोणी नाही..... साक्षी मात्र दिल्लीवरून खास आली... काही सांगितलं नव्हतं तिला, तरीही आली.....

"कसं काय कळलं तुला?" - चिनूने विचारलं....

"मयंकच्या स्टेटसवरून." साक्षीने शांत स्वरात उत्तर दिले...

"हे , तर तुला कुणी सांगितलं नव्हतं!" चिनू तरीही तिच्याकडे बघून बोलला...

"मित्रांना काय सांगायचं नसतं, जाणवायचं असतं..." – तिचं उत्तर गूढ होतं, पण खरं होतं....

एक दिवस अचानक सगळ्यांसोबत संपर्क ठेवत असताना मध्येच साक्षी अचानक गायब झाली.... तिचा फोन बंद.... सोशल मीडियावर शांतता... कुणी काही जाणूनही नव्हतं....  एक वर्ष, दोन वर्षं, आणि आज  फ्रेंडशिप डे....

राजूच्या मनात काहीतरी चाललं होतं.... तो जुन्या डायऱ्या चाळत बसला होता ... एक पान पडलं साक्षीने लिहिलेलं एक पत्र:

“राजू,

जर एक दिवस मी नाहीशी झाले, तरी समज  मी कुठेही गेले, पण माझं मन तुमच्यातच राहिलंय.... मैत्रीला वेळ, अंतर, आणि संवाद लागत नाही.... ती फक्त असते....

तुम्हाला काही वाटलं, तर तुम्हीच मला आठवा.... मी कुठेही असले तरी, एक हात मदतीला उभा असेल....

– साक्षी”


राजू थरथरला....  "हे पत्र मला का दिलं होतं तिनं?" त्याच्या मनाला विचार पडला...

"कदाचित तिला कळलं होतं की ती फार काळ आपल्यात नसेल...." – चिनूने हळू आवाजात म्हटलं....


राजू आणि चिनूने साक्षीचा शोध घेण्याचा निश्चय केला.... सोशल मीडियावर, जुन्या मित्रांकडून, अगदी तिच्या जुन्या पत्त्यावरही गेले..... शेवटी एका NGO मध्ये तिचा पत्ता सापडला....

ती तिथे मुलांना शिकवत होती, दिव्यांग मुलांना अंध, अपंग, अनाथ.....  स्वतःच्या आयुष्यातून पूर्णपणे मागे झाली होती....

"साक्षी!" – दोघं एकदम ओरडले. ..

तिचा चेहरा एकदम शांत होता.... समाधानानं भरलेला.....

"तुम्ही इथे कसे?" – ती आश्चर्यचकित झाली....

"तू अशी निघून गेलीस, काही कळवलंही नाही. का?" दोघांनी एक साथ विचारले...

"कारण मला वाटतं, आयुष्य म्हणजे केवळ स्वतःसाठी नाही... मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात चांगली आठवण होणं. आणि मला वाटतं, मी ती आठवण बनले आहे.... " साक्षीने त्या दोघांकडे पाहून समाधानाने उत्तर दिले...

"पण आम्हाला तुझी गरज आहे!"  राजूच्या डोळ्यात पाणी आलं.....

"माझ्या आठवणींनी पुरे ना... आपली मैत्री म्हणजे सतत सोबत असणं, असं नाही मानत.... मैत्री म्हणजे  कुणी नसताना सुद्धा मनातली साथ.... " साक्षी त्याच्याकडे एक पाहून म्हणाली...

साक्षी पुन्हा ग्रुपमध्ये आली, पण नेहमीसारखी शांत, सजग.... प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक प्रेरणा होती.....

फ्रेंडशिप डे च्या दिवशी राजूने एक पोस्ट लिहिली:

"मैत्री म्हणजे रोज भेटणं नाही, रोज बोलणं नाही...
ती म्हणजे  कोणीतरी असावं, ज्याचं अस्तित्व मनात राहतं...
साक्षी, तू आम्हाला मैत्रीची खरी व्याख्या शिकवलीस."

ही कथा मैत्रीच्या त्या नात्याची गोष्ट सांगते जिचा केंद्रबिंदू प्रेम, समर्पण, निस्वार्थ भाव आणि कायमची साथ आहे.....  संवाद, वेगळ्या वळणांची गुंफण आणि हृदयस्पर्शी शेवटासह....


समाप्त....
0