ऐरावत रत्न थोर ।त्यासी अंकुशाचा मार।
जया अंगी मोठेपण। तया यातना कठीण।
महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।
तुका म्हणे सर्वेजण। व्हावे ल्हानाहुन ल्हान।
हा छोट्टुसा अभंग मला खूप आवडतो कारण त्याचा अर्थ व आशय एकाच वेळी खूप सोपा व तितकाच गहनही आहे.
तुकोबा देवाला" लहानपण दे गा देवा " असे विनवतात. अल्पसंतोषी असावे.हावरट नसावे. हा त्यातला विचार आहे.एक सूक्ष्म अशा मुंगीला सुद्धा फक्त एक साखरेचा दाणा मोठ्ठा गुळाची ढेप असल्यासारखा भासत असावा.तिच्या क्षमतेचेच ओझे ती वाहून नेऊ शकते.
गिरीराज नावाचा एक श्रीमंत माणूस होता... त्याच्या सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्याने कमावून ठेवली होती... तरीही त्याच्या मनामध्ये समाधान नव्हते.... अजून कसा पैसा कमवता येईल याचाच विचार तो दिवस रात्र करत होता....
रोज सकाळी तो लवकर उठून आपल्या ऑफिसला जायचा , तर रात्री घरी येईपर्यंत त्याला उशीर व्हायचा दिवसभर थकूनही त्याला रात्री सुखाची झोप लागत नव्हती.... पैसा तर भरपूर कमवला पण तरीही त्याच्या मनाला समाधान मिळत नव्हते.... रात्री शांत झोप लागावी या विचारातच त्याने किती वेळा डॉक्टरांचे उपचार करून पाहिले परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही.....
त्याच्या ऑफिसमधला एक स्टाफ त्याला एका मठात घेऊन आला... तिकडे एक महाराज आपली ध्यान साधना करत बसले होते.... गिरीराज त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला....
" तुला काय पीठ आहे बेटा... " त्या महाराजांनी शांत आवाजात विचारले...
" बाबा मी पैसा तर भरपूर कमावला आहे तरी पण मला रात्री सुखाची झोप येत नाही.... यावर मला काही उपाय सांगता का ? " गिरीराज त्यांच्याकडे पाहून बोलले...
" ठीक आहे मी सांगतो तुला उपाय, पण त्याआधी माझा एक काम करशील का ? " महाराज शांत स्वरात त्याच्याकडे बघून बोलले...
" हो सांगा ना... " गिरीराज ते काम करायला तयार झाला...
" हे काही धान्य आहे.... माझ्या मठाच्या बाहेरच काही अंतरावर एक झोपडपट्टी आहे त्यात राहणाऱ्या माणसांना हे धान्य जाऊन दे... " असे बोलून महाराजांनी त्यांच्या हातात एक पिशवी दिली... ती पिशवी घेऊन गिरीराज मठातून बाहेर पडला आणि काही अंतरावर असलेल्या आता झोपडपट्टीमध्ये गेला..... ती झोपडी नुसतीच पत्र्याची बांधलेली होती... त्याचा दरवाजाही धड नव्हता... आत वाकून पाहिले असता एकच छोटीशी खोली होती त्यात एक कटाडा लावला होता, त्यालाच टेक किचन सारखे वापरत होते.... तरीही त्या घरात बसलेल्या माणसांचे हसण्याचे आवाज त्यांच्या कानावर पडले....
" हे धान्य महाराजांनी तुम्हाला द्यायला सांगितले आहे.... " गिरीराज त्यांच्याकडे बघून बोलला....
" तुमचे खूप धन्यवाद... " झोपलेला माणूस त्याच्या हातातून पिशवी घेत बोलला..
" एक विचारू... " गिरीराज ला त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून आश्चर्य वाटले...
" विचारा ना... " त्या माणसाने उत्तर दिले..
" तुमच्याकडे दुसऱ्या दिवसाचे अन्नही जवळ नसताना तुम्ही इतक्या समाधानाने कसे काय राहू शकता ? " गिरीराज प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघून विचारतात...
" ते महाराज आमच्यासाठी कोणत्या देवापेक्षा कमी नाही जेव्हा पण कधी आम्हाला असे वाटते की , उद्याच्या जेवणाचा बंदोबस्त कसा होईल की महाराज कोणता ना कोणता मार्गाने आमच्यापर्यंत हे धान्य पोहोचतात आणि अशाप्रकारे रोज आमच्या मुखात अन्नाचा कण तर जातो.... यातच आम्हाला समाधान आहे... " त्या माणसाने दिलेले उत्तर ऐकून गिरीराज ला त्याची चूक समजते...आपण पैसा कमवणे मध्ये इतके हरवून गेलो होतो की, पैशाच्या लालच ने आपल्याला सुख आणि समाधान पासून दूर केले होते.... पण जेव्हा आपल्याकडे असलेल्या पैशामुळे आपण दुसऱ्या माणसांना जर थोडा तरी आनंद देऊ शकलो तरी आपल्याला समाधानाची झोप मिळेल... यापुढे पैशाच्या मागे न लागता समाधान कमावण्याचा प्रयत्न करू , हा विचार करतच गिरीराज त्यांच्या घरी परतले.....
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा